सामग्री पर जाएँ
सर्वकोश
दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary

समर्थ रामदास स्वामी द्वारा

DevanagariHindipublished467 पृष्ठ

पृष्ठ 36, कुल 467 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 36

श्रीदासबोध.
दशक पहिला.
१ ग्रंथारंभनिरूपण.
श्रीगणेशाय नमः ॥ ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ श्रोते
पुसती कोण ग्रंथ । काय बोलिलें जी येथ । श्रवण केलियानें प्राप्त । काय
आहे ॥ १ ॥ ग्रंथनाम दासबोध । गुरुशिष्यांचा संवाद । येथें बोलिला
विशदें । भक्तिमार्ग ॥ २ ॥ नवविधा भक्ति आणि ज्ञान । बोलिलें वैराग्या-
चें लक्षण । बहुधा अध्यात्मनिरूपण । निरूपिलें ॥ ३ ॥ भक्तीचेनि योगें देव ।
निश्चयें पावती मानव । ऐसा आहे अभिप्राय । इये ग्रंथीं ॥ ४ ॥ मुख्य
भक्तीचा निश्चय । शुद्ध ज्ञानाचा निश्चय । आत्मस्थितीचा निश्चय । बोलि-
ला असे ॥ ५ ॥ शुद्ध उपदेशाचा निश्चय । सायुज्य मुक्तीचा निश्चय । मोक्ष-
प्राप्तीचा निश्चय । बोलिला असे ॥ ६ ॥ शुद्ध स्वरूपाचा निश्चय । विदेहें-
स्थितीचा निश्चय । अलिप्तपणाचा निश्चय । बोलिला असे ॥ ७ ॥ मुख्य
देवाचा निश्चय । मुख्य भक्ताचा निश्चय । जीवशिवांचा निश्चय । बोलिला
असे ॥ ८ ॥ मुख्य ब्रह्माचा निश्चय । नाना मतांचा निश्चय । आपण कोण
हा निश्चय । बोलिला असे ॥ ९ ॥ मुख्य उपासनालक्षण । नाना कवित्व-
लक्षण । नाना चातुर्यलक्षण । बोलिलें असे ॥ १० ॥ मायोद्भवाचें लक्षण ।
पंचभूतांचें लक्षण । कर्ता कोण हें लक्षण । बोलिलें असे ॥ ११ ॥ नाना
१. स्पष्ट, स्वच्छ. २. श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवा, पूजा, वंदन, दास्य,
सख्य व देहसमर्पण अशी नऊ प्रकारची. ३. शुद्ध ब्रह्मीं लीन होणें. ५.
देहाभिमानरहित स्थितीचा. ६. मायेच्या उत्पत्तीचें. ७. पृथ्वी, उदक, अग्नि, वायु
आणि आकाश यांचें.