सामग्री पर जाएँ
सर्वकोश
संग्रह पर लौटें

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary

समर्थ रामदास स्वामी द्वारा

DevanagariHindipublished467 पृष्ठ

१ ला.] संतस्तवन. ९
अणुरेणुभादिक ॥ ७ ॥ चिरलें वालाग्रे तेंहि प्रकाशी । परी तो दाखवीना
वस्तूसी । तें जयाचेनि साधकासी । प्राप्त होय ॥ ८ ॥ जेथें आक्षेपें आटले ।
जेथें प्रयत्न पस्तावले । जेथें तर्क मंदावले । तर्कितां निजवस्तूसी ॥ ९ ॥
बळें विवेकाची वेंगडी । पडे शब्दाची बोबडी । जेथें मनाची तांतडी । कामा
नये ॥ १० ॥ जो बोलकेपणें विशेष । सहस्र मुखांचा जो शेष । तोहि
शिणला निःशेष । वस्तु न सांगवे ॥ ११ ॥ वेदें प्रकाशिलें सर्वही । वेद-
रहित कांहीं नाहीं । तो वेद कोणासही । दाखवूं शकेना ॥ १२ ॥ तेचि
वस्तु संतसंगें । स्वानुभवें कळों लागे । त्यांचा महिमा वचनीं सांगे । ऐसा
कवण ॥ १३ ॥ विचित्र कळा ये मायेची । परी ओळखी न सांगवे वस्तूची ।
मायातीत अनंताची । संत सोर्य सांगती ॥ १४ ॥ वस्तूसि वर्णिलें न वैचे ।
तेंचि स्वरूप संतांचें । या कारणें वचनाचें । कार्य नाहीं ॥ १५ ॥ संत
आनंदाचें स्थळ ॥ संत सुखचि केवळ । नाना संतोषाचें मूळ । ते हे संत
॥ १६ ॥ संत मोक्षाची विश्रांती । संत तृप्तीची निजतृप्ती । नातरी भक्तीची
फलश्रुती । ते हे संत ॥ १७ ॥ संत धर्मांचें क्षेत्र । संत स्वरूपांचें सत्पात्र ।
नातरी पुण्यचि पवित्र । पुण्यभूमी ॥ १८ ॥ संत समाधींचें मंदिर । संत
विवेकाचें भांडार । नातरी बोलिजे माहेर । सायुज्यमुक्तीचें ॥ १९ ॥ संत
सत्याचा निश्चय । संत सार्थकाचा जय । संत प्राप्तीचा समय । सिद्ध-
स्वरूप ॥ २० ॥ मोक्षश्रिया अलंकृत । ऐसे हे संत श्रीमंत । जीव दारिद्री
असंख्यात । नृपति केले ॥ २१ ॥ जे समर्थपणें उदार । जे कां अत्यंत दान-
शूर । तयांचेनि हा ज्ञानविचार । दिधला न वचे ॥ २२ ॥ महाराजे चक्र-
वर्ती । झाले आहेत पुढें होती । परंतु कोणी सायुज्यमुक्ती । देणार नाहीं ।
२३ ॥ जें त्रैलोक्याँ नाहीं दान । तेंचि करिती संतसज्जन । तया संतांचें
महिमान । काय म्हणोनि वर्णावें ॥ २४ ॥ जें त्रैलोक्याहूनि वेगळें । जें
वेदश्रुतींसी नौकळे । तेंचि जयांचेनि वोळे परब्रह्म अंतरीं ॥ २५ ॥ ऐसी
१. केंसाचें अग्र. २. शंका, प्रश्न. ३. वेंगडी वळे–विवेक संकुचित होतो, असा
भाव. ४. मार्ग. ५. न जाई, वर्णिले जात नाहीं. ६. पुण्य उत्पन्न होण्याचें स्थळ.
७. ब्रह्माचें. ८. ब्रह्मरूप होणें एतद्रूप मुक्तीचें. ९. मोक्षरूप लक्ष्मीनें. १०. सार्वभौम.
११. समजत नाहीं.

१० श्रीदासबोध. [ दशक
संतांची महिमा । बोलिजे तितुकी उणी उपमा । जयांचेनि मुख्य परमात्मा
प्रगट होय ॥ २६ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे प्रथमदशके संत-
स्तवनं नाम पंचमः समासः ॥ ५ ॥
६. श्रोतृस्तवन.
श्रीगणेशाय नमः ॥ आतां वंदूं श्रोते जन । भक्त ज्ञानी संत सज्जन ।
विरक्त योगी गुणसंपन्न । सत्यवादी ॥ १ ॥ एक सत्वाचे सागर । एक बु-
द्धीचे आगर । एक श्रोते वैरागरे । नाना शब्दरत्नांचे ॥ २ ॥ जे नाना
अर्थामृताचे भोक्ते । जे प्रसंगीं वक्त्याचे वक्ते । नाना संशयाचे छेदिते । नि-
श्चयी पुरुष ॥ ३ ॥ ज्यांची धारणा अपार । जे ईश्वराचे अवतार । नातरी
प्रत्यक्ष सुरवर । बैसले जैसे ॥ ४ ॥ कीं ऋषीश्वरांची मंडळी । शांतस्वरूप
सत्वागैळी । जयांचेनि सभामंडळीं । परम शोभा ॥ ५ ॥ हृदयीं वेदगर्भ
विलसे । मुखीं सरस्वती विलासे । साहित्य बोलतां जैसे । भासती देवगुरु ॥
६ ॥ जे पवित्रपणें वैश्वानरें । जे स्फूर्तिकिरणाचे दिनकर । ज्ञातेपणें दृष्टी-
समोर । ब्रह्मांड नये ॥ ७ ॥ जे अखंड सावधान । जयांसि त्रिकाळींचें
ज्ञान । सर्वकाळ निरभिमान । आत्मज्ञानी ॥ ८ ॥ ज्यांचे दृष्टीखालून गेलें ।
ऐसें कांहींच नाहीं उरलें । पदार्थमात्रासि लक्षिलें । मनें जयांच्या ॥ ९ ॥
जें जें कांहीं आठवावें । तें तें तयांसि पूर्वीच ठावें । तेथें काय अनुवादावें ।
ज्ञातेपणेंकरूनी ॥ १० ॥ परंतु हे गुणग्राहक । म्हणोनि बोलतों निःशंक ।
भाग्यपुरुष काय एक । सेवीत नाहीं ॥ ११ ॥ सदा सेवती दिव्यान्नें ।
पालटाकारणें अवीट अन्नें । तैसीं हीं माझीं वचनें । प्राकृत ॥ १२ ॥ आपुले
शक्त्यनुसार । भावें पुजावा परमेश्वर । परंतु पुजूं नये हा विचार । कोठेंचि
नाहीं ॥ १३ ॥ तैसा मी एक वाग्दुर्बळ । श्रोते परमेश्वरचि केवळ । त्यांची
पूजा वाचाबरळ । करूं पाहे ॥ १४ ॥ व्युत्पत्ति नाहीं कळा नाहीं । चातुर्य
नाहीं प्रबंध नाहीं । भक्ति ज्ञान वैराग्य नाहीं । गौळ्यतां नाहीं वचनाची ॥
१. धैर्याचे, किंवा सत्वगुणाचे. २. खान. ३. सत्वगुणानें अधिक. ४. वेदांत
वर्णन केलेलें ब्रह्म. ५. अलंकारयुक्त भाषण. ६. बृहस्पति. ७. अग्नि. ८. वाणीनें
वरळणारा, वाचाट. ९. रसाळपणा.

