सामग्री पर जाएँ
सर्वकोश
संग्रह पर लौटें

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary

समर्थ रामदास स्वामी द्वारा

DevanagariHindipublished467 पृष्ठ

दुसरें । कांहींच
नाहीं खरें । निंदा आणि स्तुति उत्तरें । परब्रह्मीं नाहीं ॥ ११ ॥ ऐसें पर-
ब्रह्म एकजिनसी । कांहींच तुळेना तयासी । महानुभाव पुण्यराशी । तेथें
पहुडती ॥ १२ ॥ चंचलें होते दुःखरासी । निश्चळायेवढी नाहीं विश्रांती ।
निश्चळ प्रत्ययें पाहाती । महानुभाव ॥ १३ ॥ मुळापासून शेवटवरी । विचा-
१. मुंगीच्या चालीनें; म्हणजे प्रथम कर्म, नंतर उपासना व शेवटीं ज्ञान होणें.
२. पक्ष्याच्या भरारीप्रमाणें; म्हणजे एकदम विचार सुचून ज्ञान होणें.

Wait, let's re-check line 15 (our L15):
Is it अधोर्ध्व or अधोध्वं?
Let's zoom into L15:
Word: अधोर्ध्व vs अधोध्वं vs अधोर्ध्वे
Characters:
अ
धो
third character: look at the top. There is a horizontal headline.
Below headline, there is ध connected to व? Wait, look at `

२० वा.] सूक्ष्म नामाभिधान. ४१७
रणा केलीच करी । प्रत्ययाचा निश्चय अंतरीं । तयासचि फावे ॥ १४ ॥ क-
ल्पनेची सृष्टि जाहली । त्रिविध प्रकारें भासली । तीक्ष्ण बुद्धीनें आणिली ।
पाहिजे मना ॥ १५ ॥ मूळमायेपासून त्रिगुण । अवघें एकदेशी लक्षण ।
पांचां भूतांचा ढोबळा गुण । दिसतचि आहे ॥ १६ ॥ पृथ्वीपासून चारी
खाणी । चारी वेगळाली करणी । सकळ सृष्टीची चालणी येथूनी । पुढें नाहीं
॥ १७ ॥ सृष्टीचें त्रिविध लक्षण । विशद करूं निरूपण । श्रोतीं सुचित्त
अंतःकरण । केलें पाहिजे ॥ १८ ॥ मूळमाया जाणिवेची । मुळीं सूक्ष्म
कल्पनेची । जैसी स्थिती परा वाचेची । तद्रूपचि ते ॥ १९ ॥ अष्टधा प्रकृ-
तीचें मूळ । ते हे मूळमायाच केवळ । सूक्ष्मरूप बीज सकळ । मुळींच आहे
॥ २० ॥ जड पदार्थ चेतवितें । म्हणोनि चैतन्य बोलिजेतें । सूक्ष्मरूपें संकेतें ।
समजोन घ्यावें ॥ २१ ॥ प्रकृतिपुरुषांचा विचार । अर्धनारी नटेश्वर । अष्ट-
धा प्रकृतीचा विचार । सकळ कांहीं ॥ २२ ॥ गुप्त त्रिगुणांचें गूढत्व । म्हणोन
संकेत महत्तत्व । गुप्तरूपें शुद्ध सत्व । तेथेंचि वसे ॥ २३ ॥ जेथून गुण
प्रगटती । तीस गुणक्षोभिणी म्हणती । त्रिगुणांचीं रूपें समजती । धन्य
ते साधु ॥ २४ ॥ गुप्तरूपें गुण सौम्य । म्हणोन बोलिजे गुणसाम्य । सूक्ष्म-
संकेत अगम्य । बहुतांस कैंचा ॥ २५ ॥ मूळमायेपासून त्रिगुण । चंचळ
एकदेशी लक्षण । प्रत्यय पाहतां खुण । अंतरीं येते ॥ २६ ॥ पुढें पंचभूतां-
चीं बंडे । वाढलीं विशालें उदंडें । सप्तद्वीपें नवखंडें । वसुंधरा हे ॥ २७ ॥
त्रिगुणापासून पृथ्वीवरी । दुसऱ्या जिनसा अनेक परी । दोन्ही जिनसा या
उपरी । तिसरा ऐका ॥ २८ ॥ पृथ्वी नाना जिनसांचें बीज । अंडज जारज
स्वेदज उद्भिज । चारी खाणी चारी वाणी सहज । निर्माण जाहल्या ॥ २९ ॥
खाणी वाणी होती जाती । परंतु तैशीच आहे जगती । ऐसे होती आणि
जाती । उदंड प्राणी ॥ ३० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे विंशति-
दशके त्रिविधसृष्टिलक्षणनिरूपणं नाम द्वितीयः समासः ॥ २ ॥
३. सूक्ष्म नामाभिधान.
श्रीगणेशाय नमः ॥ मुळींहूनि शेवटवरी । विस्तार बोलिला नानापरी ।
पुन्हा विवरत विवरत माघारीं । वृत्ति न्यावी ॥ १ ॥ चारी खाणी चारी

