सामग्री पर जाएँ
सर्वकोश
दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary

समर्थ रामदास स्वामी द्वारा

DevanagariHindipublished467 पृष्ठ

पृष्ठ 33, कुल 467 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 33

३० उपोद्घात.
( ३ ) राम उपासना माझी । त्रयलोक्य सुख पावलें ।
सोडिले देव इंद्रादि । तोडिलीं बंधनें बळें ॥
कीर्तीसी तुळणा नाहीं । प्रतापे आगळा बहु ।
न्याय नेमस्त हे लीळा । न भूतो न भविष्यति ॥
उन्मत्त रावणें येणें । त्रैलोक्य पीडिलें बळें ॥
देव ते घातले बंदी । कैपक्षी राम पावला ॥
श्रीरामांनीं सीताशुद्धि करून शक्ति ऊर्फ आदिमाया-जगज्जननी-हिची
आराधना करून तिच्या वरप्रसादानें रावणाचा पराभव केला असें सांगून पुढें
समर्थ म्हणतात:—
( ४ ) जगजनि रामवरदानी । तयीपासुनि बोलिजे ।
उदंड ऐकिलें होतें । प्रतीत मजला नसे ॥
प्रतापगिरीचें ठायीं । आदिशक्ती विराजते ।
कामना पुरती तेथें । प्रचीती रोकड्या जनीं ॥
तुळजापुरीची माता । प्रतापेंचि प्रगटली ॥
आदिशक्ती माहंमाया । कुळीची कुळस्वामिनी ॥
कुळची पाळिलें आम्हां । रक्षिलें बहुतां परीं ।
तिची ते वैष्णवी माया । तारिते मारिते जनीं ॥
शक्तीनें पावती सुखें । शक्ती नसतां विटंबना ।
शक्तीनें नेटका प्राणी । वैभवें भोगितां दिसे ॥
कोण पुसे अशक्ताळा । रोगीसे बराडी दिसे ।
कळा नाहीं कांति नाहीं । युक्ति बुधी दुरावली ॥
साजिरी शक्ती तों काया । काया मायाचि वाढवी ।
शक्ती तों सर्वही सुखें । शक्ती आनंद भोगवी ॥
सार संसार शक्तीनें । शक्तीनें शक्ति भोगिजे ।
शक्त तो सर्वही भोगी । शक्तीवीण दारिद्रता ॥
शक्तीनें मिळती राज्यें । युक्तीनें यत्न होतसे ।
शक्ती युक्ती जये ठायीं । तेथें श्रीमंत धांवती ॥
युक्ती ते जाड कळा । विश्र्वकीसी तुळणा नसे ।