दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 21, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें१८ उपोद्घात.
दासबोधांतील कलिधर्मनिरूपणांत व इतर काव्यांत जागोजाग चितारिलें आहेच.
(समर्थांची स्फुट कविता, रामदासी ग्रंथमाला खंड ३ पहा.) महाराष्ट्रांत त्या
वेळीं असलेली राज्यसंस्था यवनांच्या ताब्यांत होती. अर्थात् आमचा धर्म व
तत्प्रणीत नीति यांच्या स्थापनेस व अभिवृद्धीस ह्या राज्यसंस्थेचा कांहींएक उप-
योग होण्यासारखा नव्हता; इतकेंच नव्हे, तर उलट त्यांचा ऱ्हास करण्यास ती
कारणीभूत झालेली होती. अर्थात्च ती पूर्णपणें मोडून टाकून त्या ठिकाणीं
ह्या धर्मास व नीतीस पाठिंबा देणारी आणि तेणेंकरून मोक्षसाधनाचा मार्ग
सुकर करणारी अशी स्वदेशी राज्यसंस्था स्थापन करणें अवश्य झालेलें
होतें. ही विशिष्ट परिस्थिति लक्षांत घेऊनच समर्थांनीं/ 'राजकारण' हें आपल्या
सांप्रदायाचें दुसरें अंग बनविलें, व तद्विषयक शिकवणीचा दासबोधांत समावेश
केला. तात्पर्य, राजकारण ऊर्फ राज्यस्थापना हें साधन म्हणून समर्थांनीं योजिलें.
साध्य व साधन यांत मोठा भेद आहे, आणि तो लक्षांत न आल्यास मोठमोठे
प्रमाद घडून येण्याचा संभव असतो, हें लक्षांत घेणें जरूर आहे. धर्म व नीति
यांचा उपदेश करण्याचें काम समर्थकालीन अनेक संतांनीं केलें होतें; परंतु त्या-
पासून फारसें कांहीं कार्य झालें नाहीं. समाजांत मुमुक्षेचा उदय होण्यास हा उप-
देश थोडा फार उपयोगीं पडला असेल, नाहीं असें नाहीं; परंतु यवनराज्यामुळे
उत्पन्न झालेल्या विपरीत स्थितींत धर्माच्या व नीतीच्या बाबतींत सर्वत्र जी बज-
बजपुरी व स्वैराचार यांचें प्राबल्य माजलें तें मोडण्याचें काम संतांच्या उपदेशानें
'झालें नाहीं व होण्यासारखेंहि नव्हतें. अज्ञ जनांच्या मनावर संतांच्या उपदेशाचा
कांहीं तरी इष्ट परिणाम होण्याचा संभव होता; पण धर्म व नीति यांचा राजा-
श्रय सुटला म्हणजे विद्वन्मन्य असा जो एक पढतमूर्खांचा वर्ग समाजांत असतो
(याचें वर्णन दासबोधाच्या प्रारंभींच आहे), तो फार उच्छृंखल होऊन अनीति
व अधर्म यांचा प्रसार करतो. त्याला वेसण घालण्याचें काम संतांसारख्या
सद्हेतुप्रेरित पण पंगु उपदेशकांच्या हातून होत नाहीं. तें करण्याकरितां शासन-
सामर्थ्याचें अधिष्ठान असणाऱ्या सामाजिक अथवा राजकीय संस्था स्थापाव्या
लागतात व त्यांचेंहि यथान्याय रक्षण व्हावें म्हणून धर्म व नीति यांचा अभि-
मान बाळगणारी राज्यसंस्था असावी लागते. ही गोष्ट लक्षांत घेऊनच सम-
र्थांनी 'समुदाय' ऊर्फ संघटना करून धर्मस्थापना व राज्यस्थापना करण्याचा