१५॥ ऐसा माझा वाग्विलास । निःशंक बोलतों सावकाश । भावाचा
भोक्ता जगदीश । म्हणोनियां ॥ १६ ॥ तुम्ही श्रोते जगदीशमूर्ती । तेथें
माझी व्युत्पत्ति किती । बुद्धिहीन अल्पमती । सलगी करितों ॥ १७ ॥
समर्थांचा पुत्र मूर्ख जगीं । परी सामर्थ्य असे त्याच्या अंगीं । तुम्हां संतांची
मी सलगी । म्हणोनि करितों ॥ १८ ॥ व्याघ्र सिंह भयानक । देखोनि
भयचकित होती लोक । परी त्यांचीं पिलीं निःशंक । तयांपुढें खेळती ॥
१९ ॥ तैसा मी संतांचा अंकित । तुम्हां संतापाशीं बोलत । परी माझी
चिंता तुमचें चित्त । वाहेलचि कीं ॥ २० ॥ आपुलेंचि बोले वाडगें । त्याची
संपादणी करणेंच लागे । परंतु कांहीं सांगणें नलगे । न्यून तें पूर्ण करावें ॥
२१ ॥ हें तों प्रतीतीचें लक्षण । स्वभावेंचि करी मन । तैसे तुम्ही संत सज्जन ।
मायबाप विश्वाचे ॥ २२ ॥ माझा आशय जाणोनि जीवें । आतां उचित
तें करावें । पुढें कथेसि अवधान द्यावें । म्हणे दासानुदास ॥ २३ ॥ इति श्री-
दासबोधे गुरुशिष्यसंवादे प्रथमदशके श्रोतृस्तवनं नाम षष्ठः समासः ॥ ६ ॥

७. कवीश्वरस्तवन.
श्रीगणेशाय नमः ॥ ॥ आतां वंदूं कवीश्वर । जे शब्दसृष्टीचे ईश्वर ।
नातरी हे परमेश्वर । वेदावतारी ॥ १ ॥ कीं हे सरस्वतीचें निजस्थान ।
कीं हे नाना कळांचें जीवन । नाना शब्दांचें भूषण । यथार्थ होय ॥ २ ॥
कीं हे पुरुषार्थांचें¹ वैभव । कीं हे जगदीशाचें महत्व । नाना लाघव सत्की-
र्तीस्तव । निर्माण कवी ॥ ३ ॥ कीं हे शब्दरत्नांचे सागर । कीं हे मुक्तांचें
मुक्तें² सरोवर । नाना बुद्धीचे वैरागर³ । निर्माण जाहले ॥ ४ ॥ कीं हे
अध्यात्मरत्नाची खाणी । कीं हे बोलके चिंतामणी । नाना कामधेनूंची
दुभणी । वोळली श्रोत्यांवरी ॥ ५ ॥ कीं हे कल्पनेचे कल्पतरू । कीं हे
मोक्षाचे मुख्य पडिभरू⁵ । नाना सायुज्यतेचे विस्तारू । विस्तारले ॥ ६ ॥
कीं हा परलोकींचा निजस्वार्थे⁴ । कीं हा योगियांचा गुप्त पंथ । नाना ज्ञा-
नियांचा परमार्थ । रूपासि आला ॥ ७ ॥ कीं हे निरंजनाची⁶ खूण । कीं हे


१. धर्म, अर्थ, काम व मोक्ष यांचे. २. खुलें, मोकळें. ३. खाण ४. प्राप्त
झाली. ५. आधार. ६. ब्रह्माची.

१२ श्रीदासबोध. [ दशक
निर्गुणाची वोळखण । मायाविलक्षणाचें लक्षण । ते हे कवी ॥ ८ ॥ कीं
हा श्रुतीचा भावगर्भ । कीं हा परमेश्वराचा अलभ्य लाभ । नातरी होय
सुलभ । निजबोधें कविरूपें ॥ ९ ॥ कवि मुमुक्षूंचें अंजन । कवि साधकांचें
साधन । कवि सिद्धांचें समाधान । निश्चयात्मक ॥ १० ॥ कवि स्वधर्माचा
आश्रय । कवि मनाचा मनोदय । कवि धार्मिकांचा विनय । विनयकर्ते
॥ ११ ॥ कवि वैराग्याचें रक्षण । कवि भक्तांचें भूषण । नाना स्वधर्मांचें
स्थापन । ते हे कवी ॥ १२ ॥ कवि प्रेमळांची प्रेमस्थिती । कवि ध्यान-
स्थांची ध्यानमूर्ती । कवि उपासकांची वांडे कीर्ती । विस्तारली ॥ १३ ॥
नाना साधनांचें मूळ । कवि नाना प्रयत्नांचें फळ । नाना कार्यसिद्धि
सकळ । कवीचेनि प्रसादें ॥ १४ ॥ आधीं कवीचा वाग्विलास । तरी मग
श्रवणीं तुंबले रस । कवीचेनि मतिप्रकाश । कवित्वास होय ॥ १५ ॥ कवि
व्युत्पन्नाची योग्यता । कवि सामर्थ्यवंताची सत्ता । कवि विचक्षणाची
कुशलता । नाना प्रकारें ॥ १६ ॥ कवि कवित्वाचा प्रबंध । कवि नाना
घाटी मुद्रा छंद । कवि गद्यपद्य भेदाभेद । पदप्रास-कर्ते ॥ १७ ॥ कवि-
सृष्टीचा अलंकार । कवि लक्ष्मीचा शृंगार । सकळ सिद्धींचा निर्धार । ते हे
कवी ॥ १८ ॥ कवि सभेचें मंडण । कवि भाग्याचें भूषण । नाना सुखाचें
संरक्षण । ते हे कवी ॥ १९ ॥ कवि देवाचे रूपकर्ते । कवि ऋषींचें महत्त्व
वर्णिते । नाना शास्त्रांचे सामर्थ्यांतें । कवि वाखाणिती ॥ २० ॥ नसता
कवीचा व्यापार । तरी कैंचा असता जगदुद्धार । म्हणोनि कवि हे आधार ।
सकळ सृष्टीसी ॥ २१ ॥ नाना विद्या ज्ञातृत्व कांहीं । कवीश्वरावीण तें
नाहीं । कवीपासून सर्वही । सर्वज्ञता ॥ २२ ॥ मागां वाल्मीकव्यासा-
दिक । जाहले कवीश्वर अनेक । तयांपासून विवेक । सकळ जनांसी ॥ २३ ॥
पूर्वी काव्यें होतीं केलीं । तरीच व्युत्पत्ति प्राप्त जाहली । तेणें पंडितांअंगीं
बाणली । परम योग्यता ॥ २४ ॥ ऐसे पूर्वी थोर थोर । जाहले कवीश्वर
अपार । आतां आहेत पुढें होणार । नमन त्यांसी ॥ २५ ॥ नाना चातुर्यां-
च्या मूर्ती । कीं हे साक्षात् बृहस्पती । वेदश्रुती बोलों म्हणती । ज्यांच्या
मुखें ॥ २६ ॥ परोपकाराकारणें । नाना निश्चय अनुवादणें । सेखीं बोलिलें
१. आत्मज्ञान. २. मोठी. ३ शेवटीं.

पूर्णपणें । संशयातीत ॥ २७ ॥ कीं हे अमृताचे मेघ वोळले । कीं हे नवे-
रसांचे वोघ लोटले । नाना सुखांचें उचंबळलें । सरोवर हें ॥ २८ ॥ कीं हीं
विवेकनिधींचीं भांडारें । प्रकट जाहलीं मनुष्याकारें । नाना वस्तूंचेनि
विचारें । कोंदाटले हे ॥ २९ ॥ कीं हें आदिशक्तीचें ठेवणें । नाना पदा-
र्थांसि आणि उणें । लाधलें पूर्वसंचिताच्या गुणें । विश्वजनांसी ॥ ३० ॥ कीं
हीं सुखाचीं तारवें लोटलीं । अक्षय आनंदें डैतटलीं । विश्वजनांसी उपयोगा
आलीं । नाना प्रयोगकारणें ॥ ३१ ॥ कीं हे निरंजनाची संपत्ती । कीं हे
विराटाची योगस्थिती । कीं हे भक्तीची फलश्रुती । फळासि आली ॥३२॥
कीं हा ईश्वराचा पॅवाड । पहातां गगनाहून वाड । ब्रह्मांडरचनेहून जाड ।
कविप्रबंधरचना ॥ ३३ आतां असो हा विस्तार । जगासि आधार कवीश्वर ।
तयांसि माझा नमस्कार । साष्टांग भावें ॥ ३४ ॥ इति श्रीदासबोधे गुरु-
शिष्यसंवादे प्रथमदशके कवीश्वरस्तवनं नाम सप्तमः समासः ॥ ७ ॥
८. सभावर्णन.
श्रीगणेशाय नमः ॥ आतां वंदूं सकळ सभा । जिये सभेसी मुक्ति
सुलभा । जेथें स्वयें जगदीश उभा । तिष्ठत प्रेमभरें ॥ १ ॥ श्लोक ॥ नाहं
वसामि वैकुंठे योगिनां हृदये रवौ । मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि
नारद ॥ १ ॥ टी० ॥ नाहीं वैकुंठींच्या ठायीं । नाहीं योगियांचे हृदयीं ।
माझे भक्त गाती जे ठाईं । तेथें मी तिष्ठत नारदा ॥ २ ॥ या कारणें सभा
श्रेष्ठ । भक्त गाती तें वैकुंठ । नामघोष गडगडाट । जयजयकारें गर्जती ॥३॥
प्रेमळ भक्तांचीं गायनें । भगवद्वाक्यें हरिकीर्तनें । वेदव्याख्यान पुराणश्रवणें ।
जेथें निरंतर ॥ ४ ॥ परमेश्वराचे गुणानुवाद । नाना निरूपणांचे संवाद ।
अध्यात्मविद्या भेदाभेद । मथन जेथें ॥ ५ ॥ नाना समाधानें तृप्ती ।
नाना आशंकांनिवृत्ती । चित्तीं बैसे ध्यानमूर्ती । वाग्विलासें ॥ ६ ॥ भक्त
प्रेमळ भाविक । सभ्य सखोल सात्विक । रम्य रसाळ गायक । निष्ठावंत
१. शृंगार, वीर, करुण, अद्भुत, हास्य, भयानक, वीभत्स, रौद्र आणि शांत
या नऊ रसांचे. २. उचंबळून आलीं. ३. विश्वस्वरूप ईश्वराची. ४. कीर्ति, मोठेपणा.
५. वेदान्तविद्या. ६. गंभीर.

