दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 31, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें२८ उपोद्घात.
( ८ ) झिजल्यावांचूनी कीर्ति कैची । मान्यता नव्हे कीं फुकाची ॥
उपाधीसी विस्तारावें । उपाधींत न संपाडावें ।
( ११-५-९ )
( १० ) उत्कट भव्य तेंचि घ्यावें । मळमळित अवघेंच टाकावें ।
निस्पृहपणें विख्यात व्हावें । भूमंडळीं । ( -१४-१ )
( ११ ) नाना जनांचें हृदय । मृदु शब्दें उकलावें ॥
( १२ ) वेड्यास वेडें म्हणों नये । वर्म कदापि बोलों नये ।
तरीच घडे दिग्विजये । निस्पृहासी ॥ ( १३-१०-२६ )
( १३ ) बरें वाईट सोसावें । समुदायाचें ॥
( १४ ) शरीर परोपकारीं लावावें । बहुतांच्या कार्यास यावें ।
उणें पडों नेदावें । कोणीयेकाचें ॥
( १५ ) उत्कट भक्ति उत्कट ज्ञान । उत्कट चातुर्य उत्कट भजन ।
उत्कट योग अनुष्ठान । ठायीं ठायीं ॥
कांहींएक उत्कटेंविण । कीर्ति कदापि नव्हे जाण ।
उगेंच वणवण हिंडोन । काये होतें ॥
हे उतारे अगदीं निवडक व त्रोटक आहेत. त्यांत बीजरूपानें जीं तत्त्वें
सांगितलीं आहेत, त्यांचा विस्तार पहावयाचा असल्यास दासबोध ग्रंथ समग्र
लक्षपूर्वक वाचावा.
दासबोधाखेरीज समर्थांचे काव्यबद्ध असे आणखी कित्येक प्रबंध आहेत.
त्यांपैकीं कांहीं प्रकाशित व कांहीं अप्रकाशित आहेत. अप्रकाशित प्रकरणांपैकीं
बरीच प्रकरणें धुळ्याच्या सत्कार्योत्तेजक सभेस उपलब्ध झालीं आहेत व त्यां-
तील कांहीं तिनें एका स्वतंत्र खंडाच्या रूपानें प्रसिद्धहि केलीं आहेत. हीं सर्व
प्रकरणें समर्थांनीं निरनिराळ्या प्रसंगीं लिहिलेलीं आहेत. त्यांतील मतलब सामा-
न्यतः दासबोधांतील प्रमेयास पोषक आहे. किंबहुना, ह्या प्रमेयांचें विशेष
व खुलासेवार स्पष्टीकरणच त्यांत आहे असें म्हटलें तरी चालेल. ह्या स्फुट-
काव्याप्रमाणें समर्थांनीं एक रामायणहि रचिलें आहे. परंतु हें रामायण साग्र
नाहीं. सीतेची बंधमुक्तता करून रावणाचा वध करण्याचा जो भाग मूळ
रामायणांत आहे तोच समर्थांनीं आपल्या रामायणाचा मुख्य विषय बनविला