४१८ श्रीदासबोध. [ दशक
वाणी । चौऱ्याशीं लक्ष जीवयोनी । नाना प्रकारचे प्राणी । जन्मास येती
॥२॥ अवघे होती पृथ्वीपासूनी । पृथ्वीमध्यें जाती नासोनी । अनेक येती
जाती परी अवनी¹ । तैशीच आहे ॥ ३ ॥ ऐसें हें शेंड्याकडील खंड । दुसरें
भूतांचें बंड । तिसरें नामाभिधानें उदंड । सूक्ष्मरूपें ॥ ४ ॥ स्थूल अवघें
सांडून द्यावें । सूक्ष्मरूपें वोळखावें । गुणांपासून पाहिलेंच पाहावें । सूक्ष्म-
दृष्टी ॥ ५ ॥ गुणांचीं रूपें जाणीव नेणीव । पाहिलाच पाहावा अभिप्राय ।
सूक्ष्म दृष्टीच लाघव । येथून पुढें ॥ ६ ॥ शुद्ध नेणीव तमोगुण । शुद्ध
जाणीव सत्वगुण । जाणीव नेणीव रजोगुण । मिश्रित चालिला ॥ ७ ॥
त्रिगुणांचीं रूपें ऐशीं । कळों लागलीं आपैसीं । गुणांपुढील कर्दमासी ।
गुणक्षोभिणी बोलिजे ॥ ८ ॥ रज तम आणि सत्व । तिहींचें जेथें गूढत्व ।
तेंचि जाणिजे महत्तत्व । कर्द²भरूप ॥९॥ प्रकृतिपुरुष शिवशक्ती । अर्धनारी-
नटेश्वर म्हणती । परी याची स्वरूपस्थिती । कर्दमरूपें ॥ १० ॥ सूक्ष्मरूपें
गुण सौम्य । त्यासीच म्हणिजे गुणसाम्य । तैसेंच चैतन्य अगम्य । सूक्ष्म-
रूपी ॥ ११ ॥ बहुजिन्नसी मूळमाया । महाकारण ब्रह्मांडींची काया ।
ऐसिया सूक्ष्म अन्वया । पाहिलेंचि पाहावें ॥१२॥ चारी खाणी पांच भूतें ।
चौदा सूक्ष्म संकेतें । काय पाहाणें तें येथें । शोधून पाहावें ॥ १३ ॥ अहाचें⁴
पाहतां कळेना । गरज केल्यानें समजेना । नाना प्रकारें जनांच्या मना ।
संदेह पडती ॥ १४ ॥ चौदाँ³ पांच एकोणीस । एकोणीस चार तेवीस ।
यामध्यें मूळ चतुर्दश । पाहिलेंचि पाहावें ॥ १५ ॥ जो विवरोन समजला ।
तेथें संदेहचि नाहीं उरला । समजल्याविण जो गलबला । तो निरर्थक
॥ १६ ॥ सकळ सृष्टीचें बीज । मूळमायेंत असे सहज । अवघें समजतां
सज्जें⁵ । परमार्थ होतो ॥ १७ ॥ समजलें माणूस चावळेना । निश्चयी अनु-
मान धरीना । सांवाळागोंदा करीना । परमार्थ कदा ॥ १८ ॥ शब्दातीत
बोलतां आलें । त्यास वाच्यांश असें बोलिलें । शुद्ध लक्ष्यांशें लक्षिलें ।
पाहिजे विवेकें ॥ १९ ॥ पूर्वपक्ष म्हणिजे माया । सिद्धांतें जाय विलया ।
माया नसतां मग तया । काय म्हणावें ॥ २० ॥ अन्वय आणि व्यतिरेक ।
हा पूर्वपक्षाचा विवेक । सिद्धांत म्हणिजे शुद्ध एक । दुसरें नाहीं ॥ २१ ॥
१. पृथ्वी. २. मिश्रिभाव, चेंदा. ३. मूळमायेचीं चौदा नांवें. ४. वरवर. ५. पूर्ण-

२० वा. ] शिवशक्ति. ४१९
अधोमुखें भेद वाढतो । ऊर्ध्वमुखें भेद तुटतो । निःसंगपणें निर्गुणी तो ।
महायोगी ॥२२॥ माया मिथ्या ऐशी कळली । तरी मग भीड कां लागली ।
मायेचे भिडेनें घसरली । स्वरूपस्थिती ॥ २३ ॥ लटकें मायेनें दपटावें ।
सत्य परब्रह्म सांडावें । मुख्य निश्चयें हिंडावें । कासयासी ॥ २४ ॥ पृथ्वी-
मध्यें बहुत जन । त्यामध्यें असती सज्जन । परी साधूस वोळखतो कोण ।
साधूवेगळा ॥ २५ ॥ म्हणोन संसार सांडावा । मग साधूचा शोध घ्यावा ।
फिरफिरों ठायीं पाडावा । साधुजन ॥ २६ ॥ उदंड हुडकावे संत । सांपडे
प्रचीतीचा महंत । प्रचीतीविण स्वहित । होणार नाहीं ॥ २७ ॥ प्रपंच
अथवा परमार्थ । प्रचीतीविण अवघें व्यर्थ । प्रत्ययज्ञानी तो समर्थ ।
सकळांमध्यें ॥२८॥ रात्रंदिवस पाहावा अर्थ । अर्थ पाहेल तो समर्थ । पर-
लोकींचा निजस्वार्थ । तेथेंचि घडे ॥ २९ ॥ म्हणोनि पाहिलेंचि पाहावें ।
आणि शोधिलेंचि शोधावें । अवघें कळतां स्वभावें । संदेह तुटती ॥ ३० ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे विंशतिदशके सूक्ष्मनामाभिधाननिरूपणं
नाम तृतीयः समासः ॥ ३ ॥
४. शिवशक्ति.
श्रीगणेशाय नमः ॥ सकळ जनांस प्रार्थना । उगेंच उदास करावें ना ।
निरूपण आणावें मना । प्रत्ययाचें ॥ १ ॥ प्रत्यय राहिला एकीकडे । आप-
ण धांवतो भलतीकडे । तरी मग सारासाराचे निवाडे । कैसे होती ॥ २ ॥
उगीच पाहतां सृष्टी । गलबला दिसतो दृष्टी । परी राजसत्तेची गोष्टी । वेग-
ळीच ॥ ३ ॥ पृथ्वीमध्यें जितुकीं शरीरें । तितुकीं भगवंताचीं घरें । नाना
सुखें येणें द्वारें । प्राप्त होती ॥ ४ ॥ त्याचा महिमा कळेल कोणाला । माते-
वांचून कृपाळू झाला । प्रत्यक्ष जगदीश जगाला । रक्षितसे ॥ ५ ॥ सत्ता
पृथ्वीमध्यें वाढली । जेथें तेथें विभागली । कळेनें सृष्टी चालली । भगवंता-
ची ॥ ६ ॥ मूळ जाणत्या पुरुषाची सत्ता । शरीरीं विभागली तत्वतां । सक-
ळ कळा चातुर्यता । तेथें वसे ॥ ७ ॥ सकळ पुरुषांचा ईश । जगामध्यें जग-
दीश । नाना शरीरीं सावकाश । करूं लागे ॥ ८ ॥ पाहतां सृष्टीची रचना ।
१. प्रपंचदृष्टीनें. २. परमार्थदृष्टीनें. ३. ईशसत्ता. ४. व्यवहार करूं लागे.

