दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 38, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें१ सा.] गणेशस्तवन. ३
अवलक्षण । तेचि होती सुलक्षण । धूर्त तार्किक विचक्षण । समय जाणती
॥ ३२ ॥ आळसी तेचि साक्षेपी¹ होती । पापी तेचि पस्तावती । निंदक
तेचि वंदूं लागती । भक्तिमार्गासी ॥ ३३ ॥ बद्धचि होती मुमुक्षू² । मूर्खचि
होती अतिदक्ष । अभक्तचि पावती मोक्ष । भक्तिमार्गों ॥ ३४ ॥ नाना दोष
ते नासती । पतित तेचि पावन होती । प्राणी पावे उत्तम गती । श्रवणमात्रें
॥३५॥नाना धोके देहबुद्धीचे । नाना किंतु संदेहाचे । नाना उद्वेग³ संसाराचे ।
नासती श्रवणें ॥ ३६ ॥ ऐसी याची फलश्रुती । श्रवणें चुके अधोगती ।
मनासी होय विश्रांती । समाधानें ॥ ३७ ॥ जयाचा भावार्थ जैसा । तयास
लाभ तैसा । मत्सर धरी जो पुंसां⁴। तयासी तेंचि प्राप्त ॥ ३८॥ इति श्रीदास-
बोधे गुरुशिष्यसंवादे प्रथमदशके ग्रंथारंभनिरूपणं नाम प्रथमः समासः ॥१॥
२. गणेशस्तवन.
श्रीगणेशाय नमः ॥ ॥ ॐनमोजी गणनायका । सर्वसिद्धिफलदायका ।
अज्ञानभ्रांतिछेदका ॥ बोधरूपा ॥ १ ॥ माझिये अंतरीं भरावें ॥ सर्वकाळ
वास्तव्य करावें । मज वाक्शून्यासि वदवावें । कृपाकटाक्षेंकरूनी ॥ २ ॥
तुझिये कृपेचेनि बळें । वितुळती भ्रांतीचीं पडळें⁶ । आणि विश्वभक्षकें
काळें । दास्यत्व कीजे ॥ ३ ॥ येतां निजकृपेची उडी । विघ्नें कांपती बापु-
डीं । होऊनि जाती देशधडी । नाममात्रें ॥ ४ ॥ म्हणोनि नाम विघ्नहर ।
आम्हां अनाथांचें माहेर । आदिकरूनी हरिहर । अमर वंदिती ॥ ५ ॥
वंदूनियां मंगलनिधी । कार्य करितां सर्व सिद्धी । आघात अडथळे उपाधी ।
बाधूं शकेना ॥ ६ ॥ जयाचें आठवितां ध्यान । वाटे परम समाधान । नेत्रीं
निघोनियां मन । पांगुळे सर्वांगीं ॥ ७ ॥ सगुण रूपाची ठेव । महालावण्य-
लाघव । नृत्य करितां सकळ देव । तटस्थ होती ॥ ८ ॥ सर्वकाळ मदोन्म-
त्त । सदा आनंदें डोलत । हर्षे निर्भरें उदितें⁷ । सुप्रसन्नवदन ॥ ९ ॥ भव्य रूप
वितंड । भीममूर्ति महाप्रचंड । विस्तीर्ण मस्तक उदंड । सिंदूर चर्चिला
१. मोठे उद्योगी. २. मुक्त होण्याची इच्छा करणारे. ३. दुःखें. ४. पुरुष.
५. मूर्खास. ६ पडदे. ७. अतिशय उल्हसित.