सामग्री पर जाएँ
सर्वकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 58, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 58

३२ सार्थ तुकारामगाथा
६८ पवित्र सोंवळीं । एक तींच भूमंडळीं ॥ १ ॥
ज्यांचा आवडता देव । अखंडित प्रेमभाव ॥ २ ॥
तोंच भाग्यवंतें । सरतीं पुरतीं धनवित्तें ॥ ३ ॥
तुका म्हणे देवा । त्यांची केल्या पाये सेवा ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :-भूमंडळीं-या जगतात, सरतीं पुरतीं-संपन्न, विपुल
अर्थ - जगात भक्त हेच अति पवित्र व सोवळे असतात. १ त्यांचा देव मोठा आवडता व प्रेमाचा असून
त्याविषयी त्याच्या मनात अखंड प्रेमभाव असतो. २ हे भक्त मोठे भाग्यवंत असून धनधान्य, संपत्ती यांची विपुलता
त्याच्या घरी असते, म्हणजे या काळजीत ते कधी नसतात ३ तुकाराम महाराज म्हणतात, अशा संतांची सेवा
केल्यास ती देवाला पोचते. ४
६९ आशाबद्ध जन । काय जाणे नारायण ॥ १ ॥
करी इंद्रियांची सेवा । पाहे आवडीचा हेवा ॥ २ ॥
भ्रमलें चावळे । तैसें उचित न कळे ॥ ३ ॥
तुका म्हणे विषें । अन्न नाशियेलें जैसें ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :-भ्रमले-भ्रमलेले, चावळे-चावळलेले.
अर्थ :- आशाबद्ध लोक परमेश्वरास कसे जाणणार ? त्यांना परमेश्वर कसा समजणार ? १ तो तर
इंद्रियाच्या म्हणजे विषयसुखाच्या सेवेत तत्पर असतो, आवडीच्या विषयाचाच हेवा त्याला वाटत असतो २
भ्रमलेला, चावळलेला मनुष्य बोलतो तेव्हा त्यात उचित-अनुचित असे काहीच नसते, आशेने बद्ध असलेल्याची गत
अशीच असते. ३ ' तुकाराम महाराज म्हणतात, सुग्रास अन्नात विष कालविले म्हणजे जसे ते अन्न नासून जाते तसे
आशाबद्ध माणसाचे आयुष्य व्यर्थ होते. ४
७० ढेंकर्रें जेवण दिसे साचें । नाहीं तरि काचें कुंथाकुंथों ॥ १ ॥
हेही बोल तेही बोल । कोरडे फोल रुचीविण ॥ २ ॥
गव्हांचिया होती परी । फके वरी खाऊं नये ॥ ३ ॥
तुका म्हणे असे हातांचें कांकण । तयासी दर्पण विल्हाळक ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :-साचे-खरोखर, काचे-कच्चे, खोटे, फोल-फुकट, परी-प्रकार, फकेवरी-फुकट्या मारून,
थवाणे मारून, विल्हाळक-व्यर्थ
अर्थ - तृप्ती करणारे जेवण झाले आहे की नाही ते सहजच येणाऱ्या ढेकरीवरून समजते जेवण यथातथाच
झाले तर ढळेळळेच खोटे) ढेकर ध्यानात येतेच. १ तृप्त होऊन ढेकर देणाऱ्याचेही बोलच; व उपाशी राहून
खोटी ढेकर देण्याचेहो बोलच. पण पहिल्याचे स्वानुभवी व खरे आहेत, दुसरे फोलकटाप्रमाणे व्यर्थ आहेत. २ गव्हाचे
पुष्कळव निरनिराळे पदार्थ होतात म्हणून ते नुसतेच फाके अथवा थकाणे भरून खाऊ नयेत ३ तुकाराम महाराज
म्हणतात, हातच्या कंकणाला आरसा घेणे व्यर्थच नव्हे काय ? ४
७१ करावी ते पूजा मनेंचि उत्तम । लौकिकाचें काम काय असे ॥ १ ॥
फळावें तयासि कळें अंतरींचें । कारण तें साचें साचा अंगीं ॥ २ ॥
अतिशया अंतीं लाभ किंवा घात । फळ देतें चित्त बीजा ऐसे ॥ ३ ॥
तुका म्हणे जेणें राहे समाधान । ऐसें तें भजन पार पावी ॥ ४ ॥