सामग्री पर जाएँ
सर्वकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 150, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 150

१२२ सार्थ तुकारामगाथा
अवघा जाला राम राम । कोणी कर्म आचरे ना ॥ ३ ॥
हरिदासांच्या पडती पायां । म्हणती तयां नागवावें ॥ ४ ॥
दोन्ही ठायीं फजीत जालें । पारणे केलें अवकळा ॥ ५ ॥
तुका म्हणे नाश केला । विटंबिला वेश जिहीं ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा - कडासन-हरणाच्या कातड्याचे आसन.
अर्थ:- एका ब्रह्मचाऱ्याचा निषेध करताना बुवांनी म्हटले आहे; एका ब्रह्मचाऱ्याच्या काखेत हरणाच्या
कातड्याचे आसन होते ते चालताना पडले व त्याचा खडबड खडबड असा आवाज झाला १ असा हा फजितखोर
व निलंन्ज येथे आला आहे याची काही वाट लावा ना. २ हा म्हणतो सर्वत्र राम राम म्हणून उच्चार केला जातो
पण त्याप्रमाणे कर्म कोणीच आचरीत नाही. ३ जे कोणी हरिदासाच्या पाया पडतील त्यांना लुटावे असे हा म्हणतो. ४
ज्यांची या ब्रह्मचाऱ्याप्रमाणे समजूत आहे त्यांची दोन्हीकडे फजिती होईल. त्याला धड नामभक्तीही साधणार
नाही, की त्यास कर्म करणेही समजणार नाही. त्याने संसार व परमार्थ याची फजितीच केली आहे. त्याचा शेवट
अशाच अवकळेने, नाशाच्या अवस्थेने होणार ५ तुकाराम महाराज म्हणतात, अशा वरवरच्या वेशामुळे देह विटंबिला
जातो व सर्व परमार्थाचा नाश होतो. ६
२५१ कुटुंबाचा केला त्याग । नाही राग जंव गेला ॥ १ ॥
भजन तें योगळवाणें । नरका जाणे चुके ना ॥ २ ॥
अक्षराची केली आटी । जरी पोटीं संतनिंदा ॥ ३ ॥
तुका म्हणे मागें पाय । तया जाय स्छळासि ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा.- अक्षराची-वेदविद्येची, आटी-मेहनत, स्छळासी-नरकात
अर्थः- मनातील रागलोभादी विकार गेले नाहीत तोपर्यंत कुटुंबाचा त्याग केला तरी व्यर्थ आहे तो. १
बाह्य वेष धारण करून नुसते भजन केले तर ते ओंगळ दिसते व ते करणारा नरकास गेल्याशिवाय राहात नाही २
वेदविद्या पाठ करण्याची मेहनत केली, पण पोटात संतनिंदा आहे तर त्याचा काहीही उपयोग नाही ३
तुकाराम महाराज म्हणतात, त्याने जरा मागे वळून पाहिल्यास आपण नरकात जात आहोत असे त्याला दिसेल. ४
२५२ तारतिम वरी तोंडाच पुरते । अंतरा हे येते अंतरींचें ॥ १ ॥
ऐसी काय बरी दिसे ठगठकी । दिसतें लौकिकीं सत्या ऐसें ॥ २ ॥
भोजनांत द्यावे विष कालवूनि । मोहचाळवणी मारावया ॥ ३ ॥
तुका म्हणे मंद देखों नेदी कुडें । आदरेंचि पुढें सोंग दावी ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा.- तारतिम-तारतम्याचे बोलणे, मंद-कपटी, कुडें-खोटें
अर्थः- या माणसाच्या तोंडी दिसणारे तारतम्याचे शब्द तोंडापुरतेच आहेत पण याच्या मनात कपट आहे
ते स्वच्छ दिसते. १ व्यवहारात सत्याप्रमाणे वाटणारी ही फसवाफसवी काय चांगली दिसते का कधी ? २
एखाद्यास भोजनास बोलवावे व अन्नात विष कालवून त्यास मोह दाखवून मारावे तसाच हा प्रकार नव्हे का ? ३
तुकाराम महाराज म्हणतात, हा कपटी मनुष्य आदरसत्काराचे सोंग पुढे पुढे दाखवून आपल्या मनातील खोटे दिसू
न देण्याचा प्रयत्न करीत असतो ४
२५३ ब्रह्मनिष्ठ काढी । जरी जीवानायें मोडी ॥ १ ॥
तया घडली गुरुहत्या । गेला उपदेश तो मिथ्या ॥ २ ॥
सांगितले कानीं । रूप आपुले वाखाणी ॥ ३ ॥