ते एकाचेन चालेना । एकलाचि चालवी नाना । देह धरुनी ॥ ९ ॥ नाहीं
उंच नीच विचारिलें । नाहीं बरें वाईट पाहिलें । कार्य चालों ऐसें झालें ।
भगवंतासी ॥ १० ॥ किंवा नेणणें आडवें केलें । किंवा अभ्यासीं घातलें ।
हें कैसें कैसें केलें । त्याचा तोचि जाणे ॥ ११ ॥ जगदंतरीं अनुसंधान ।
बरें पाहणें हेंचि ध्यान । ध्यान आणि तें ज्ञान । एकरूप ॥ १२ ॥ प्राणी
संसारासि आला । कांहीं एक शाहाणा झाला । मग तो विवरों लागला ।
भूमंडळीं ॥ १३ ॥ प्रगट रामाचें निशान । आत्माराम ज्ञानघन । विश्वंभर
विद्यमान । भाग्यें कळे ॥ १४ ॥ उपासना धुंडीन वासना धरिली । तरी
ते लांबतचि गेली । महिमा न कळे हे बोली । यथार्थचि आहे ॥ १५ ॥
द्रष्टा म्हणिजे पाहता । साक्षी म्हणिजे जाणता । अनंतरूपी अनंता । वोळ-
खावें ॥ १६ ॥ संगती असावी भल्याची । धाटी कथानिरूपणाची । कांहीं
एक मनाची । विश्रांति आहे ॥ १७ ॥ त्याहिमध्यें प्रत्ययज्ञान । जाळून
टाकिलें अनुमान । प्रचीतीविण समाधान । पाविजेल कैंचें ॥ १८ ॥ मूळ-
संकल्प तो हरिसंकल्प । मूळमायेमधील साक्षेप । जगदंतरीं तेंचि रूप ।
देखिजेलें ॥ १९ ॥ उपासना ज्ञानस्वरूप । ज्ञानीं चौथा देहें आरोपें ।
या कारणें सर्व संकल्प । सोडून द्यावा ॥ २० ॥ पुढें परब्रह्म विशाल । गग-
नासारिखें पांकळ । घन पातळ कोमळ । काय म्हणावें ॥ २१ ॥ उपासना
म्हणिजे ज्ञान । ज्ञानें पाविजे निरंजन । योगियांचें समाधान । येणें रीती
॥ २२ ॥ विचारें नेहटूनसाँ पाहे । उपासना आपणचि आहे । एक जाय
एक राहे । वासना धरूनी ॥ २३ ॥ अखंड ऐशी घालमेली । पूर्वापार होत
गेली । आतांहि तैशीच चालिली । उत्पत्ति स्थिती ॥ २४ ॥ बनावरी बर्ने-
करांची सत्ता । जलावरी जलचरांची सत्ता । भूमंडळीं भूपाळांची सत्ता ।
येणेंचि न्यायें ॥ २५ ॥ सामर्थ्य आहे चळवळीचें । जो जो करील तयाचें ।
परंतु येथें भगवंताचें । अधिष्ठानें पाहिजे ॥ २६॥ कर्ता जगदीश हें तों खरें ।
परी विभाग आला पृथगाकारें । येथें अहंतेंचे कॉविरें । बाधिजेना ॥ २७ ॥
हरिदाँताँ हरिभोँक्ता । ऐसें चालतें तत्वतां । ये गोष्टीचा आतां । विचार पा-


तळटीपा :
१. मूळमाया. २. कल्पना. ३. लक्ष देऊन. ४. वनरक्षकाची. ५. आश्रय.
६. भ्रम. ७. हरिच देतो व हरिच सेवन करितो; (मी तूं हा भेद व्यर्थ आहे.)

२० वा.] चत्वार जिन्नस. ४२१
व्हावा ॥ २८ ॥ सकळ कर्ता परमेश्वरु । आपला मायिक विचारु । जैसें कळेल
तैसें करु । जगदंतरीं ॥ २९ ॥ देवायेंवढें चपळ नाहीं । ब्रह्मायेवढें निश्चळ
नाहीं । पायरीनें पायरी चढोनि पाहीं । मूळपर्यंत ॥३०॥ इति श्रीदासबोधे
गुरुशिष्यसंवादे विंशतिदशके शिवशक्तिनिरूपणं नाम चतुर्थः समासः ॥४॥
५. चत्वार जिन्नस.
श्रीगणेशाय नमः ॥ येथून पाहतां तेथवरी । चारी जिन्नस अवधारी । एक
चौदा पांच चारी । ऐसें आहे ॥ १ ॥ ब्रह्म सकळांहून वेगळें । ब्रह्म सकळां-
हून आगळें । नाना कल्पने निराळें । परब्रह्म तें ॥ २ ॥ परब्रह्माचा विचार ।
नाना कल्पनेहून पर । निर्मळ निश्चळ निर्विकार । अखंड आहे ॥ ३ ॥
परब्रह्मास कांहींच तुलेना । हा एक मुख्य जिन्नसाना । दुसरा जि-
न्नस नाना । कल्पना मूळमाया ॥ ४ ॥ नाना सूक्ष्मरूप । सूक्ष्मरूप आणि
कर्दंमरूप । मुळींच्या संकल्पाचा आरोप । मूळमाया ॥ ५ ॥ हरिसंकल्प मु-
ळींचा । आत्माराम सकळांचा । संकेत नामाभिधानाचा । ऐसा आहे ॥ ६ ॥
निश्चळीं चंचळ चेतलें । म्हणोनि चैतन्य बोलिलें । गुणसमानत्वें झालें ।
गुणसाम्य ऐसें ॥ ७ ॥ अर्धनारी नटेश्वर । तोचि षड्गुणेश्वर । प्रकृति पुरु-
षाचा विचार । शिवशक्ती ॥ ८ ॥ शुद्ध सत्वगुणाची मांडणी । अर्धमात्रा
गुणक्षोभिणी । पुढें तिही गुणांची करणी । प्रगट झाली ॥ ९ ॥ मन माया
अंतरात्मा । चौदा जिन्नसांची सीमा । विद्यमान ज्ञानात्मा । इतके ठायीं
॥ १० ॥ ऐसा हा दुसरा जिन्नस । अभिधानें चतुर्दश । आतां तिसरा जिन्न-
स । पंचमहाभूतें ॥ ११ ॥ येथें पाहतां जाणीव थोडी । आदि अंत रोकडी ।
खाणी निरूपिल्या तांतडी । तो चौथा जिन्नस ॥ १२ ॥ चारी खाणी अनंत
प्राणी । जणिवेची झाली दाटणी । चारी जिन्नस येथुनी । संपूर्ण झाले
॥ १३ ॥ बीज थोडें पेरिजेतें । पुढें त्याचें उदंड होतें । तैसें झालें आत्मया-
तें । खाणी वाणी प्रगटतां ॥ १४ ॥ ऐसी सत्ता प्रबळली । थोडे सत्तेची
उदंड झाली । मनुष्यवेषें सृष्टि भोगिली । नाना प्रकारें ॥ १५ ॥ प्राणी मा-
१. एक ब्रह्म, चौदा नांवें असलेली मूळमाया, पंचमहाभूतें, व चारी खाणी
असे हे चार जिन्नस सर्व ब्रम्हांडांत आहेत.

