सामग्री पर जाएँ
सर्वकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 145, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 145

सार्थ तुकारामगाथा ११७
भवनदीचा नकळे पार । काळिया माजी थोर बिलार ॥ ३ ॥
तुका म्हणे काय वाउग्या हाका । हातांचा गमावुनियां धिका ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- वेंदोनि-चढून, बिलार-विषारी, धिका-रडता.
अर्थ :-यमुनेच्या तीरावरील कळंब वृक्षाच्या फांदीवर चढ़न श्रीकृष्णानें नदीच्या डोहात उडी टाकली. १
तेव्हा सर्व गोपाळ ओरडू लागले, 'अरे हरी बुडाला, कृष्ण बुडाला. बोंब मारा ना. कारण याच्या घरी जे आहेत
त्यांना यासंबंधी काहीच माहीत नाही.' २ या भवनदीचा काही ठाव कधी लागत नाही व या नदीच्या पात्रात
काळिया नावाचा फार मोठा विषारी नाग आहे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, हातच्या हरीला दवडू नका. व्यर्थ
हाका का मारता ? का रडत बसता ? ४
२३७ अवघीं मिळोनि कोल्हाळ केला । आतां होता म्हणती गेला ॥ १ ॥
आपलिया रडती भावें । जयासवें जयापरी ॥ २ ॥
चुकलों आम्ही खेळतां खेळ । गेला गोपाळ हातांचा ॥ ३ ॥
तुका म्हणे धांवती थडी । न घली उडी आंत कोणी ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा- कोल्हाळ-गोंगाट, थडी-काठापर्यंत.
अर्थ :-मग सर्व गोपाळांनी मिळून एकच गोंगाट केला; व म्हणू लागले, 'हा हरी आता की हो होता. आता
कसा नाहीसा झाला ?' १ जो तो आपापल्या भावनेने रडू लागला. ज्याची जशी त्याच्याशी संगत होती तशा
प्रमाणात त्यांना शोक झाला, २ ते म्हणू लागले, 'आम्हीच खेळ खेळताना चुकलो. म्हणूनच आमच्या हातून हा
आमचा गोपाळ कृष्ण गेला.' ३ तुकाराम महाराज म्हणतात, असे म्हणून काही गोपाळ नदीच्या काठापर्यंत धावत
गेले; पण आत उडी घालून श्रीकृष्णाचा शोध घेण्याचे धैर्य मात्र कुणास झाले नाही. ४
२३८ भ्यालीं जिया चुकलीं देवा । नाहीं ठावा जवळों तो ॥ १ ॥
आहाकटा करिती हाय । हात डोकें पिटिती पाय ॥ २ ॥
जबळी होतां नकळे आम्हां । गेल्या सीमा नाहीं दुःखा ॥ ३ ॥
तुका म्हणे हा लाघवी मोठा । पाहे खोटा खरा भाव ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- आहाकटा-हायहाय.
अर्थ :- श्रीकृष्ण यमुनेच्या डोहात बुडाला, त्याचे रक्षण आपण केले नाही या विचाराने ते सर्व गोपाळ
भ्याले उडी टाकून त्याला वर काढण्याचे धैर्य कुणास नव्हते. ज्याने त्याने आपल्या जिवास जपले व देव चुकविला.
तो जवळच आहे तरी त्याचा तपास आता काही केल्या लागेना. १ मग सर्वजण हायहाय करून दुःख करू लागले.
जो तो हात, पाय, डोकें पिटून घेऊ लागला. २ व म्हणू लागला; 'हा कृष्ण आमच्या अगदी जवळ होता तेव्हा
त्याचे महत्त्व आम्हांस समजले नाही; व हा आता दूर जाताच आमच्या दुःखास सीमाच उरली नाही. '३ तुकाराम
महाराज म्हणतात, हा श्रीकृष्ण मोठा लाघवी आहे स्वतःविषयी कोण खरा, कोण खोटा अशी परीक्षाच जणू तो
भावभक्तीची पाहतो. ४
२३९ काळिया नाथूनि आला वरी । पैल हरी दाखविती ॥ १ ॥
दुसरिया भावें न कळे कोणा । होय नव्हेसा संदेह मना ॥ २ ॥
रूपा भिन्न पालट जाला । गोरें सांवळेंसा पें देखिला ॥ ३ ॥
आइवासीत आला करें । तुका खरें म्हणे देव ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- नाथूनि-मर्दन करून, दुसरिया-द्वैत भावनेने