१४ श्रीदासबोध. [ दशक
॥ ७ ॥ कर्मशीळ आचारशीळ । दानशीळ धर्मशीळ । शुचिमंत पुण्यशीळ
अंतरशुद्ध कृपाळू ॥ ८ ॥ योगी विरागी उदास । नेमनिग्रही तापस । विरक्त
निस्पृह बहुवस । अरण्यवासी ॥ ९ ॥ दंडधारी जटाधारी । नाथपंथी मुद्रा-
धारी । एक बाळब्रह्मचारी । योगीश्वर ॥ १० ॥ पुरश्चरणी आणि तपस्वी ।
तीर्थवासी आणि मनस्वी । महायोगी आणि जनसैवी । जनासारिखे ॥ ११॥
सिद्ध साधु आणि साधक । मंत्रयंत्रादि शोधक । एकनिष्ठ उपासक । गुण-
ग्राही ॥ १२ ॥ संत सज्जन विद्वज्जन । वेदज्ञ शास्त्रज्ञ महाजन । प्रबुद्ध
सर्वज्ञ समाधान । विमळ कर्ते ॥ १३ ॥ योगी व्युत्पन्न ऋषीश्वर । धूर्त
तार्किक कवीश्वर । मनोजयाचे मुनीश्वर । आणि दिग्वल्कलीं ॥ १४ ॥
ब्रह्मज्ञानी आत्मज्ञानी । तत्त्वज्ञानी पिंडज्ञानी । योगाभ्यासी योगज्ञानी ।
उदासीन ॥ १५ ॥ पंडित आणि पुराणिक । विद्वांस आणि वैदिक । भट
आणि पाठक । यजुर्वेदी ॥ १६ ॥ महाभले महाश्रोत्री । याज्ञिक आणि
अग्निहोत्री । वैद्य आणि पंचाक्षरी । परोपकारकर्ते ॥ १७ ॥ भूत भविष्य व-
र्तमान । जयांसि त्रिकाळींचें ज्ञान । बहुश्रुत निरभिमान । निरपेक्षी ॥ १८॥
शांतिक्षमादयाशीळ । पवित्र आणि सत्त्वशीळ । अंतरशुद्ध ज्ञानशीळ । ई-
श्वरी पुरुष ॥ १९ ॥ ऐसे जे कां सभानायक । जेथें नित्यानित्यविवेक ।
त्यांचा महिमा अलौकिक । काय म्हणून वर्णावा ॥ २० ॥ जेथें श्रवणाचा
उपाय । आणि परमार्थसमुदाय । तेथें जनांस तरणोपाय । सहजचि घडे ॥
२१ ॥ उत्तम गुणांची मंडळी । सत्त्वधीर सत्त्वागळी । नित्य सुखाची न-
व्हाळी । जेथें वसे ॥ २२ ॥ विद्यापात्रे कळापात्रे । विशेष गुणांचीं सत्पात्रे ।
भगवंताचीं प्रीतिपात्रे । मिळालीं जेथें ॥ २३ ॥ प्रवृत्ति आणि निवृत्ति ।
प्रपंची आणि परमार्थी । गृहस्थाश्रमी वानप्रस्थी । संन्यासादिक ॥ २४ ॥
वृद्ध तरुण आणि बाळ । पुरुष स्त्रियादि सकळ । अखंड ध्याती तमालनीळें ।
अंतर्यामीं ॥ २५ ॥ ऐसे परमेश्वराचे जन । त्यांसि माझें अभिवंदन । जयां-
चेनि समाधान । अकस्मात बाणे ॥ २६ ॥ ऐसिये सभेचा गजर । तेथें
माझा नमस्कार । जेथें नित्य निरंतर । कीर्तन भगवंताचें ॥ २७ ॥ जेथें
१. शुद्ध. २. मन जिंकणारे. ३. जनप्रिय, ४. दिशाच ज्यांचीं वल्कले तें.
५. शरीराचें तत्व जाणणारे. ६. नवेपणा. ७. घनश्याम, श्रीकृष्ण. ८. हृदयामध्यें.

१ द. ] परमार्थस्तवन. १५
भगवंताच्या मूर्ती । तेथें पाविजे उत्तम गती । ऐसा निश्चय बहुतां ग्रंथीं ।
महंत बोलिले ॥ २८ ॥ कलौ कीर्तन वरिष्ठ । जेथें होय ते सभा श्रेष्ठ । कथा-
श्रवणें नाना नष्ट । संदेह मावळती ॥ २९ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्य-
संवादे प्रथमदशके सभावर्णनं नाम अष्टमः समासः ॥ ८ ॥
९. परमार्थस्तवन.
श्रीगणेशाय नमः ॥ आतां स्तवूं हा परमार्थ । जो साधकांचा निज-
स्वार्थ । नातरी समर्थांमध्यें समर्थ । योग हा ॥ १ ॥ आहे तरी परम सु-
गम । परी जनासि जाहला दुर्गम । कां जयाचें चुकलें वर्म । सत्समागमाकडे
॥ २ ॥ नाना साधनांचें उधार । हा रोकडा ब्रह्मसाक्षात्कार । वेदशास्त्रीं जें सार ।
तें अनुभवास ये ॥ ३ ॥ आहे तरी चहूंकडे । परी अणुमात्र दृष्टीस न पडे ।
उदास परी एकीकडे । पहातां दिसेना ॥ ४ ॥ आकाशमार्गै गुप्त पंथ । जाणती
योगी समर्थ । इतरांस हा गुह्यार्थ । सहसा न कळे ॥ ५ ॥ साराचेंहि निजसार ।
अखंड अक्षय अपार । नेऊं न शकती तस्कर । कांहीं केल्या ॥ ६ ॥ तयासि
नाहीं राजभय । अथवा नाहीं अग्निभय । अथवा श्वापदभय । बोलोंच नये
॥ ७ ॥ परब्रह्म तें हालवेना ! अथवा ठावही चुकेना । कालांतरीं चळेना
। जेथींचें तेथें ॥ ८ ॥ ऐसें तें निज ठेवणें । कदापि पालटों नेणे । अथवा
नव्हे अधिक उणें । बहुतां काळें ॥ ९ ॥ अथवा तें बसवटेना । अथवा
अदृश्य होईना । नातरी पाहतां दिसेना । गुरुअंजनेंविण ॥ १० ॥ मागां
योगिये समर्थ । त्यांचांहि निजस्वार्थ । त्यासि बोलिजे परमार्थ । परम
गुह्य म्हणोनि ॥ ११ ॥ ज्यांहीं शोधून पाहिला । त्यांसीच अर्थ सांपडला ।
येरां असोनि अलभ्य झाला । जन्मोजन्मीं ॥ १२ ॥ अपूर्वता या परमा-
र्थाची । वार्ता नाहीं जन्ममृत्यूची । आणि पदवी सायुज्यतेची । सन्निधचि
लाभे ॥ १३ ॥ माया विवेकें मावळे । सारासार विचार कळे । परब्रह्म तेंहि
निवळे । अंतर्यामीं ॥ १४ ॥ ब्रह्मीं भासलें उदंड । ब्रह्मीं बुडालें ब्रह्मांड ।
पंचभूतांचें थोतांड । तुच्छ वाटे ॥ १५ ॥ प्रपंच वाटे लटिका । माया वाटे
झापाणिकों । शुद्ध आत्मा विवेका-। अंतरीं आला ॥ १६ ॥ ब्रह्मस्थिति बा-
१. मलिष्ट. २. सद्गुरूच्या उपदेशावांचून. ३. कृत्रिम, पोकळ.

