सामग्री पर जाएँ
सर्वकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 111, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 111

सार्थ तुकारामगाथा ८३
नाही ४ तुकाराम महाराज म्हणतात, हे शुद्ध दळण सर्वांनाच आवडते आणि ज्या स्त्रीस हे दळण पसंत पडते तिला
आपल्या जिवास या श्रीहरीश्वतारापासून कधीही वेगळे राहावत नाही ५
१६१ उपजोनिया पुढती येऊ । काला खाऊ दहीभात ॥ १ ॥
वैकुंठीं तो ऐसे नाहीं । कवळ काहीं काल्याचे ॥ २ ॥
एकमेका देऊ मुखीं । सुखीं घालू हुबरी ॥ ३ ॥
तुका म्हणे वाळवट । बरवे नीट उत्तम ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - उपजोलिया-पुन जन्म घेऊन
अर्थ - पुन पुन जन्म घ्यावा लागला तरी हरकत नाही, पण हा काला व दहीभात आपण मोठ्या
प्रेमाने खाऊ १ कारण वैकुंठलोकीसुद्धा हे सुख नाही काल्याच्या घासाचे सुख तेथे कुठून असणार? २ हे घास
आपण एकमेकाच्या तोंडात देऊ व मग सुखाने हुवरीचा खेळ खेळू ३ तुकाराम महाराज म्हणतात, असा काल्याचा
खेळ खेळाबला हे बाळवट फार चांगले आहे ४
१६२ याल तर या रे लागें । अवघे माझ्या मागें मागें ॥ १ ॥
आजि देतो पोटभरी । पुरे म्हणाल तोवरी ॥ २ ॥
हळ हळू चला । कोणी कोणाशी न बोला ॥ ३ ॥
तुका म्हणे साडा घाटें । तेणे नका भरू पोटें ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - लागें- लागलीच, घाटे- फोलकटे
अर्थ - गोपाळांनो, यायचेच असेल तर लागलीच सर्वजण माझ्या मागोमाग या १ आज मी तुम्हाला
काल्याचा प्रसाद पुरे पुरे म्हणाल तोपर्यंत पोटभर देणार आहे २ पण अगदी पाय न वाजविता हळूहळू चला,
कुणाशीही एक शब्द बोलू नका ३ तुकाराम महाराज म्हणतात, सर्व फोलकटे सोडून द्या त्यानी काही तुमचे
पोट भरणार नाही ४
१६३ शिके लावियेलें दुरी । होतो तिघाचे मी वरी ॥ १ ॥
तुम्ही व्हा रे दोहींकडे । मुख पसरूनि गडे ॥ २ ॥
वाहाती त्या धारा । घ्यारे दोहोंच्या कोपरा ॥ ३ ॥
तुका म्हणे हातीं टोका । अधिक उणे नेदी एका ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - दुरी-उच, टोका-पाहा
अर्थ - गोपाळानो, आज त्या गवळणीने हे शिके फार उच लावले आहे काही हरकत नाही तुम्ही एक-
मेकाच्या खाद्यावर असे तिघेजण उभे राहा मी तुमच्या खाद्यावर चढून ते दहीदूध काढतो १ तुम्ही मात्र माझ्या
दोन्ही बाजूस तोंड उघडून तयार असा २ माझ्या दोन्ही हाताच्या कङानी दह्यादुधाच्या धारा वाहतील त्या नीट
पाहा ३ तुकाराम महाराज म्हणतात माझ्या हाताकडे पाहा, कुणाला काही कमीजास्त न करता मी सर्वांना
सारखाच वाटा देईन ४
१६४ पळाले ते भ्याड । त्यासि येथे जाला नाड ॥ १ ॥
धीट घेती घणीवरी । शिकीं उतरितो हरी ॥ २ ॥
आपुलिया मतीं । पडलीं विचारीं तीं रितीं ॥ ३ ॥
तुका लागे घ्यारे पायां । कं पावाल या ठाया ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - नाड-फसवणूक, रितीं-रिकामी