४२२ | श्रीदासबोध. | [दशक

रून श्वापद पळे । वरकड यास काय कळे । नाना भोग तो निबेळे¹ । मनुष्यदे-
हीं ॥ १६ ॥ नाना शब्द नाना स्पर्श । नाना रूप नाना रस । नाना गंध ते
विशेष । नरदेह जाणे ॥ १७ ॥ अमूल्य रत्नें नाना वस्त्रें । नाना यानें² नाना
शस्त्रें । नाना विद्या कळा शास्त्रें । नरदेह जाणे ॥ १८ ॥ पृथ्वी सत्तेनें व्यापली ।
स्थूलास्थूळीं आटोपली । नाना विद्या कळा केली । नाना धारणा ॥ १९ ॥
दृश्य अवघेंचि पाहावें । स्थानमान सांभाळावें । सारासार विचारावें । नर-
देह जाहलिया ॥ २० ॥ इहलोक आणि परलोक । नाना प्रकारचा विवेक ।
विवेक आणि अविवेक । मनुष्य जाणे ॥ २१ ॥ नाना पिंडब्रह्मांडरचना ।
नाना मुळींची कल्पना । नाना प्रकारची धारणा । मनुष्य जाणे ॥ २२ ॥ अष्ट
भोग³ नव रस । नाना प्रकारचा विलास । वाच्यांश लक्ष्यांश सारांश । म-
नुष्य जाणे ॥ २३ ॥ मनुष्यें सकळांसि आकळिलें⁴ । त्या मनुष्यास देवें पाळिलें ।
ऐसें हें अवघें कळलें । नरदेहयोगें ॥ २४ ॥ नरदेह परम दुर्लभ । येणें घडे अ-
लभ्य लाभ । दुर्लभ तें सुलभ । होत जातें ॥ २५ ॥ वरकड देह काबाड ।
नरदेह मोठें घबाड । परंतु पाहिजे जाड । विवेकरचना ॥ २६ ॥ येथें ज्यानें
आळस केला । तो सर्वस्वें बुडाला । देव नाहीं ओळखिला । विवेकबळें
॥ २७ ॥ नर तोचि नारायण । जरी प्रत्ययें करी श्रवण । मननशील अंतःक-
रण । सर्वकाळ ॥ २८ ॥ जेणें स्वयेंचि पोहावें । त्यासि कासेस नलगे लागावें ।
स्वतंत्रपणें शोधावें । सकळ कांहीं ॥ २९ ॥ सकळ शोधून राहिला । संदेह कैंचा
तयाला । पुढें विचार कैसा झाला । त्याचा तोचि जाणे ॥ ३० ॥ इति
श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे विंशतिदशके चत्वारजिन्नसनिरूपणं नाम
पंचमः समासः ॥ ५ ॥


६. आत्मगुण.
श्रीगणेशाय नमः ॥ पाहों जातां भूमंडळ । ठायीं ठायीं असे जळ । कि-
त्येक ते निर्मळ माळ । जळेंविण पृथ्वी ॥ १ ॥ तैसें दृश्य विस्तारलें । कांहीं
एक जाणीवेनें शोभलें । जाणीवरहित उरलें । कितीएक दृश्य ॥ २ ॥ चारी


१. प्रकटतो. २. वाहनें. ३. अन्न, उदक, तांबूल, पुष्प, चंदन, वसन, शय्या
आणि अलंकार हे आठ भोग. ४. आकलन केलें.

२० वा. ] आत्मगुण. ४२३
खाणी चारी वाणी । चौऱ्यायशीं लक्ष जीवयोनी । शास्त्रीं अवघें नेमूनी ।
बोलिलें असे ॥ ३ ॥ श्लोक ॥ जलजा नवलक्षाश्च दशलक्षाश्च पक्षिणः । कृ-
मयो रुद्रलक्षाश्च विंशल्लक्षा गवादयः ॥ स्थावरास्त्रिंशल्लक्षाश्च चतुर्लक्षाश्च
मानवाः । पापपुण्यं समं कृत्वा नरयोनिपु जायते ॥ १ ॥ टीका ॥
मनुष्यें चारी लक्ष । पशु तीस लक्ष । कृमि अक्रा लक्ष । बोलिले शास्त्रीं
॥ ४ ॥ दहा लक्ष ते खेंचर¹ । नव लक्ष जळचर । वीस लक्ष स्थावरें² ।
बोलिले शास्त्रीं ॥ ५ ॥ ऐसी चौऱ्यांशीं लक्ष जीवयोनी । जितुका
तितुका प्राणी । अनंत देहांची मांडणी । मर्यादा कैंची ॥ ६ ॥ अनंत
प्राणी होती जाती । त्यांचें अधिष्ठान जगती । जगतीवेगळी स्थिती । त्यांसि
कैंची ॥ ७ ॥ पुढें पाहतां पंचभूतें । पावलीं स्पष्ट दशेतें³ । कोणी विद्यमान
कोणी ते । उगींच⁴ असती ॥ ८ ॥ अंतरात्म्याची ओळखण । तेचि जेथ च-
पळपण । जाणीवेचें अधिष्ठान । सावध ऐका ॥ ९ ॥ सुख दुःख जाणता
जीव । तैसाच जाणावा सदाशिव । अंतःकरणपंचक अपूर्व । अंश आत्म-
याचा ॥ १० ॥ स्थूळीं आकाशाचे गुण । अंश आत्म्याचे जान । सत्व रज
तमोगुण । अंश आत्म्याचे ॥ ११ ॥ नाना चाळणा नाना धृती⁵ । नव-
विधा भक्ति चतुर्विधा मुक्ती । अलिप्तपण सहजास्थिती । गुण आत्म्याचे
॥ १२ ॥ द्रष्टा साक्षी ज्ञानघन । सत्ता चैतन्य पुरातन⁶ । श्रवण मनन वि-
वरण । गुण आत्म्याचे ॥ १३ ॥ दृश्य द्रष्टा दर्शन । ध्येय ध्याता ध्यान ।
ज्ञेय ज्ञाता ज्ञान । आत्मरूप ॥ १४ ॥ वेद शास्त्र पुराणार्थ । गुप्त चालिला
परमार्थ । सर्वज्ञपणें समर्थ । गुण आत्म्याचे ॥ १५ ॥ बद्ध मुमुक्षु साधक
सिद्ध । विचार पाहाणें शुद्ध । बोध आणि प्रबोध । गुण आत्म्याचे ॥ १६ ॥
जागृति स्वप्न सुषुप्ति तुर्या । प्रकृति पुरुष मूळमाया । पिंडब्रह्मांड अष्टकाया⁷ ।
गुण आत्म्याचे ॥ १७ ॥ परमात्मा आणि परमेश्वरी⁸ । जगदात्मा आणि ज-
गदीश्वरी । महेश आणि माहेश्वरी । गुण आत्म्याचे ॥ १८ ॥ सूक्ष्म जितुकें
नाम रूप । तितुकें आत्म्याचें स्वरूप । संकेत नामाभिधानें अमूप । सीमा
१. पक्ष्यादिक. २. वृक्षादिक. ३. दृश्य. ४. गुप्त. ५. धैर्य. ६. अनादि. ७. स्थूल,
सूक्ष्म, कारण, महाकारण, विराट, हिरण्यगर्भ, अव्याकृत आणि मूळप्रकृति
हीं आठ शरीरें. ८. मूळमाया.