१६ श्रीदासबोध. [ दशक
पतां अंतरीं । संदेह गेला ब्रह्मांडाबाहेरी । दृश्याची जुनी जेर्जरी । कुहीटें
जाहेली ॥ १७॥ ऐसा हा परमार्थ । जो करील त्याचा निजस्वार्थ । आतां
या समर्थासि समर्थ । किती म्हणोनि म्हणावें ॥ १८ ॥ या परमार्थाकरितां
ब्रह्मादिकांसि विश्रामता । योगी पावती तन्मयता । परब्रह्मीं ॥ १९ ॥ पर-
मार्थ सकळांस विसांवा । सिद्ध साधु महानुभावां । सेखीं सात्विक जड-
जीवा । सत्संगेंकरूनी ॥ २० ॥ परमार्थ जन्माचें सार्थक । परमार्थ संसारीं
तारक । परमार्थ दाखवी परलोक । धार्मिकांसी ॥ २१ ॥ परमार्थ ताप-
सांसी आधार । परमार्थ साधकांसी धार । परमार्थ पाववी पार । भवसाग-
राचा ॥ २२ ॥ परमार्थां तो राज्यधारी । परमार्थ नाहीं तो भिकारी । या
परमार्थाची सरी । कोणास द्यावी ॥ २३॥ अनंत जन्मींचें पुण्य जोडे । तरीच
हा परमार्थ घडे । मुख्य परमात्मा आतुडे । स्वानुभवासी ॥ २४ ॥ जेणें पर-
मार्थ वोळखिला । तेणें जन्म सार्थ केला । येर तो पापी जन्मला । कुळ-
क्षयाकारणें ॥ २५ ॥ असो भगवत्प्राप्तीविण । करी संसाराचा शीण । त्या
मूर्खाचें मुखावलोकन । करूं नये ॥ २६ ॥ भल्यानें परमार्थां भरावें । शरीर-
सार्थक करावें । पूर्वजांसी उद्धरावें । हरिभक्ती करूनी ॥ २७॥ इति
श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे प्रथमदशके परमार्थस्तवनं नाम नवमः
समासः ॥ ९ ॥
१०. नरदेहस्तवन.
श्रीगणेशाय नमः ॥ धन्य धन्य हा नरदेहो । येथील अपूर्वता पाहा हो ।
जो जो कीजे परमार्थलाहो । तो तो पावे सिद्धीतें ॥ १ ॥ या नरदेहाचेनि
लागेंवेगें । एक लागले भक्तिसंगें । एकीं परम वीतरागें । गिरिकंदरें से-
विलीं ॥ २ ॥ एक फिरती तीर्थाटणें । एक करिती पुरश्चरणें । एक अखंड
नामस्मरणें । निष्ठावंत राहिले ॥ ३ ॥ एक तपें करूं लागले । एक योगा-
भ्यासी भले । एक अभ्यासयोगें जाहले । वेदशास्त्रीं व्युत्पन्न ॥ ४ ॥
एकीं हठनिग्रह केला । देह अत्यंतचि पीडिला । एकीं देव ठाईं पाडिला ।
भावार्थबळें ॥ ५ ॥ एक महानुभाव विख्यात । एक भक्त झाले ख्याति-
१. जीर्णावस्था. २. नासून गेली. ३. प्राप्त होतो. ४. लाभानें, आधारानें.

वंत । एक सिद्ध अकस्मात । गगन वोळंगती ॥ ६ ॥ एक तेजीं तेज जा-
हले । एक जळीं मिळोन गेले । एक दिसतांचि अदृश्य जाहले । वायुरूपीं
॥ ७ ॥ एक एकचि बहुधा होती । एक देखतांचि निघोन जाती । एक बै-
सले असतांचि भ्रमती । नाना स्थानीं समुद्रीं ॥ ८ ॥ एक भयानकांवरी
बैसती । एक अचेतनें चालविती । एक ते प्रेतें उठविती । तपोबळेंकरूनी
॥ ९ ॥ एक तेजें मंद करिती । एक जळें आटविती । एक वायु निरोधिती ।
विश्वजनांचा ॥ १० ॥ ऐसे हठनिग्रही कृतबुद्धी । जयांसि वोळल्या नाना
सिद्धी । ऐसे सिद्ध लक्षावधी । होऊनि गेले ॥ ११ ॥ एक मनःसिद्ध
एक वाचासिद्ध । एक अल्पसिद्ध एक सर्वसिद्ध । ऐसे नानाप्रकारचे सिद्ध ।
विख्यात जाहले ॥ १२ ॥ एक नवविधाभक्तिराजपंथें । गेले तरले
परलोकींच्या निजस्वार्थे । एक योगी गुप्त पंथें । ब्रह्मभुवन पावले ॥ १३ ॥
एक वैकुंठास गेले । एक सत्यलोकीं राहिले । एक कैलासीं बैसले ।
शिवरूप होऊनी ॥ १४ ॥ एक इंद्रलोकीं इंद्र जाहले । एक पितृलोकीं
मिळाले । एक उँडुगणीं बैसले । एक ते क्षीरसागरीं ॥ १५ ॥ सलोकता
समीपता । स्वरूपता सायुज्यता । या चार मुक्ति तत्वतां । इच्छा
सेवून राहिले ॥ १६ ॥ ऐसे सिद्ध साधु संत । स्वहितीं प्रवर्त्तले अनंत ।
ऐसा हा नरदेह विख्यात । काय म्हणोनि वर्णावा ॥ १७॥ या नरदेहाचेनि
आधारें । नाना साधनांचेनि द्वारें । मुख्य सारासारविचारें । बहुत सुटले
॥ १८ ॥ या नरदेहाचेनि संबंधें । बहुत पावले उत्तम पदें । अहंता सो-
डोनि स्वानंदें । सुखी जाहले ॥ १९ ॥ नरदेहीं येऊनि सकळ । ऊर्ध्वगति
पावले केवळ । येथें संशयाचें मूळ । खंडोनि गेलें ॥ २० ॥ पशुदेहीं नाहीं
गती । ऐसें सर्वत्र बोलती । म्हणोनि नरदेहींच प्राप्ती । परलोकाची ॥ २१ ॥
संत महंत ऋषि मुनि । सिद्ध साधु समाधानी । भक्त मुक्त ब्रह्मज्ञानी ।
विरक्त योगी तपस्वी ॥ २२ ॥ तत्त्वज्ञानी योगाभ्यासी । ब्रह्मचारी दिगंबर
संन्यासी । पिंडज्ञानी षट्दर्शनी तापसी । नरदेहींच जाहले ॥ २३ ॥ म्ह


१. सिंह, व्याघ्र इत्यादिकांवर. २. निर्जीव पदार्थ. ३. निश्चयी. ४. नक्षत्रांच्या
समुदायांत. ५. न्याय, वैशेषिक, सांख्य, पातंजल, पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा
अशीं सहा शास्त्रें जाणणारे.

१८ श्रीदासबोध. [ दशक
णेन नरदेहचि श्रेष्ठ । नाना देहांमध्यें वरिष्ठ । जयाचेनि चुके अरिष्ट । यम-
यातनेचें ॥ २४ ॥ नरदेह हा स्वाधीन । सहसा नव्हे पराधीन । परंतु हा
परोपकारीं झिजवून । कीर्तिरूपें उरवावा ॥ २५ ॥ अश्व वृषभ गाई म्हैसी ।
नाना पशु स्त्रिया दासी । कृपाळुपणें सोडितां त्यांसी । कोणी तरी धरील
॥ २६ ॥ तैसा नव्हे नरदेहो । इच्छा जावो अथवा राहो । परी यास कोणी
पहा हो । बंधन करूं शकेना ॥ २७ ॥ नरदेह पांगुळ असता । तरी तो
कार्यास न येता । अथवा थोंटा जरी असता । तरी परोपकारास न ये ॥२८॥
नरदेह अंध असिला । तरी तो निपट वायां गेला । अथवा बधिर जरी
असिला । तरी निरूपण नाहीं ॥ २९ ॥ नरदेह असिला मुका । तरी घेतां
न ये आशंका । अशक्त रोगी नासका । तरी तो निष्कारण ॥३०॥ नरदेह
असिला मूर्ख । अथवा फॅपऱ्या समंधाचें दुःख । तरी तो जाणावा निर-
र्थक । निश्चयेंसी ॥ ३१ ॥ इतुकेँही नसतां व्यंग । नरदेह आणि सकळ
सांगें । तेणें धरावा परमार्थमार्ग । लौगवेगें ॥ ३२ ॥ सांगें नरदेह जोडला ।
आणि परमार्थबुद्धि विसरला । तरी मूर्ख कैसा भ्रमला । मायाजाळीं ॥३३॥
मृत्तिका खणोनि घर केलें । तें माझें असें दृढ कल्पिलें । परी हें बहुतांचें
कळलें । नाहींच तयासी ॥ ३४ ॥ मूषक म्हणती घर आमुचें । पाली म्ह-
णती घर आमुचें । मक्षिका म्हणती घर आमुचें । निश्चयेंसी ॥ ३५ ॥ कां-
तर्ण्य म्हणती घर आमुचें । मुंगळे म्हणती घर आमुचें । मुंग्या म्हणती
घर आमुचें । निश्चयेंसी ॥ ३६ ॥ विंचू म्हणती आमुचें घर । सर्प म्हणती
आमुचें घर । झुरळें म्हणती आमुचें घर । निश्चयेंसी ॥ ३७ ॥ भ्रमर म्हणती
आमुचें घर । भिंगोऱ्या म्हणती आमुचें घर । आळिका म्हणती आमुचें
घर । काष्ठामध्यें ॥ ३८॥ मार्जारें म्हणती आमुचें घर । श्वानें म्हणती आमुचें
घर । मुंगुसें म्हणती आमुचें घर । निश्चयेंसी ॥ ३९ ॥ ढेंकूण म्हणती आ-
मुचें घर । चांचणें म्हणती आमुचें घर । घुंगरडीं म्हणती आमुचें घर । नि-
श्चयेंसी ॥ ४० ॥ पिंगूळ म्हणती आमुचें घर । व्याळें म्हणती आमुचें घर ।
पिसुवा म्हणती आमुचें घर । निश्चयेंसी ॥ ४१ ॥ पिसोळे म्हणती आमुचें
१. सर्व अवयवांनीं युक्त. २. अति त्वरेनें. ३. उंदोर. ४. कोळ्याच्या जातीचा
एक लहान किडा. ५. भ्रमरीची आळी. ६. कीड. ७. सर्प.

