सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 578, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ें५३२ सार्थ तुकारामगाथा
मनात ठेवण्याची भीती बाळगण्याचे कारण नाही संसारास त्यांनी भिण्याची जरूरी नाही २ विक्षेप फर्ने सूर्य
प्रयासान करावयाची झाली तर सासारिक कधीच पुरा पडणार नाही आणि धर्म तर फळ देणारा असल्याने तो या
विठ्ठलाच्या नामाच्या रूपानेच आचरावा त्याच्या योगाने संसाराचे दु ख नाहीसे होते ३ या विठ्ठलनामाच्या साधनात
काही सोडणे, काही माडणे याची खटपट करावी लागत नाही काही वेदशास्त्राचा अर्थ पाहावा लागत नाही तुकाराम
महाराज म्हणतात, एका विठ्ठलनामात सर्व साधनांचा समावेश झाला आहे ४
१२१२ नये इच्छू सेवा स्वेच्छा जगाची । अवज्ञा देवाची घडे तेणे ॥ १ ॥
देहाचा निग्रही त्याचे तो सांभाळी । मग नये कळि अंगावरी ॥ २ ॥
आपलिया इच्छा माता सेवा करी । न बाधी ते थोरी येणे क्षोभें ॥ ३ ॥
तुका म्हणे साडा दंभींचे दिमाख । मोडशीचे दुख गांड फाटी ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - स्वेच्छा-स्वत च्याच तत्रान वागणाऱ्या जगाची, फळि-सकट
अर्थ - स्वतः च्याच तत्रान वागणाऱ्या जगाच्या सेवेची इच्छा कधी करू नये त्यामुळे देवाची अवज्ञा मात्र
होत असते १ या देहाचा निग्रह करणारा देवच असल्यामुळे त्याचे तो सांभाळीत असतो त्यायोगे कोणतेही सकट
आपल्या अगावर कधीच येत नाही २ आई आपल्या मुलाची देखभाल आपल्याच इच्छेनुसार करीत असते या
थोरवीमुळे तिच्या मनाचा क्षोभ तिला कधी बाधकारी होत नाही ३ तुकाराम महाराज म्हणतात, नुसते तोडवेखले
दिमाख सोडून द्या साधे मोडशीचे दुखणे झाले तरी गाड फाटली जाते ४
१२१३ सत्य सत्यें देतें फळ । नाही लागतचि बळ ॥ १ ॥
ध्यावे देवाचे ते पाय । धीर सकळ उपाय ॥ २ ॥
करावीच चिंता । नाहीं लागत तत्त्वता ॥ ३ ॥
तुका म्हणे भावे । शरण म्हणविता बरवे ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - तत्त्वता-खरे पाहता
अर्थ - सत्य हे सत्याचेच फळ देणारे आहे ते प्राप्त करून घेण्यासाठी काही वेगळया शक्तीची जरूरी
लागत नाही १ देवाच्या पायाचे चितन करावे व धीर धरून असावे, हाच एक धीराचा उपाय आहे २ खरे पाहता
मग आपणांस कोणत्याही प्रकारची चिता करावी लागत नाही ३ तुकाराम महाराज म्हणतात, मनोभावे आम्ही
देवासच शरण आहोत, असे म्हणणे फारच चांगले आहे ४
१२१४ साधक जाले कळौ । गुहगुडीची¹ लाव नळी ॥ १ ॥
पचीं पडे² मद्यपान । भागभुर्की हे साधन ॥ २ ॥
अभेदाचे पाठातर । अति विषयीं पडिभर ॥ ३ ॥
चेल्याचा सुकाळ । पिंड दड भगपाळ³ ॥ ४ ॥
सेवा मानधन । बरे इच्छेने सपन्न ॥ ५ ॥
सोगाच्या नरकाडी । तुका जोडोनिया झाडी ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा - कळौ-कलियुगात, पची-पचनी, पडिभर-प्रेमाचे वैपुल्य, भगपाळ-विपपासवन, नर-
काडी-नरखाला जाणारे
अर्थ - या कलियुगात खोटा परमाथ साधणारे पुश्कळ झाले आहेत परतु त्यांच्या तोंडात सतत गुह-
गुडीची नळी असते १ त्याना मद्याचे पान चागलेच पचनी पडलेले असते घोटा, भांग याच्या सेवनाचीही गोडी
त्याना विशेष प्रकारची असत २ अभेदाच्या तत्त्वाचे, ईश्वर व जीव यांच्या ऐक्याच्या वचनाचे त्यांचे पाठांतर असते,
१ गुदगुडीची, २ पडिल, ३ भगपाळ