४२४ श्रीदासबोध. [ दशक

नाहीं ॥ १९ ॥ आदिशक्ति शिवशक्ती । मुख्य मूळमाया सर्वशक्ती । नाना
जिन्नस उत्पत्ति स्थिती । तितुके गुण आत्मयाचे ॥ २० ॥ पूर्वपक्ष आणि
सिद्धांत ॥ गाणें वाजविणें संगीत । नाना विद्या अद्भुत । गुण आत्मयाचे
॥ २१ ॥ ज्ञान अज्ञान विपरीत ज्ञान । असद्वृत्ति सद्वृत्ति जाण । ज्ञप्तिमात्रें¹
अलिप्तपण । गुण आत्मयाचे ॥ २२ ॥ पिंडब्रह्मांडतत्वझाडा । नाना त-
त्वांचा निवाडा । विचार पाहणें उघडा । गुण आत्मयाचे ॥ २३ ॥ नाना
ध्यानें अनुसंधानें । नाना स्थिति नाना ज्ञानें । अनन्य आत्मनिवेदनें । गुण
आत्मयांचे ॥ २४ ॥ तेहतीस कोटी सुरवर । अष्ट्यायशीं सहस्र ऋषीश्वर ।
भूत खेचर अपार । गुण आत्मयाचे ॥ २५ ॥ भूतावळी औट कोटी । चा-
मुंडा छपन्न कोटी । कात्यायनी नव कोटी । गुण आत्मयाचे ॥ २६ ॥ चंद्र
सूर्य तारामंडळें । नाना नक्षत्रें ग्रहमंडळें । शेष कूर्म मेघमंडळें । गुण आ-
त्मयाचे ॥ २७ ॥ देव दानव मानव । नाना प्रकारांचे जीव । पाहतां स-
कळ भावाभाव । गुण आत्मयाचे ॥ २८ ॥ आत्मयाचे नाना गुण । निर्वि-
कार निर्गुण । जाणणें एकदेशीं पूर्ण² । गुण आत्मयाचे ॥ २९ ॥ आत्माराम
उपासना । तेणें पावलों निरंजना । निःसंदेह अनुमाना । ठावाच नाहीं
॥ ३० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे विंशतिदशके आत्मगुणनिरूपणं
नाम षष्ठः समासः ॥ ६ ॥
७. आत्मा.
श्रीगणेशाय नमः ॥ अनिर्वाच्य समाधान झालें । तें पाहिजे बोलिलें ।
बोलिल्यासाठीं समाधान गेलें । हें तों घडेना ॥ १ ॥ कांहीं सांडावें ला-
गत नाहीं । कांहीं मांडावें लागत नाहीं । एक विचार शोधून पाहीं । म्ह-
णिजे बरें ॥ २ ॥ मुख्य काशीविश्वेश्वर । सेतुबंध रामेश्वर । मल्लिकार्जुन
भीमाशंकर । गुण आत्मयाचे ॥ ३ ॥ जैशीं मुख्य बारालिंगें । याहीवेगळीं
अनंत लिंगें । प्रचित जाणिजे जगें । गुण आत्मयाचे ॥ ४ ॥ भूमंडळीं अ-
नंतशक्ती । नाना साक्षात्कार चमत्कार होती । नाना देवांच्या सामर्थ्य-
मूर्ती । गुण आत्मयाचे ॥ ५ ॥ नाना सिद्धांचीं सामर्थ्यं । नाना मंत्रांचीं
सामर्थ्यं । नाना मोहरें³ वल्लींत सामर्थ्यं । गुण आत्मयाचे ॥ ६ ॥ जितुके


१. ज्ञानस्वरूप. २. अपूर्ण किंवा पूर्ण जाणणें. ३. ओषधी मणी.

२० वा. ] आत्मा. ४२५
कांहीं उत्तम गुण । तितुके आत्मयाचें लक्षण । बरें वाईट तितुकें जाण ।
आत्मयाचकरितां ॥ ७ ॥ शुद्ध¹ आत्मा उत्तम गुणीं । सबळ² आत्मा अवल-
क्षणीं । बरें वाईट अवघी करणी । आत्मयाची ॥ ८ ॥ नाना साभिमान
धरणें । नानाकृति सृष्टि करणें । नाना शापडःशाप लक्षणें । आत्मयाचेनी ॥
९ ॥ पिंडाचा बरा शोध घ्यावा । तत्त्वांचा पिंड शोधावा । तत्त्वें शोधितां
पिंड अघवा । कळों येतो ॥ १० ॥ जड देह भूतांचा । चंचळ गुण आत्म-
याचा । निश्चळ ब्रह्मावेगळा ठाव कैंचा । जेथें तेथें ॥ ११ ॥ निश्चळ चंचळ
आणि जड । पिंडीं करावा निवाड । प्रत्ययावेगळें जाड । बोलणें नाहीं ॥
१२॥ पिंडामधून आत्मा जातो । तेव्हां निवाडा कळों येतो । देह जड हा पडतो ।
देखतदेखतां ॥१३॥ जड तितुकें पडलें । चंचळ तितुकें निघोन गेलें । जडचंच-
ळाचें रूप आलें । प्रत्ययासी ॥ १४ ॥ निश्चळ आहे सकळां ठायीं । हें तों
पाहणें नलगे कांहीं । गुणविकार तेथें नाहीं । निश्चळासी ॥ १५ ॥ जैसें
पिंड तैसें ब्रह्मांड । विचार दिसतो उघड । जड चंचळ जातां जाड । पर-
ब्रह्मचि आहे ॥ १६ ॥ महाभूतांचा खंबींर³ केला । आत्मा घालून पुतळा
झाला । चालिला सृष्टीचा गलबला । येणें रीती ॥ १७ ॥ आत्मा माया⁴-
विकार करी । आळ घालिती ब्रह्मावरी । प्रत्ययें सकळ कांहीं विवरी । तोचि
भला ॥ १८ ॥ ब्रह्म व्यापक अखंड । वरकड व्यापकता खंड । शोधून पा-
हतां जड । कांहींच नाहीं ॥ १९ ॥ गगनास खंडितां न ये । गगनाचें ना-
सेल काय । जरी झाला महाप्रलय । सृष्टिसंहार ॥ २० ॥ जें संहारामध्यें
सांपडलें । सहजचि नाशवंत झालें । जाणते लोकीं उगविलें । पाहिजे कोडें
॥ २१ ॥ न कळतां वाटे कोडें । कळतां अवघें दिसे उघडें । म्हणोनि ए-
कांतीं निवाडें । विचार पाहावा ॥ २२ ॥ मिळतां प्रत्ययाचे संत । एकांता-
परीस एकांत । केली पाहिजे सावचित । नाना चर्चा ॥ २३ ॥ पाहिल्या-
वेगळें कळत नाहीं । कळतां कळतां संदेह नाहीं । विवेक पाहतां कोठेंचि
नाहीं । मायाजाळ ॥ २४ ॥ गगनीं आभाळ आलें । मागुती सवेंचि उ-
डालें । आत्म्याकरितां दृश्य झालें । उडेल तैसें ॥ २५ ॥ मुळापासून शेवट-
वरी । विवेकी विवेकें विवरी । तो निश्चय थावरी । चळेना ऐसा ॥ २६ ॥
१. निरुपाधिक. २. शबल, सोपाधिक आत्मा; जीव. ३. मूर्ति. ४. मायेचे विकार.

