दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 45, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें१० श्रीदासबोध. [ दशक
संतांची महिमा । बोलिजे तितुकी उणी उपमा । जयांचेनि मुख्य परमात्मा
प्रगट होय ॥ २६ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे प्रथमदशके संत-
स्तवनं नाम पंचमः समासः ॥ ५ ॥
६. श्रोतृस्तवन.
श्रीगणेशाय नमः ॥ आतां वंदूं श्रोते जन । भक्त ज्ञानी संत सज्जन ।
विरक्त योगी गुणसंपन्न । सत्यवादी ॥ १ ॥ एक सत्वाचे सागर । एक बु-
द्धीचे आगर । एक श्रोते वैरागरे । नाना शब्दरत्नांचे ॥ २ ॥ जे नाना
अर्थामृताचे भोक्ते । जे प्रसंगीं वक्त्याचे वक्ते । नाना संशयाचे छेदिते । नि-
श्चयी पुरुष ॥ ३ ॥ ज्यांची धारणा अपार । जे ईश्वराचे अवतार । नातरी
प्रत्यक्ष सुरवर । बैसले जैसे ॥ ४ ॥ कीं ऋषीश्वरांची मंडळी । शांतस्वरूप
सत्वागैळी । जयांचेनि सभामंडळीं । परम शोभा ॥ ५ ॥ हृदयीं वेदगर्भ
विलसे । मुखीं सरस्वती विलासे । साहित्य बोलतां जैसे । भासती देवगुरु ॥
६ ॥ जे पवित्रपणें वैश्वानरें । जे स्फूर्तिकिरणाचे दिनकर । ज्ञातेपणें दृष्टी-
समोर । ब्रह्मांड नये ॥ ७ ॥ जे अखंड सावधान । जयांसि त्रिकाळींचें
ज्ञान । सर्वकाळ निरभिमान । आत्मज्ञानी ॥ ८ ॥ ज्यांचे दृष्टीखालून गेलें ।
ऐसें कांहींच नाहीं उरलें । पदार्थमात्रासि लक्षिलें । मनें जयांच्या ॥ ९ ॥
जें जें कांहीं आठवावें । तें तें तयांसि पूर्वीच ठावें । तेथें काय अनुवादावें ।
ज्ञातेपणेंकरूनी ॥ १० ॥ परंतु हे गुणग्राहक । म्हणोनि बोलतों निःशंक ।
भाग्यपुरुष काय एक । सेवीत नाहीं ॥ ११ ॥ सदा सेवती दिव्यान्नें ।
पालटाकारणें अवीट अन्नें । तैसीं हीं माझीं वचनें । प्राकृत ॥ १२ ॥ आपुले
शक्त्यनुसार । भावें पुजावा परमेश्वर । परंतु पुजूं नये हा विचार । कोठेंचि
नाहीं ॥ १३ ॥ तैसा मी एक वाग्दुर्बळ । श्रोते परमेश्वरचि केवळ । त्यांची
पूजा वाचाबरळ । करूं पाहे ॥ १४ ॥ व्युत्पत्ति नाहीं कळा नाहीं । चातुर्य
नाहीं प्रबंध नाहीं । भक्ति ज्ञान वैराग्य नाहीं । गौळ्यतां नाहीं वचनाची ॥
१. धैर्याचे, किंवा सत्वगुणाचे. २. खान. ३. सत्वगुणानें अधिक. ४. वेदांत
वर्णन केलेलें ब्रह्म. ५. अलंकारयुक्त भाषण. ६. बृहस्पति. ७. अग्नि. ८. वाणीनें
वरळणारा, वाचाट. ९. रसाळपणा.