सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 138, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ें११० सार्थ तुकारामगाथा
अर्थ :- जे माझ्या वाटणीस सर्वांना देऊन झाल्यावर येईल ते मी निमुटपणे घेईन. मी काही इतरासारखा
हावरा मनुष्य नाही. १ चांगल्या गुणवान माणसांसारखीच माझी आवड आहे. ती तुम्ही जाणून घ्या. २ हा
परमेश्वर क्षणभरही मजजवळ नसला तर हे लोक मला काठीने मारण्यास तयार होतील. ३ तुकाराम महाराज
म्हणतात, देवा, मला आपले राबवून घ्या. जी सेवा सांगाल ती मी मनोभावे करीन. ४
२१९ अंतरली कुटी मेटी । भय धरूनियां पोटीं ।
म्हणतां जगजेठी । धांवें करुणाउत्तरीं ॥ १ ॥
बाप बळिया शिरोमणी । उताविळ या वचनीं ।
पडलिया कानीं । धांचा न करी आळस ॥ २ ॥
बळ दुणी शरणागता । स्वामी वाहों नेदी चिंता ।
आइतेचि दाता । पंगतीस बैसवी ॥ ३ ॥
वाहे खांदीं पावती घरा । त्याच्या करी येरझारा ।
बोबड्या उत्तरा । स्वामी तुकया मानवले ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- कुटी मेटी-घरदार, दुनी-दुप्पट
अर्थ :- घरादाराला जी माणसे अंतरली होती व जी मोठेच भय पोटात धरून होती त्यांनी करुण वाणीने
ईश्वराचा धावा केल्याबरोबर त्यांना ईश्वराचे साह्य झाले. १ हा ईश्वर आपल्या पित्याप्रमाणेच असून मोठा
बलवान आहे. कुणाची हाक कानी पडताच हा आळस न करता उतावीळ होऊन भक्ताच्या रक्षणार्थ धावत येतो. २
जो शरणागत आहे त्यास असे परमेश्वराचे साह्य झाल्यामुळे त्याचे बळ दुप्पट होते. ईश्वर त्यास कसलीही चिंता
करू देत नाही. हा दाता ईश्वर त्यांना आपल्याच पंगतीस बसवितो ३ आणि तुकाराम महाराज म्हणतात, आपल्या
भक्ताचे बोबडे बोल ऐकून हा माझा स्वामी भक्तांना खांद्यावर घेऊन त्याच्या घरापर्यंत पोचते करतो वारंवार
त्यांच्या घरी त्याची येजा असते ४
२२० धन्य तें गोधन कांबळी काष्ठिका । मोहरी पांवा निका ब्रीद वांकी ॥ १ ॥
धन्य तें गोकुळ धन्य ते गोपाळ । नर नारी सकळ धन्य जाल्या ॥ २ ॥
धन्य ते देवकी जसवंती दोहीचें । वसुदेवनंदाचे भाग्य जाले ॥ ३ ॥
धन्य त्या गोपिका सोळा सहस्र बाळा । यादवां सकळां धन्य जाले ॥ ४ ॥
धन्य म्हणे तुका जन्मा तोंचि आली । हरिरंगों रंगली सर्वभावें ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा :- काष्ठिका-काठी
अर्थ :- गोकुळातील गोधन, कांबळे, काठ्या, मुरली, पावा, वाकया इत्यादी भूषणे या सर्व वस्तू श्रीकृष्णाच्या
सहवासाने धन्य आहेत १ ते गोकुळ धन्य आहे तेथील गोपाळ, स्त्री-पुरुष सर्वच जण धन्य आहेत. २ श्रीकृष्णाच्या
माता देवकी व यशोदा याही धन्य होत. वसुदेव व देवकी यांच्या भाग्याचे वर्णन किती करावे? ३ त्या गोपिका
व सोळा सहस्र स्त्रिया आणि सर्व यादवही धन्य होत ४ तुकाराम महाराज म्हणतात, जी हरीच्या भक्तीत रंगून
गेली ती सर्व माणसे जन्मास येऊन धन्य झाली आहेत. ५
२२१ गौळणी बांधिती धारणासि गळा । खेळे त्या गोपाळांमाजी ब्रह्म ॥ १ ॥
धांवोनियां मागे यशोदे भोजन । हिंडे रानोरान गाईंपाठीं ॥ २ ॥
तुका म्हणे सूर्य कळा ज्याचे अंगीं । भोळेपणालागीं भीक मागे ॥ ३ ॥
शब्दार्थ व टीपा :- धारणासि-फुसलाव्याला