१ ला. ] नरदेहस्तवन. १९
घर । गांधले म्हणती आमुचें घर । सोट म्हणती आमुचें घर । आणि गोमी
॥ ४२ ॥ बहुत किड्यांचा जोजारें १ । किती सांगावा विस्तार । समस्त म्ह-
णती आमुचें घर । निश्चयेंसीं ॥ ४३ ॥ पाहुणे म्हणती आमुचें घर । मित्र
म्हणती आमुचें घर । ग्रामस्थ म्हणती आमुचें घर । निश्चयेंसीं ॥४४॥ पशु
म्हणती आमुचें घर । दासी म्हणती आमुचें घर । घरचीं म्हणती आमुचें
घर । निश्चयेंसीं ॥ ४५ ॥ तस्कर म्हणती आमुचें घर । राजकीय म्हणती
आमुचें घर । अग्नि म्हणे आमुचें घर । भस्म करूं ॥ ४६ ॥ समस्त म्ह-
णती घर माझें । हें मूर्खही म्हणे माझें माझें । शेवटीं जड जाहलें बोझें ।
टाकिला देश ॥ ४७ ॥ अवघीं घरें भंगलीं । गांवाची पांढरी २ पडली । मग
ते गृहीं राहिलीं । अरण्यश्वापदें ॥ ४८ ॥ किडा मुंगी वाळवी मूषक । त्यांचें
घर निश्चयात्मक । हें प्राणी बापुडें मूर्ख । निघोनि गेलें ॥ ४९ ॥ ऐसी
गृहाची स्थिती । मिथ्या आली आत्मप्रतीती । जन्म दों दिवसांची वस्ती ।
कोठें तरी करावी ॥ ५० ॥ देह म्हणावें आपुलें । तरी तें बहुतात्कारणें
निर्मिलें । प्राणियांच्या माथां घर केलें । उवा मस्तकीं भक्षिती ॥ ५१ ॥
रोममुळीं किडे भक्षिती । खांडूक झाल्या किडे पडती । पोटामध्यें जंत
होती । प्रत्यक्ष प्राणियांच्या ॥ ५२ ॥ कीड लागे दांतासी । कीड लागे
डोळ्यांसी । कीड लागे कर्णांसी । आणि गोमाशा भरती ॥ ५३ ॥ गोचडि
अशुद्ध ३ सेविती । चामवा मांसांत घुसती । पिसोळे चावून पळती । अक-
स्मात ॥ ५४ ॥ सुंगे गांधले चाविती । गोमी जळवा अशुद्ध घेती । विंचू
सर्प दंश कारिती । काँनटें फुशीं ४ ॥ ५५ ॥ जन्मोन देह पाळिलें । तें अक-
स्मात व्याघ्रें नेलें । कीं तें लांडग्यांचि भक्षिलें । बलात्कारें ॥ ५६ ॥ मूषक-
मार्जारें दंश कारिती । श्वानें अश्वें लोळें ५ तोडिती । रिसें ६ मर्कटें मारिती ।
कासावीस करूनियां ॥ ५७ ॥ उँहूॅ ७ डसोन उचलिती । हस्ती चिरडोनि
टाकिती । वृषभ टोंचोन मारिती । अकस्मात ॥ ५८ ॥ तस्कर तडतडां
तोडिती । भुतें झडपोन मारिती । असो या देहाची स्थिती । ऐसी आहे
॥ ५९ ॥ ऐसें शरीर बहुतांचें । हें मूर्ख म्हणे आमुचें । परंतु खाजें ९ जिवांचें ।
१. जंजाळ. २. लोकवस्ती; गांव ओस झाला हा अर्थ. ३. रक्त. ४. एक जातीचे
जंतु. ५. लाडे, मांसाचे तुकडे. ६. अस्वलें. ७. उंट. ८. बैल. ९. खाद्य.

२० श्रीदासबोध. [ दशक
तापत्रयीं बोलिलें ॥ ६० ॥ देह परमार्थीं लाविलें । तरीच याचें सार्थक
जाहलें । नाहीं तरी व्यर्थचि गेलें । नाना आघातें मृत्युपंथें ॥ ६१ ॥ असो
जे प्रापंचिक मूर्ख । ते काय जाणती परमार्थसुख । त्या मूर्खाचें लक्षण
कांहींएक । पुढें बोलिलें असे ॥ ६२ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
प्रथमदशके नरदेहस्तवनं नाम दशमः समासः ॥ १० ॥ ओवी ३२६.
दशक दुसरा.
१. मूर्खलक्षण.
श्रीगणेशाय नमः ॥ ॐनमोजी गजवदना । एकदंता त्रिनयना ।
कृपादृष्टीं भक्तजना । अवलोकावें ॥ १ ॥ तुज नमूं वेदमाते । श्रीशारदे ब्रह्म-
सुते । अंतरीं वसें कृपावंते । स्फूर्तिरूपें ॥ २ ॥ वंदूनि सद्गुरुचरण । करूनि
रघुनाथस्मरण । त्यागार्थ मूर्खलक्षण । बोलिजेल ॥३॥ एक मूर्ख एक पढत-
मूर्ख । उभय लक्षणीं कौतुक । श्रोतीं सादरें विवेक । केला पाहिजे ॥ ४ ॥
पढतमूर्खाचें लक्षण । पुढिले समासीं निरूपण । सावध होऊनि विचक्षण ।
परिसोत पुढें ॥ ५ ॥ आतां प्रस्तुत विचार । लक्षणें सांगतां अपार । परी
कांहीं एक तत्पर । होऊनि ऐका ॥ ६ ॥ जे प्रापंचिक जन । जयांसि नाहीं
आत्मज्ञान । जे केवळ अज्ञान । त्यांचीं हीं लक्षणें ॥ ७ ॥ जन्मला जयांचे
उदरीं । तयांसि जो विरोध करी । सखी मानिली अंतुरी । तो एक मूर्ख
॥ ८ ॥ सांडोनि सर्वही गोत । स्त्रिये आधीन जीवित । सांगे अंतरींची
मात । तो एक मूर्ख ॥ ९ ॥ परस्त्रियेसी प्रेम धरी । श्वशुरगृहीं वास करी ।
कुळेंविण कन्या वरी । तो एक मूर्ख ॥ १० ॥ समर्थावरी अहंता । अंतरीं
मानी समता । सामर्थ्याविण करी सत्ता । तो एक मूर्ख ॥ ११ ॥ आपली
१. तापत्रयनिरूपणांत. (दशक ३, समास ६।७।८ पहा.) २. ग्रंथलेखनाच्या
स्फुरणरूपानें ३. स्त्री.

