दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 43, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ेंमेस उणा दिनकर । सद्गुरुज्ञानप्रकाश थोर । आतां उपमावा फणिवर¹ ।
तरी तो भारवाही ॥ २२ ॥ आतां उपमेस द्यावें जळ । तरी तें कालांतरें
ओटेल सकळ । सद्गुरुरूप तें निश्चळ । जाणार नाहीं ॥ २३ ॥ सद्गुरुस उप-
मावें अमृत । तरी अमर² धरिती मृत्युपंथ । सद्गुरुकृपा यथार्थ । अमराचि
करी ॥ २४ ॥ सद्गुरुस म्हणावें कल्पतरू । तरी हा कल्पनातीत विचारू ।
कल्पवृक्षाचा अंगिकारू । कोण करी ॥ २५ ॥ चिंता मात्र नसे मनीं । कोण
पुसे चिंतामणी । कामधेनूची दुभणी । निष्कामास न लगती ॥ २६ ॥ सद्गु-
रूस म्हणों लक्ष्मीवंत । तरी ते लक्ष्मी नाशवंत । ज्याचे द्वारीं असे तिष्ठत ।
मोक्षलक्ष्मी ॥ २७ ॥ स्वर्गलोक इंद्रसंपत्ती । हे कालांतरें विटंबती । सद्गुरु-
कृपेची प्राप्ती । काळांतरीं चळेना ॥ २८ ॥ हरिहरब्रह्मादिक । नाश पावती
सकळिक । सर्वदा अविनाश एक । सद्गुरुपद ॥ २९ ॥ तयास उपमा काय
द्यावी । नाशवंत सृष्टि आघवी । पंचभौतिक उठाठेवी । न चले येथें ॥ ३० ॥
म्हणोनि सद्गुरु वर्णवेना । हे गे हेचि माझी वर्णना । अंतरस्थितीच्या
खुणा ॥ अंतर्निष्ठ जाणती ॥ ३१ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
प्रथमदशके सद्गुरुस्तवनं नाम चतुर्थः समासः ॥ ४ ॥
५. संतस्तवन.
श्रीगणेशाय नमः ॥ आतां वंदीन संतसज्जन । जे परमार्थाचें अधिष्ठान³ ।
जयांचेनि गुह्य ज्ञान । प्रगटे जनीं ॥ १ ॥ जे वस्तु परम दुर्लभ । जयाचा
अलभ्य लाभ । तेंचि होय परम सुलभ । सत्संगेंकरूनी ॥ २ ॥ वस्तु प्रग-
टाचि असे । पाहतां कोणासीच न दिसे । नाना साधनें सायासें । न पडे
ठाईं ॥ ३ ॥ जेथें परीक्षावंत थकले । नातरी डोळसचि अंध झाले । पाहत
असतांच चुकले । निज⁴वस्तूसी ॥ ४ ॥ जें दीपाचेनि दिसेना । नाना प्रकार्शे
गवसेना । नेत्रांजनेंहि वसेना । दृष्टीपुढें ॥ ५ ॥ सोळा कळीं पूर्ण शशी⁵ ।
दाखवूं शकेना वस्तूसी । तीव्र आदित्य कळाराशी । तोहि दाखवीना ॥ ६ ॥
जया सूर्याचेनि प्रकाशें । ऊर्णतंतू⁶ तोहि दिसे । नाना सूक्ष्म पदार्थ भासे ।
१. शेष. २. देव. ३. आश्रय. ४. परब्रह्मास. ५. चंद्र. ६. कोळ्याचें सूत.