दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 27, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें२४ उपोद्घात.
क्रांतीनें केला. परंतु ज्या फ्रेंच लोकांनीं ह्या कल्पनांची कास धरून पूर्वीची परं-
परा तोडून टाकली, त्यांनाहि ह्या तिन्ही वस्तूंचा त्यांच्या कल्पनेबरहुकूम लाभ
झाला नाहीं; व एक प्रकारचा जुलूम नाहींसा करण्याकरितां अघोरपणें अपार
मनुष्यसंहार करूनहि अखेर त्यांस पुन्हा पूर्वपदावर यावें लागलें ! पाद्र्यांचा व
बोरबोन राजघराण्याचा जुलूम त्यांनीं नष्ट केला, पण नेपोलियनची एकतंत्री
सत्ता त्यांस मान्य करावी लागली ! ह्या लोकांच्या ह्या उच्छृंखल वृत्तीमुळें एका
शतकाच्या आंत ३।४ वेळां क्रांतीचे प्रसंग त्यांच्यावर आले व त्यामुळें त्यांच्या
समाजाची मोठी हानि होऊन त्यांस युरोपांतील आपलें श्रेष्ठ स्थान गमावून
दुय्यम प्रकारचें राष्ट्र होऊन राहावें लागलें. अजूनहि त्या लोकांचा समाज
स्थैर्य पावला आहे अथवा मानवी प्राण्याच्या अंतिम ध्येयाच्या नजिक येऊन
पोंचला आहे असें म्हणतां येत नाहीं. फ्रेंच राष्ट्राचा इतिहास म्हणजे निरनिरा-
ळ्या सामाजिक व राजकीय तत्त्वांच्या अतिरेकाचा इतिहास होय, असें 'आंद्रे ल
बाँ' नामक फ्रेंच इतिहासकार व फ्रेंच चेंबर ऊर्फ पार्लमेंटचा सभासद यानें
आपल्या 'मॉडर्न फ्रान्स' ह्या ग्रंथांत स्पष्टपणें कबूल केलेलें आहे. पूर्वपरंपरा
मोडण्याची प्रवृत्ति हेंच ह्या अतिरेकाचें मुख्य कारण आहे. फ्रेंच लोक स्वभावतः
मोठे बुद्धिमान, चपल, दक्ष व सुशिक्षित असल्यामुळें आणि त्यांचें राज्ययंत्र
त्यांच्याच हातीं असल्यामुळें त्यांना इतके धक्केचपेटे सोसूनहि राष्ट्र ह्या
नात्यानें जिवंत राहतां आलें. राज्ययंत्र स्वदेशी असल्यामुळें एकप्रकारची समाज-
व्यवस्था बरी नाहीं असें वाटतांच तेथें दुसरी, किंवा तीहि बरी न दिसतांच
तिच्या ठिकाणीं तिसरी; अशी भराभर योजना करून जिवंत राहणें त्यांस शक्य
झालें. परंतु ज्या देशांत परराज्य असेल तेथील लोक जर उच्छृंखलपणा करूं
लागतील तर ते नाशाचेच धनी व्हावयाचे हें उघड आहे. ही गोष्ट लक्षांत घेऊनच
समर्थांनीं परंपरा न मोडतां चातुर्वर्ण्याच्या पद्धतींत जे कांहीं दोष तत्कालीं शिरले
होते ते काढून टाकून ती संस्था फिरून कार्यक्षम बनविण्याचा प्रयत्न केला व तो
यशस्वी झाला.
या चातुर्वर्ण्याप्रमाणेंच भक्तिमार्गाचीहि समर्थांनीं पूर्वपरंपरा कायम
ठेवूनच सुधारणा केली. भक्तिमार्गालाहि त्या वेळीं एकदेशीपणा आलेला होता.
भक्तिमार्गी लोक त्या काळीं सर्व लौकिक कर्मांचा त्याग करून दुस-