४२६श्रीदासबोध.[ दशक

वरकड निश्चय अनुमानाचे । अनुमानें बोलतां काय वेंचे । जाणते पुरुष
प्रचीतींचे । ते तों मानीतना ॥ २७ ॥ उगीच बोलणें अनुमानाचें । अनु-
मानाचें कोण्या कामाचें । येथें सगट विचाराचें । काम नाहीं ॥ २८ ॥ स-
गट विचार तो अविचार । किती एक म्हणती एकंकार । एकंकार भ्रष्टाकार ।
करूं नये ॥ २९ ॥ कृत्रिम अवघें सांडावें । कांहीं एक शुद्ध घ्यावें । जाण-
जाणोनि निवडावें । सारासार ॥ ३० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
विंशतिदशके आत्मनिरूपणं नाम सप्तमः समासः ॥ ७ ॥


८. देहक्षेत्र.
श्रीगणेशाय नमः ॥ विधिप्रपंचतरु¹ वाढला । वाढतां वाढतां विस्तीर्ण
झाला । फळें येतां विश्रांति पावला । बहुत प्राणी ॥ १ ॥ नाना फळें रसाळें
लागलीं । नानाजिन्नसें² गोडीस आलीं । गोडी पाहावया निर्माण केलीं ।
नाना शरीरें ॥ २ ॥ निर्माण जाहले उत्तम विषय । शरीराविणें भोगितां
न ये । म्हणोनि निर्मिला उपाय । नाना शरीरें ॥ ३ ॥ ज्ञानेंद्रियें निर्माण
केलीं । भिन्न भिन्न गुणांचीं निर्मिलीं । एका शरीरास लागलीं । परी वेगळालीं
॥ ४ ॥ श्रोत्रेंद्रियीं शब्द पडिला । त्याचा भेद पाहिजे कळला । ऐसा उपाय
निर्माण केला । इंद्रियांमध्यें ॥ ५ ॥ त्वचेंद्रियें शीतोष्ण भासे । चक्षुरिंद्रियें
सकळ दिसे । इंद्रियांमध्यें गुण ऐसे । वेगळाले ॥ ६ ॥ जिव्हेमध्यें रस चाखणें ।
घ्राणामध्यें परिमळ घेणें । इंद्रियांमध्यें वेगळाल्या गुणें । भेद केले ॥ ७ ॥ वायु-
पंचकीं अंतःकरणपंचक । मिसळोन फिरे निःशंक । ज्ञानेंद्रियें कर्मेंद्रियें सक-
ळिक । सावकाश पाहे ॥ ८ ॥ कर्मेंद्रियें लागवेगें³ । जीव भोगी विषयां-
लागीं । ऐसा हा उपाय जगीं । ईश्वरें केला ॥ ९ ॥ विषय निर्माण झाले
बरवे । शरीराविण कैसे भोगावे । नाना शरीरांचे गोवे । याच कारणें ॥ १० ॥
अस्थिमांसांचीं शरीरें निर्माण केलीं । विषयभोगें वाढविलीं । लहान थोर
निर्माण झालीं । येणें प्रकारें ॥ ११ ॥ अस्थिमांसांचीं शरीरें । निर्माण केलीं
जगदीश्वरें । विवेकें गुणविचारें । करूनियां ॥ १२ ॥ अस्थिमांसांचा पुतळा ।
जाणे ज्ञानें सकळ कळा । शरीरभेद वेगळा । ठायीं ठायीं ॥ १३ ॥ तो भेद


तळटीपा :
१. ब्रह्मदेवाचा संसार हाच कोणी एक वृक्ष.
२. अनेक प्रकारें.
३. उत्कंठेनें.

२० वा. ] सूक्ष्म ब्रह्म. ४२७
कार्याकारण । त्याचा उदंड आहे गुण । सकळ तीक्ष्णबुद्धीविण । काय कळे
॥ १४ ॥ सकळ करणें ईश्वराला । म्हणोनि भेद निर्माण केला । ऊर्ध्वमुख होतां
भेदाला । ठाव कैंचा ॥ १५ ॥ सृष्टिकर्मीं अगत्य भेद । संहारें सहजचि
अभेद । भेद अभेद हा संवाद । मायागुणें ॥ १६ ॥ मायेमध्यें अंतरात्मा ।
न कळे तयाचा महिमा । झाला चतुर्मुख ब्रह्मा । तोहि संदेहीं पडे ॥ १७॥
पीळ पेंच कडोविकर्डीं । तर्क तीक्ष्ण घडीनें घडी । मनासि होय तांतडी ।
विवरण करितां ॥ १८ ॥ आत्मत्वीं लागलें सकळ कांहीं । निरंजनीं हें
कांहींच नाहीं । एकांतकाळीं समजोन पाहीं । म्हणिजे बरें ॥ १९ ॥ देह-
सामर्थ्यानुसार । सकळ करी जगदीश्वर । थोर सामर्थ्यं अवतार । बोलि-
जेती ॥ २० ॥ शेष कूर्म वराह झाले । येव्हढे देह विशाल धरिले । तेणें-
करितां रचना चाले । सकळ सृष्टीची ॥ २१ ॥ ईश्वरें केव्हडें यंत्र केलें । सूर्य-
बिंब धांवाया लाविलें । धुक्टाकरवीं धरविलें । अगाध पाणी ॥ २२ ॥
पर्वता ऐसें ढग उचलती । सूर्यबिंबास आच्छादिती । तेथें सर्वैचि वायूची गती ।
प्रगट होय ॥ २३ ॥ झिडझिडकूं धांवे वारा । जैसा काळाचा म्हणियांरा ।
ढग मारून दिनकरा । मोकळें करी ॥ २४ ॥ बैसती विजांचे तडाखे ।
प्राणिमात्र अवचितां धाके । गगन कडकडून तडके । स्थळांतरीं ॥ २५ ॥
एकासि एक वर्म केलें । महद्भूतें महद्भूत आलिलें । सकळ समभागें चालि-
लें । सृष्टिरचनेसी ॥ २६ ॥ ऐसे अनंत भेद आत्मयाचे । सकळ जाणती ऐसें
कैंचे । विवरतां विवरतां मनाचे । फडके होती ॥ २७ ॥ ऐसी माझी उपा-
सना । उपासकीं आणावी मना । अगाध महिमा चतुरानना । काय कळे
॥ २८ ॥ आवाहनविसर्जन । हेंचि भजनाचें लक्षण । सकळ जाणती सजन ।
मी काय सांगों ॥ २९ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे विंशतिदशके
देहक्षेत्रनिरूपणं नाम अष्टमः समासः ॥ ८ ॥


९. सूक्ष्मब्रह्म.
श्रीगणेशाय नमः ॥ मृत्तिकापूजन करावें । आणि सर्वैचि विसर्जावें ।


१. आत्मरूपासन्निध. २. युक्तिप्रयुक्तीनें. ३. धुराचे मेघ बनविले, असा भाव.
४. चाकर. ५. ठिकऱ्या ठिकऱ्या. ६. मायेची उभारणी आणि संहारणी.