२ रा. ] मूर्खलक्षण. २१
आपण करी स्तुती । स्वदेशीं भोगी विपत्ती । सांगे वडिलांची कीर्ती । तो
एक मूर्ख ॥ १२ ॥ अकारण हास्य करी । विवेक सांगतां न धरी । जो बहु-
तांचा वैरी । तो एक मूर्ख ॥ १३ ॥ आपुलीं धरूनियां दुरी । पराव्यांसी
मैत्री करी । परन्यून बोले अहोरात्रीं । तो एक मूर्ख ॥ १४ ॥ बहुत जाग-
ते जन । तयांमध्यें करी शयन । परस्थळीं बहु भोजन । करी तो एक मूर्ख
॥ १५ ॥ मान अथवा अपमान । स्वयें करी परिच्छिन्न¹ । सदा व्यसनीं
जयाचें मन । तो एक मूर्ख ॥ १६ ॥ धरूनि पराची आस । प्रयत्न सांडी
सावकाश । निसुगाईचाँ² संतोष । मानी तो एक मूर्ख ॥ १७ ॥ घरीं विवे-
क उमजे । आणि सभेमध्यें लाजे । शब्द बोलतां निर्बुजे³ । तो एक मूर्ख
॥ १८ ॥ नायके त्यास शिकवी । वडिलांस जाणीव दावी । जो सात्विकां-
सि गोंवी⁴ । तो एक मूर्ख ॥ १९ ॥ आपणासून जो श्रेष्ठ । तयासि अत्यंत
निकट । शिकवणीचा मानी वीट । तो एक मूर्ख ॥ २० ॥ एकाएकीं एक-
सरा । जाहला विषयीं निलाजिरा । मर्यादा सांडोनि सैराँ⁵ । वर्ते तो एक
मूर्ख ॥ २१ ॥ औषध न घे असोनि व्यथा । पथ्य न करी सर्वथा । न मिळे
आलिया पदार्था । तो एक मूर्ख ॥ २२ ॥ संगेंविण विदेश⁶ करी । वोळखी-
विण संग धरी । उडी घाली महापुरीं । तो एक मूर्ख ॥ २३ ॥ आपणासि
जेथें मान । तेथें अखंड करी गमन । रक्षूं नेणे मानाभिमान । तो एक मूर्ख
॥ २४ ॥ सेवक जाहला लक्ष्मीवंत । तयाचा होय अंकित । सर्वकाळ जो
दुश्चित । तो एक मूर्ख ॥ २५ ॥ विचार न करितां कारण । दंड करी अप-
राधाविण । स्वल्पासाठीं जो कृपण । तो एक मूर्ख ॥ २६ ॥ देवलंड पितृ-
लंड । शक्तिविण करितो दंड । ज्याचे मुखीं भंड⁷भंड । तो एक मूर्ख ॥ २७ ॥
घरींच्यावरी खाय दाढा । बाहेर दीन बापुडा । ऐसा जो कां मूढ वेडा । तो
एक मूर्ख ॥ २८ ॥ नीच यातीसि सांगात । परांगनेसि एकांत । मागें जाय
खात खात । तो एक मूर्ख ॥ २९ ॥ स्वयें नेणे परोपकार । उपकाराचा
अनुपकार । करी थोडें बोले फार । तो एक मूर्ख ॥ ३० ॥ तपिळ⁸ खादाड
आळसी । कुश्चिळ⁹ कुटिळ¹⁰ मानसीं । धारिष्ट नाहीं जयापाशीं । तो एक मूर्ख


१. उघड. २. आळसाचा, किंवा निर्लज्जपणाचा. ३. घाबरतो. ४. पीडा करी.
५. स्वैर. ६. प्रवास ७. बडबड. ८. तापट. ९. दुष्ट स्वभावी १०. कपटी.

२२ श्रीदासबोध. [ दशक
॥ ३१ ॥ विद्या वैभव ना धन । पुरुषार्थ सामर्थ्य ना मान । कोरडाच वाहे
अभिमान । तो एक मूर्ख ३२ ॥ लंडी लटिका लबाड । कुकर्मी कुटिल
निचोड । निद्रा जयाची वाँड । तो एक मूर्ख ॥ ३३ ॥ दंत चक्षु आणि घ्राण
पाँणी वसन आणि चरण । सर्वकाळ जयाचे मलिन । तो एक मूर्ख ॥ ३४॥
ऊंचीं जाऊनि वस्त्र नेसे । चौबारां बाहेरि बैसे । सर्वकाळ नग्न दिसे । तो
एक मूर्ख ॥ ३५ ॥ वैधृति आणि व्यतिपात । नाना कुमुहूर्तै जात ।
अपशकुनें करी घात । तो एक मूर्ख ॥ ३६ ॥ क्रोध अभिमान कुबुद्धी
आपणासि आपण वधी । जयासि नाहीं दृढ बुद्धी । तो एक मूर्ख ॥ ३७ ॥
जिवलगांसी परम खेदी । सुखाचा शब्द तोही नेदी । नीच जनांसि वंदी ।
तो एक मूर्ख ॥ ३८ ॥ आपणासि राखे नानापरी । शरणागतासि अव्हेरी ।
लक्ष्मीचा भरंवसा धरी । तो एक मूर्ख ॥ ३९ ॥ पुत्र कलत्र आणि दारा । इतु-
काचि मानूनियां थारा । विसरोन गेला ईश्वरा । तो एक मूर्ख ॥४०॥ जैसें जैसें
करावें । तैसें तैसें पावावें । हें जयासी नेणवे । तो एक मूर्ख ॥ ४१ ॥ पुरुषाचेनि
अष्टगुणें । स्त्रियांसी ईश्वरी देणें । ऐशा केल्या बहुत जेणें । तो एक मूर्ख ॥ ४२ ॥
दुर्जनाचेनि बोलें । मर्यादा सांडोनि चाले । दिवसा झांकिले डोळे । तो
एक मूर्ख ॥ ४३ ॥ देवद्रोही गुरुद्रोही । मातृद्रोही पितृद्रोही । ब्रह्मद्रोही
स्वामीद्रोही । तो एक मूर्ख ॥ ४४ ॥ आदरेंविण बोलणें । न पुसतां साक्ष
देणें । निंद्य वस्तु अंगिकारणें । तो एक मूर्ख ॥ ४५ ॥ तुर्क तोडोनि बोले ।
मार्ग सोडोनि चाले । कुकर्मी मित्र केले । तो एक मूर्ख ॥ ४६ ॥ परपिडेचें
मानी सुख । परसंतोषाचें मानी दुःख । गेले वस्तूचा करी शोक । तो एक
मूर्ख ॥ ४७ ॥ पत्त राखो नेणे कदा । विनोद करी सर्वदा । हांसतां खिजे
पेटे हुंद्दीं । तो एक मूर्ख ॥ ४८ ॥ होर्ड घाली अवघड । 'काजेंविण करी
बडबड । बोलोचि नेणे मुखजड । तो एक मूर्ख ॥ ४९ ॥ वस्त्र शस्त्र दोन्ही
नसे । उंचस्थानीं जाऊनि बैसे । जो गोत्रजांसि विश्वासे । तो एक मूर्ख
॥ ५० ॥ तस्करासी वोळखी सांगे । देखिली वस्तु तेचि मागे । आपुलें
अनहित करी रागें । तो एक मूर्ख ॥ ५१ ॥ हीन जनांसि बरोबरी । बोल
१. निर्लज्ज. २. अतिशय. ३. हात ४. चव्हाठा. ५. कामविकार. ६. वजन,
महत्व. ७. झोंबी करण्यास. ८. पैज.

२ रा. ] मूर्खलक्षण. २३
बोले सरोत्तरीं । वामहस्तें प्राशन करी । तो एक मूर्ख ॥ ५२ ॥ समर्थांसी
मत्सर धरी । अलभ्य वस्तूचा हेवा करी । घरींच्या घरीं करी चोरी । तो
एक मूर्ख ॥ ५३ ॥ सांडोनियां जगदीशा । मनुष्याचा मानी भरंवसा ।
सार्थकेंविण वेंची वयसा । तो एक मूर्ख ॥ ५४ ॥ संसारदुःखाचेनि गुणें ।
देवासी गाळी देणें । मैत्राचे बोले उणें । तो एक मूर्ख ॥ ५५ ॥ अल्प अ-
न्याय क्षमा न करी । सर्वकाळ धारकीं धरी । जो विश्वासघात करी । तो
एक मूर्ख ॥ ५६ ॥ समर्थांचे मनींचा तुटे । जयाचेनि सभा विटे । क्षणीं
बरा क्षणीं पालटे । तो एक मूर्ख ॥ ५७ ॥ बहुत दिवसांचे सेवक । त्यागून
ठेवी आणिक । ज्याची सभा निर्नायक । तो एक मूर्ख ॥ ५८ ॥ अनीतीनें
द्रव्य जोडी । धर्म नीति न्याय सोडी । संगतीचें मनुष्य तोडी । तो एक
मूर्ख ॥ ५९ ॥ घरीं असोनि सुंदरी । जो सदा परद्वार करी । बहुतांचें
उच्छिष्ट अंगिकारी । तो एक मूर्ख ॥ ६० ॥ आपलें अर्थ दुसऱ्यापाशीं ।
आणि दुसऱ्याचें अभिलाषी । पर्वतें करी हीनासी । तो एक मूर्ख ॥ ६१ ॥
अतीताचा अंत पाहे । कुग्रामामध्यें राहे । सर्वकाळ चिंता वाहे । तो एक
मूर्ख ॥ ६२ ॥ दोघे बोलत असती जेथें । तिसरा जाऊन बैसे तेथें । डोई
खाजवी दोहीं हातें । तो एक मूर्ख ॥ ६३ ॥ उदकामध्यें सांडी गुरळी ।
पायें पाय खांजोळी । सेवा करी हीन कुळीं । तो एक मूर्ख ॥ ६४ ॥ स्त्री-
बाळकांस सलगी देणें । पिशाच्चासन्निध बैसणें । मर्यादेविण पाळी सुणें ।
तो एक मूर्ख ॥ ६५ ॥ परस्त्रींशीं कलह करी । मुकी वस्तु निघातें मारी ।
मूर्खाची संगति धरी । तो एक मूर्ख ॥ ६६ ॥ कलह पाहत उभा राहे ।
सोडवीना कौतुक पाहे । खरें असतां खोटें साहे । तो एक मूर्ख ॥ ६७ ॥
लक्ष्मी आलियावरी । जो मागील ओळखी न धरी । देवीं ब्राह्मणीं सत्ता
करी । तो एक मूर्ख ॥ ६८ ॥ आपुलें कार्य होय तोंवरी । बहुसाल नम्रता
धरी । पुढिलांचें कार्य न करी । तो एक मूर्ख ॥ ६९ ॥ अक्षरें गाळून वाची ।
कांहीं घाली पदरींचीं । निगा न करी पुस्तकाची । तो एक मूर्ख ॥ ७० ॥
आपण वाचीना कधीं । कोणासि वाचाया नेदी । बांधोनि ठेवी बंदीं । तो
१. उत्तरास उत्तर असे. २. हांव. ३. धारेवर धरतो, त्रास देतो. ४. द्रव्य,
ठेव. ५. देणें घेणें. ६. याचकाचा. ७. गुळणी. ८. कुतरें. ९. प्राणी. १० दुसऱ्याचें.

