सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 576, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ें५३० सा. तु. म. गाथा
वृत्ती असते तेवढीच येथे ध्यानात घेणे अगत्याचे आहे सर्व चित्त श्रीकृष्णास अर्पण करून लौकिक संसार करणे हे यातील
मर्म आहे, पण हे चित्त कसे अर्पण करायचे ? तर स्वतः जवळ काहीही न ठेविता गोकुळच्या गौळणींना श्रीकृष्णाची
प्रचीती त्यांच्या हृदयातच होत असे त्यांनी आपल्या पतींशीं वरवर वैर केल्याचे अथवा सदाचार सोडल्याचे दिसत
असले तरी, त्यांच्या या समर्पणाची भाषा केवळ तुलनेसाठी आहे हे ध्यानात हवे
वामनावताराच्या वेळी बलिराजाने सर्वस्वाचे दान तीन पावलांच्या रूपात मान्य करून शेवटी विष्णूच्या
हातावर उदक सोडण्याचा प्रसंग आला तेव्हा शुक्रांने आपल्या राजाचा संकल्प सिद्धीस जाऊ नये म्हणून सूक्ष्म रूप
घेतले व तो झारीच्या तोंडाशी जाऊन बसला झारीच्या तोटीमधून पाणी येईना असे पाहून बळीने दर्भाच्या काडीने
डोसून शुक्राचा एक डोळा फोडला भगवंताच्या प्राप्तीसाठी सर्वस्वाचे त्याला दान करण्याच्या आपल्या कृतीसाठी
बळीने शुक्राचार्यास देखील दूर केले अशी कथा पुराणातून आहे तुकाराम महाराजांनी 'बळीनें आंधळा शुक्र केला'
असा मोठा समर्पक उपयोग या अभंगात केला आहे
१२०९ अरे गिळिले हो संसारे । कांहीं तरि राखा खरे ।
दिला करुणाकरे । मनुष्यदेह सत्संग' ॥ १ ॥
येथें न घालीं न घालीं आड । संचितसा शब्द नाड ।
उठाउठीं गोड । बीजें बीज वाढवा ॥ २ ॥
केलें तें क्रियमाण । जाले तें संचित म्हण ।
प्रारब्ध जाण । उर्वरित उरले ते ॥ ३ ॥
चित्त खोटें चालीवरि । रोग भोगाचे अंतरीं ।
रसने अनावरी । तुका म्हणे दुग वाहे ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - नाड- अडचण प्रतिबंध
अर्थ - अहो लोकोहो, तुम्हाला या संसाराने गिळून टाकिले आहे यासाठी काही तरी सत्याची चाड ठेवा ना
त्या करुणाकर भगवंताने तुम्हास हा मनुष्य देह व हा सत्संग दिलेला आहे त्याची थोडी तरी आठवण ठेवा १ येथे
संचिताचा किंवा प्रारब्धाचा शब्द आड घालून, आमच्या प्रारब्धात हरिभजन नाही, असे समजून उगाच व्यर्थ आयुष्य
घालवू नका हरिनामाच्या योगाने बीज वाढवून या जन्माचे सार्थक करा २ आजपर्यंत जे कर्म तुमच्याकडून
घडले गेले, ते क्रियमाण, जे पूर्वी होऊन गेले, ते संचित व आता भोगण्यासाठी जे उरले आहे ते, प्रारब्ध जाणावे ३
कारण ध्यानात असू द्या की चित्त नेहमीच खोट्या चालीने चालत असते, रोग आपल्याच भोगामुळे निर्माण होत
असतात जिह्वेची चटक अनिवार झाली की मग दुर्गंध वाहात राहते ४
१२१० अग्न तापलिया कायाचि होमे । तापत्रयें सतप्त होती ।
संचित क्रियमाण प्रारब्ध तेथें । न चुके संसारस्थिति ।
राहाटघटिका जैसी फिरताचि राहिली । भरली जाती एके रितीं ।
साधीं हा प्रपंच पचाय अग्न । तेणे पावसील निजशांती रे ॥ १ ॥
नारायणनाम नारायणनाम । नित्य करीं काम जिव्हामुखें ।
जन्मजराव्याधि पापपुण्य तेथें । नासती सकळ ही दुखें ॥ २ ॥
शीत उष्ण वन सेवितां कपाट । आसनसमाधी साधीं ।
तप तीर्थ दान व्रत आचरण । यज्ञ नाना मन बुद्धी ।
१ सत्संग