३२८ श्रीदासबोध. [ दशक
हें मानेना स्वभावें । अंतःकरणासी ॥ १ ॥ देव पूजावा आणि टाकावा ।
हें प्रशस्त न वाटे जीवा । याचा विचार पहावा । अंतर्यामीं ॥ २ ॥ देव
करिंजे ऐसा नाहीं । देव टाकिजे ऐसा नाहीं । म्हणोन याचा कांहीं । विचार
पाहावा ॥ ३ ॥ देव नाना शरीरें धरितो । धरूनि मागुती सोडितो । तरी
तो देव कैसा आहे तो । विवेकें ओळखावा ॥४॥ नाना साधनें निरूपणें ।
देव शोधायाकारणें । सकळ आपुल्या अंतःकरणें । समजलें पाहिजे ॥ ५ ॥
ब्रह्मज्ञानाचा उपाय । समजल्याविण देतां न ये । पदार्थ आहे मा घे जाय ।
ऐसें म्हणावें ॥ ६ ॥ सगट लोकांचे अंतरींचा भाव । मज प्रत्यक्ष भेटवावा
देव । परंतु विवेकाचा उपाव । वेगळाचि आहे ॥ ७ ॥ विचार पाहतां
तगेना । त्यास देव ऐसें म्हणवेना । परंतु जन राहेना । काय करावें ॥८॥
थोर लोक मरौन जाती । त्यांच्या सुरता करूनि पाहती । तैशीच आहे ही
गती । उपासनेची ॥ ९ ॥ थोर व्यापार ठाकेना जनीं । म्हणोनि केली
रखतवानी । राज्यसंपदा तयाचेनी । प्राप्त कैंची ॥ १० ॥ म्हणोनि जितुका
भोळा भाव । तितुका अज्ञानाचा स्वभाव । अज्ञानें तरी देवाधिदेव । पा-
विजेल कैंचा ॥ ११ ॥ अज्ञानासि ज्ञान न माने । ज्ञात्यास अनुमान न
माने । म्हणोनि सिद्धांचिये खुणे । पावलें पाहिजे ॥ १२ ॥ माया सांडून
मुळासि जावें । तरीच समाधान पावावें। ऐसें न होतां भरंगळावें । भलती-
कडे ॥१३॥ माया उल्लंघायाकारणें । देवासि नाना उपाय करणें । अध्यात्म-
श्रवणपंथेंचि जाणें । प्रत्ययानें ॥ १४ ॥ ऐसें न करितां लौकिकीं । अवघीच
होते चुकाचुकी । स्थिति खरी आणि लटिकी । ऐशी ओळखावी ॥ १५ ॥
खोट्याचे वाटे जाऊं नये । खोट्याची संगति धरूं नये । खोटें संग्रहीं करूं
नये । कांहीं एक ॥ १६ ॥ खोटें तें खोटेंचि खोटें । खऱ्यासि तगेना तें
बालटें । मन अधोमुख तें उफरटें । केलें पाहिजे ॥१७॥ अध्यात्मश्रवण करीत
जावें । म्हणजे सकळ कांहीं फावे । नाना प्रकारांचे गोवे । तुटोनि जाती
॥ १८ ॥ सूत गुंतलें तें उकलावें । तैसें मन उगवावें । मानत मानत घा-
लावें । मुळाकडे ॥ १९ ॥ सकळ कांहीं कालवलें । त्या सकळांचें सकळ
जाहलें । शरीरीं विभागलें । सकळ कांहीं ॥२०॥ काय तें येथेंचि पाहावें ।
१. तसविरी. २. मजूरकाम. ३. प्रवृत्तिमार्गात असलेले. ४. निवृत्त.

कैसें तें येथेंचि शोधावें । सूक्ष्माचीं चौदा नांवें । येथेंचि समजावीं ॥ २१ ॥
निर्गुण निर्विकार एक । तें सर्वां ठायीं व्यापक । देहामध्यें तें निष्कलंका ।
आहे कीं नाहीं ॥ २२ ॥ मूळमाया संकल्परूप । तें अंतःकरणाचें स्वरूप ।
जड चेतवी चैतन्यरूप । तेंहि शरीरीं आहे ॥ २३ ॥ समान गुण गुणसाम्य ।
सूक्ष्म विचार तो अगम्य । सूक्ष्म साधु जाण ते प्रणम्ये¹। तयां समस्तांसी
॥ २४ ॥ द्विधा भासतें शरीर । वामांगें दक्षिणांग² विचार । तोचि अर्धनारी
नटेश्वर । पिंडीं ओळखावा ॥ २५ ॥ तोचि प्रकृति पुरुष जाणिजे । शिव-श-
क्ति बोलिजे । षड्गुणेश्वर बोलिजे । तया कर्दमासी ॥ २६ ॥ तयासीच
म्हणिजे महत्तत्त्व । मीपणें तयास अहंतत्त्व । निश्चयें बुद्धितत्व । तयासीच
म्हणती ॥ २७ ॥ त्रिगुणें चालतें शरीर । प्रत्यक्ष दिसे विचार । मुळींच्या
कर्दमाचें शरीर । ऐसें जाणावें ॥ २८ ॥ मन माया आणि जाणीव । हाहि
दिसतो स्वभाव । चौदा नामांचा अभिप्राय । पिंडीं पाहावा ॥ २९ ॥ पिंड
पडतां अवघेंचि जातें । परंतु परब्रह्म राहतें । शाश्वत समजोन मग तें । दृढ
धरावें ॥ ३० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे विंशतिदशके सूक्ष्म-
ब्रह्मनिरूपणं नाम नवमः समासः ॥ ९ ॥


१०. विमल ब्रह्म.
श्रीगणेशाय नमः ॥ धरूं जातां धरितां नये । टाकूं जातां टाकितां नये ।
जेथें तेथें आहेच आहे । परब्रह्म तें ॥ १ ॥ जिकडे तिकडे जेथें तेथें ।
विन्मुख होतां सन्मुख होतें । सन्मुखपण चुकेना तें । कांहीं केल्या ॥ २ ॥
बैसलें माणूस उठोन गेलें । तेथें आकाशचि राहिलें । आकाश चहूंकडे ।
पाहिलें । तरी सन्मुखचि आहे ॥ ३ ॥ जिकडे जिकडे प्राणी पळोन जातें ।
तिकडे आकाशाचि भोंवतें । बळें आकाशाबाहेर तें । कैसें जावें ॥४॥ जि-
कडे जिकडे प्राणी पाहे । तिकडे सन्मुखचि आहे । समस्तांचे मस्तकीं राहे ।
मध्यान्हीं मार्तंड जैसा ॥ ५ ॥ परी तो आहे एकदेशी । दृष्टांत न घडे व-
स्तूसी । कांहीं एक चमत्कारासी । देऊन पाहिलें ॥ ६ ॥ नाना तीर्थे ना-
ना देशीं । कष्टत जावें पाहावयासी । तैसें नलगे परब्रह्मासी । बैसले ठायीं


१. प्रणाम, नमस्कार. २. डावा व उजवा भाग.