२४ श्रीदासबोध. [ दशक
एक मूर्ख ॥ ७१ ॥ ऐसीं हीं मूर्खलक्षणें । श्रवणें चातुर्य बाणे । चित्त देऊ-
निया शहाणे । ऐकती सदा ॥ ७२ ॥ लक्षणें अपार असती । परी कांहीं
एक यथामती । त्यागार्थ बोलिलों श्रोतीं । क्षमा केली पाहिजे ॥ ७३ ॥
उत्तम लक्षणें घ्यावी । मूर्खलक्षणें त्यागावीं । पुढिले समासीं आघवीं । निरू-
पिलीं ॥ ७४ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे द्वितीयदशके मूर्खलक्षणं
नाम प्रथमः समासः ॥ १ ॥
२. उत्तमलक्षण.
श्रीगणेशाय नमः ॥ श्रोतीं व्हावें सावधान । आतां सांगतों उत्तम गुण ।
जेणेंकरितां बाणे खूण । सर्वज्ञपणाची ॥ १ ॥ वाट पुसल्याविण जाऊं नये ।
फळ वोळखिल्याविण खाऊं नये । सांपडली वस्तु घेऊं नये । एकाएकीं
॥ २ ॥ अतिवाद करूं नये । पोटीं कपट धरूं नये । शोधिल्याविण करूं
नये । कुळहीन कांता ॥ ३॥ विचारेंविण बोलूं नये । मर्यादेविण हालूं नये ।
विवंचनेविणें चालूं नये । कांहीं केल्या ॥ ४ ॥ प्रीतीविण रुसूं नये । चो-
रासि वोळखी पुसूं नये । रात्रीं पंथ क्रमूं नये । एकाएकीं ॥ ५ ॥ जनीं
आर्जव तोडूं नये । पापद्रव्य जोडूं नये । पुण्यमार्ग सोडूं नये । कदाकाळीं
॥ ६ ॥ निंदाद्वेष करूं नये । असत्संग धरूं नये । द्रव्यदारा हरूं नये ।
बलात्कारें ॥ ७ ॥ वक्त्यास खंडूं नये । ऐक्यतेसि फोडूं नये । विद्याभ्यास
सोडूं नये । कांहीं केल्या ॥ ८ ॥ तोंडाळासि भांडूं नये । वाचाळासि तंडूं
नये । संतसंग खंडूं नये । अंतर्यामीं ॥ ९ ॥ अतिक्रोध करूं नये । जिवल-
गासि खेदूं नये । मनीं वीट मानूं नये । शिकवणीचा ॥ १० ॥ क्षणक्षणा
रुसूं नये । लटिका पुरुषार्थ बोलूं नये । केल्याविण सांगूं नये । आपुला
पराक्रम ॥ ११ ॥ बोलिला बोल विसरूं नये । प्रसंगीं सामर्थ्य चुकूं नये ।
केल्याविण निर्खंदूं नये । पुढिलांसी कदा ॥ १२ ॥ आळसें सुख मानूं नये ।
चहाडी मनासी आणूं नये । शोधिल्याविण करूं नये । कार्य कांहीं ॥ १३
सुखा अंग देऊं नये । प्रयत्न पुरुषें सांडूं नये । कष्ट करितां त्रासूं नये ।
निरंतर ॥ १४ ॥ सभेमध्यें लाजू नये । बाष्कळपणें बोलूं नये । पैज होड
१. विचार केल्यांशिवाय. २. तिरस्कार अथवा धिक्कार करूं नये.

२ रा. ] उत्तमलक्षण. २५
घालूं नये । कांहीं केल्या ॥ १५ ॥ बहुत चिंता करूं नये । निःसंगपणें
राहूं नये । परस्त्रीतें पाहूं नये । पापबुद्धीं ॥ १६ ॥ कोणाचा उपकार घेऊं
नये । घेतला तरी राखूं नये । परपीडा करूं नये । विश्वासघात ॥ १७ ॥
शौचेंविण असूं नये । मळिण वस्त्र नेसूं नये । जाणारासी पुसूं नये । कोठें
जातोसि म्हणोनि ॥ १८ ॥ व्यापकेंपण सोडूं नये । पराधीन होऊं नये ।
आपलें ओझें घालूं नये । कोणी एकासी ॥ १९ ॥ पत्रेंविणें परतें करूं नये ।
हीनाचें ऋण घेऊं नये । ग्वाहीविण जाऊं नये । राजद्वारीं ॥ २० ॥ ल-
टकी जांजू घेऊं नये । सभेसि लटिकें करूं नये । आदर नसतां बोलूं नये ।
स्वाभाविक ॥ २१ ॥ अदेखणेपण करूं नये । अन्यायाविण गांजूं नये । अ-
नतिीनें वर्तू नये । अंगबळें ॥ २२ ॥ बहुत अन्न खाऊं नये । बहुत निद्रा
करूं नये । बहुत दिवस राहूं नये पिशुना

२६ श्रीदासबोध. [ दशक
वाचा नवस बुडवूं नये । आपुला धर्म उडवूं नये । भलते भरीं पडूं नये ।
विचारेंविण ॥ ३६ ॥ निष्ठुरपण धरूं नये । जीवहत्या करूं नये ।
पाउस देखोन जाऊं नये । अथवा अवकाळीं ॥ ३७ ॥ सभा देखोनि
गळूं नये । समयीं उत्तर टळूं नये । धिक्कारितां ढळूं नये । धारिष्ट
आपुलें ॥ ३८ ॥ गुरुविरहित असूं नये । नीच यातीचा गुरु करूं नये ।
जिणें शाश्वत मानूं नये । वैभवेंसीं ॥ ३९ ॥ सत्य मार्ग सोडूं नये ।
असत्य पंथें जाऊं नये । कदा अभिमान घेऊं नये । असत्याचा ॥ ४० ॥
अपकीर्ति सोडावी । सत्कीर्ति वाढवावी । विवेकें दृढ धरावी । वाट सत्याची
॥ ४१ ॥ न घेतां हे उत्तम गुण । तो मनुष्य अवलक्षण । ऐक त्याचें लक्षण ।
पुढिलिये समासीं ॥ ४२ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे द्वितीय-
दशके उत्तमलक्षणं नाम द्वितीयः समासः ॥ २ ॥
३. कुविद्यालक्षण.
श्रीगणेशाय नमः ॥ ऐका कुविद्येचीं लक्षणें । अतिहीन कुलक्षणें ।
त्यागार्थ बोलिलों श्रवणें । त्याग घडे ॥ १ ॥ ऐका कुविद्येचे प्राणी । जन्मा
येऊनि केली हानी । सांगिजेल इहीं लक्षणीं । श्रोतीं ओळखावा ॥ २ ॥
कुविद्येचा प्राणी असे । तो कठिन निरूपणीं त्रासे । अवगुणांची समृद्धि असे ।
ह्मणोनियां ॥ ३ ॥ श्लोक ॥ दंभो दर्पोऽभिमानश्च क्रोधः पारुष्यमेव च । अज्ञानं
चाभिजातस्य पार्थ संपदमासुरीम् ॥ टी०॥ काम क्रोध मद मत्सर । लोभ
दंभ तिरस्कार । गर्व ताठा अहंकार । द्वेष विवाद विकल्पी ॥ ४ ॥ आशा
ममता तृष्णा कल्पना । चिंता अहंता कामना भावना । असूया अविद्या
ईषणा वासना । अतृप्ति लोलंगतां ॥ ५ ॥ इच्छा वांञ्छा चिकित्सा निंदा ।
अनीति ग्रामेणी मस्ती सदा । जाणीव अवज्ञा विपत्ती आपदा । दुर्वृत्ति
दुर्वासना ॥ ६ ॥ स्पर्धा खटपट आणि चटपट । नव्हे झटपट आणि वटवट ।
सदा खटनट आणि लटपट । परम व्यथा आणि कुविद्या ॥७॥ कुरूप आणि
कुलक्षण । अशक्त आणि दुर्जन । दरिद्री आणि कृपण । अतिशयेंसी ॥८॥
आळसी आणि खादाड । दुर्बळ आणि लाताड । तुटक आणि लुबाड ।
१. गीं. अ. १६. २. मत्सर. ३. इच्छा. ४. लुब्धपणा. ५. हरामी. ६. शठ व नष्ट.