॥ ७ ॥ प्राणी बैसोनीच राहतां । अथवा बहुत पळोन जातां । परब्रह्म तें
तत्वतां । समागमें ॥ ८ ॥ पक्षी अंतराळीं गेला । भोवतें आकाशाचि तया-
ला । तैसें ब्रह्म प्राणियाला । व्यापून असे ॥ ९ ॥ परब्रह्म पोकळ घनदाट ।
परब्रह्म शेवटाचा शेवट । ज्यासि त्यासि ब्रह्म नीट । सर्वकाळ ॥१०॥ दृश्य
सबाह्य अंतरीं । ब्रह्म दाटलें ब्रह्मांडोदरीं । अरे त्या निर्मळाची सरी । कोणास
यावी ॥ ११ ॥ वैकुंठ कैलास स्वर्गलोकीं । इंद्रलोकीं चौदा लोकीं । प-
न्नागादि पाताळलोकीं । तेथेंहि आहे ॥१२॥ काशीपासून रामेश्वर । अवघें दाटलें
अपार । पाहतां पाहतां पारावार । त्यास नाहीं ॥ १३ ॥ परब्रह्म तें एकलें ।
एकदाचि सकळांस व्यापिलें । सकळांस स्पर्शोन राहिलें । सकळां ठायीं
॥ १४ ॥ परब्रह्म पाउसें भिजेना । अथवा चिखलानें भरेना । पुरामध्ये परी
वाहेना । पुरासमागमें ॥ १५ ॥ एकसरें सन्मुख । वाम १ सव्य २ दोहोंकडे
एक । अधोर्ध्व प्राणी सकळिक । व्यापून आहे ॥ १६ ॥ आकाशाचा डोहो
भरला । कदापि नाहीं उचंबळला । असंभाव्य पसरला । जिकडे तिकडे
॥ १७ ॥ एकजिनसी गगन उदास । जेथें नाहीं दृश्य भास । भासेंविण
निराभास । परब्रह्म जाणावें ॥ १८ ॥ संत साधु महानुभावां । देव दानव
मानवां । परब्रह्म सकळांस विसांवा । विश्रांति ठाव ॥ १९ ॥ कोणीकडे
शेवटास जावें । कोणीकडे काय पाहावें । असंभाव्य तें मानावें । काय म्ह-
णोनी ॥ २० ॥ स्थूल नव्हे सूक्ष्म नव्हे । कांहीं एक सारिखें नव्हे । ज्ञान-
दृष्टीविण नव्हे । समाधान ॥ २१ ॥ पिंडब्रह्मांड निरास । मग तें ब्रह्म निरा-
भास । येथून तेथवरी आकाश । भकासरूपें ॥ २२ ॥ ब्रह्म व्यापक हें तों
खरें । दृश्य आहे तों हें उत्तरें । व्यापाविण कोण्या प्रकारें । व्या-
पक म्हणावें ॥ २३ ॥ ब्रह्मासि शब्दाचि लागेना । कल्पना कल्पूं शकेना ४ ।
कल्पनेतीत निरंजना । विवेकें ओळखावें ॥ २४ ॥ शुद्ध सार श्रवण । शुद्ध
प्रत्ययाचें मनन । विज्ञानीं पावत उन्मन ३ । सहजाचि होतें ॥ २५ ॥ झालें
साधनाचें फळ । संसार झाला सकळ । निर्गुण ब्रह्म तें निश्चळ । अंतरीं
बिंबलें ॥ २६ ॥ हिशेब झाला मायेचा । झाला निवाडा तत्वांचा । साध्यें
होतां साधनाचा । ठाव नाहीं ॥ २७ ॥ स्वप्नीं जें जें देखिलें । तें तें जागृ-


१. डावें. २. उजवें. ३. संकल्पविकल्परहित स्थिति. ४. ब्रह्मरूप.

२० वा.] विमल ब्रह्म. ४३१
तीस उडालें । सहजाचि अनिर्वाच्यें झालें । बोलतां न ये ॥ २८ ॥ ऐसें हें
विवेकें जाणावें । प्रत्ययें खुणेसि बाणावें । जन्ममृत्यूंच्या नांवें । शून्याकार
॥ २९ ॥ भक्तांचेनी साभिमानें । कृपा केली दाशरथीनें । समर्थकृपेचीं
वचनें । तो हा दासबोध ॥ ३० ॥ वीस दशक दासबोध । श्रवणद्वारें घेतां
शोध । मननकर्त्यास विशद । परमार्थ होतो ॥ ३१ ॥ वीस दशक दोन-
शें समास । साधकें पाहावे सावकाश । विवरतां विशेषाविशेष । कळों
लागे ॥ ३२ ॥ ग्रंथाचें करावें स्तवन । स्तवनाचें काय प्रयोजन । येथें प्रत्य-
यास कारण । प्रत्यय पाहावा ॥ ३३ ॥ देह तंव पांचां भूतांचा । कर्ता
आत्मा तेथींचा । आणि कवित्वप्रकार मनुष्यांचा । कशावरुनी ॥ ३४ ॥
सकळ करणें जगदीशाचें । आणि कवित्व मनुष्यांचें । ऐशा अप्रमाण बोल-
ण्याचें । काय घ्यावें ॥ ३५ ॥ सकळ देहांचा झाडा केला । तत्वसमुदाय
उडाला । तेथें कोणत्या पदार्थाला । आपुलें म्हणावें ॥ ३६ ॥ ऐसीं हीं वि-
चाराचीं कामें । उगीच भ्रमो नये भ्रमें । जगदीशेश्वरें अनुक्रमें । सकळ केलें
॥ ३७ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे विंशतिदशके विमलब्रह्मनिरू-
पणं नाम दशमः समासः ॥ १० ॥ ओंवी ३०८.
एकूण ओंवीसख्या ७७५०.
समाप्त.
१. बोलून दाखविण्यास कठीण. २. रघुवीरानें.

॥ श्री ॥
दासबोधाची आरती.
जय जय दासबोधा ग्रन्थराज प्रसिद्धा ।
आरती वोवाळीन विमळज्ञान बाळबोधा ॥ ध्रु० ॥
वेदांतसंमतीचा काव्यसिंधु भरला ।
श्रुति शास्त्रग्रन्थ गीता साक्ष संगम केला ।
महानुभाव संतजनीं अनुभव चाखिला ।
अज्ञान जड जीवां मार्ग सुगम जाला ॥ १ ॥
नवविधा भक्तिपंथें रामरूप अनुभवी ।
चातुर्यनिधी मोठा मायाचक्र उगवी ।
हरिहरहृदयींचें गुह्य प्रगट दावी ।
बद्धाचि सिद्ध जाले असंख्यात मानवी ॥ २ ॥
वीसही दशकींचा अनुभव जो पाहे ।
नित्यनेमें विवरितां स्वयें ब्रह्मचि होय ।
अपार पुण्य गांठीं तरी श्रवण लाहे ।
कल्याणलेखकाचे भावगर्भ हृदयीं ॥ ३ ॥