२ रा. ] कुविद्यालक्षण. २७
अतिशयेंसीं ॥ ९ ॥ मूर्ख आणि तपिलें । वेडें आणि वाचाळ । लटिकें
आणि तोंडाळ । अतिशयेंसीं ॥ १० ॥ नेणे आणि नायके । न ये आणि न
शिके । न करी आणि न देखे । अभ्यासदृष्टीं ॥ ११ ॥ अज्ञान आणि अवि-
श्वासी । छळवादी आणि दोषी । अभक्त आणि भक्तासी । देखों शकेना ॥ १२ ॥
पापी आणि निंदक । कष्टी आणि घातक । दुःखी आणि हिंसक । अति-
शयेंसीं ॥ १३ ॥ हीन आणि कृत्रिमी । रोगी आणि कुकर्मी । अमंगल आणि
अधर्मी । वासना रमे ॥ १४ ॥ नीच देह आणि ताठा । अप्रमाण आणि
फांटा । बाष्कळ आणि करंटा । विवेक सांगे ॥ १५ ॥ लंडी आणि उन्मत्त ।
निष्कामी आणि डुलत । भ्याड आणि बोलत । पराक्रम ॥ १६ ॥ कनिष्ठ
आणि गर्विष्ठ । न पुरतें आणि नष्ट । द्वेषी आणि भ्रष्ट । अतिशयेंसीं ॥ १७ ॥
अभिमानी आणि निःसंगळें । वोडगस्त आणि खळ । दांभिक आणि अन-
र्गळें । अतिशयेंसीं ॥ १८ ॥ वोखटें आणि विकारी । खोटें आणि अनुप-
कारी । अवलक्षण आणि धिक्कारी । प्राणिमात्रांसी ॥ १९ ॥ अल्पमति
आणि वादक । दीनरूप आणि भेदक । सूक्ष्मरूप आणि त्रासक । कुशब्देँ-
करूनि ॥ २० ॥ कठीणवचनी कर्कशवचनी । कापट्यवचनी संदेहवचनी ।
दुःखवचनी तीव्रवचनी । क्रूर निष्ठुर दुरात्मा ॥ २१ ॥ न्यूनवचनी पैशून्य-
वचनी । अशुभवचनी अनित्यवचनी । द्वेपवचनी अनृतवचनी । बाष्कळ-
वचनी धिक्कारी ॥ २२ ॥ कपटी कुटिल गांढ्याळ । कुरटें कुचर नाठाळ । कोपी
कुधन टवाळ । अतिशयेंसीं ॥ २३ ॥ तपिलें तामसी अविचार । पापी अनर्थी
अपस्मार । भूतसमंधी संचार । अंगीं वसे ॥ २४ ॥ आत्महत्यारा स्त्री-
हत्यारा । गोहत्यारा ब्रह्महत्यारा । मातृहत्यारा पितृहत्यारा । महापापी पतित
॥ २५ ॥ उणें कुपात्र कुतर्की । मित्रद्रोही विश्वासघातकी । कृतघ्न गुरुतल्पी
नरॅकी । आततायी जल्पक ॥ २६ ॥ नित्य भांडण झगडा कलह । अधर्म
अनराहाटी शोकसंग्रह । चाहाड व्यसनी विग्रहीँ । निग्रहकर्ता ॥ २७ ॥ द्वाड
अपेशी वोंगळ । चाळक चुंबक लचाळ । स्वार्थी अभिलापी वोढाळ । अदत्त
भांड अदेखणा ॥ २८ ॥ शठ शुंभ कातरूं । लंड तरमुंडें सितरूं । बंड पाखांड
१. तापट. २. निर्लज्ज. ३. स्वच्छंद. ४. गुरुपत्नीशीं जाणारा. ५. नरकांत
पडणारा. ६. कुमार्ग. ७. भांडण. ८. कृपण. ९. भित्रा १०. घुसणारा. ११. ठक.

२८ श्रीदासबोध. [ दशक
तस्करु । अपहारकर्ता ॥ २९ ॥ धीट सैराट मोकाट । चाट चावट वाजटें¹ ।
धोंटें उद्भट लंपट । बटवाळै² कुबुद्धि ॥ ३० ॥ मारेकरी वरपेकॅरी। दरवडेकरी
खाँणोरी⁵ । मैंद भौंदु परद्वारी । भुरेरेंकरी⁶ चेटकी ॥ ३१ ॥ निःशंक निला-
जिरा कैलभंट⁷ । टोणपा लौंद घट उद्भट । ठंस⁸ ठोंबसें⁹ खटनट । जगभांड विकारी¹⁰
॥ ३२ ॥ अधीर आळकीं अनाचारी । अंध पंगु खोकलेकरी । थौंटा बधिर
दभेकरी । तरी ताठा न सांडी ॥ ३३ ॥ विद्याहीन वैभवहीन । कुळहीन
लक्ष्मीहीन । शक्तिहीन सामर्थ्यहीन । अदृष्टहीनँ¹¹ भिकारी ॥ ३४ ॥ बळहीन
कळाहीन । मुद्राहीन दीक्षाहीन । लक्षणहीन लावण्यहीन । अंगहीन वि-
पारैँ¹² ॥ ३५ ॥ युक्तिहीन बुद्धिहीन । क्रियाहीन सत्वहीन । आचारहीन
विचारहीन । विवेकहीन संशयी ॥ ३६ ॥ भक्तिहीन भावहीन । ज्ञानहीन
वैराग्यहीन । शांतिहिन क्षमाहीन । सर्वहीन क्षुल्लक ॥ ३७ ॥ समय नेणे
प्रसंग नेणे । प्रयत्न नेणे अभ्यास नेणे । आर्जव नेणे मैत्रिकी नेणे । कांहींच
नेणे अभागी ॥ ३८ ॥ असो ऐसे नाना विकार । कुलक्षणांचे कोठार । ऐसे
कुविद्येचे नर । श्रोतीं वोळखावे ॥ ३९ ॥ ऐसीं कुविद्येचीं लक्षणें । ऐकोनि
त्यागाचि करणें । अभिमानें तैंन्हेँ¹³ भरणें हें विहित नव्हे ॥ ४० ॥ इति
श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे द्वितीयदशके कुविद्यालक्षणं नाम तृतीयः
समासः ॥ ३ ॥
४. भक्तिनिरूपण.
श्रीगणेशाय नमः ॥ नाना सुकृतांचें फळ । तो हा नरदेह केवळ । त्याही-
मध्यें भाग्य सफळ । तरीच सन्मार्ग लागे ॥ १ ॥ नरदेहीं विशेष ब्राह्मण ।
त्याहीवरी संध्या स्नान । सद्वासना भगवद्भजन । घडे पूर्वपुण्यें ॥ २ ॥
भगवद्भक्ति हे उत्तम । त्याहीवरी सत्समागम । काळ सार्थक हाचि परम
लाभ जाणावा ॥३॥ प्रेमप्रीतीचा सद्भाव । आणि भक्तांचा समुदाय । हरि-
कथा महोत्सव । तेणें प्रेम दुणावे ॥ ४ ॥ नरदेहीं आलिया एक । कांहीं
करावें सार्थक । जेणें पाविजे परलोक । परम दुर्लभ जो ॥ ५ ॥ विधियुक्त
१. वात्रट. २. कुभांडी. ३. भ्रष्ट. ४. लुटारू. ५. काळीजखाऊ. ६. भुरळ
पाडणारा ७. कळ काढणारा. ८. ताठर. ९. ठोंब्या. १०. हाबरा. ११. दुर्दैवी.
१२. कुरूप. १३. इट्टांस पेटणें.