सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 574, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंप्राप्तीसाठी करावीत असे कुणी बोलूसुद्धा नये ३ तुकाराम महाराज म्हणतात, ज्याचे आईबाप शुद्ध आहेत, तोच
माझ्या या वचनापासून सुखी होईल ४
विवरण - वारकरी पंथात इतर साधनांपेक्षा व्यार्त्तीर्तन, भजन व प्रभूचे सतत नामस्मरण याचंच महत्त्व
आहे श्रीहरीचे नाम हे एक महत्त्वाचे साधन सर्वच साधुसंतानी सांगितले आहे या नामाची महती ज्ञानेश्वरनाम-
देवापासून तुकारामबुवापर्यंत सर्व संतानी एकमुखाने गायिली आहे ' नाम हैं मगळ अच्युताचे ', ' नित्यनाम याचे
तोचि एक धन्य ' ' नामाचेनि बळें तरिजे संसार ' इत्यादी ओळींतून निवृत्तीनाथानाही नामाचेच माहात्म्य सांगितले
आहे ' सकाळ मंगळनिधी । श्रीविठ्ठलाचे नाम आधी ' या भाषेत श्रीज्ञानदेवानी या नामाचा गौरव केलेला आहे
' सार सार सार विठोबा नाम तुझें सार ' असे दुसऱ्या एका अभंगात त्यानी म्हटल आहे नामदेव महाराज हे तर
नामाचेच देव त्याच्या शेकडो अभंगातून नामाचे माहात्म्य परोपरीने वर्णन केल आहे ' नाम हे अमृत भक्तांसी
लाधले', ' नाम तेंवि रूप रूप तैंचि नाम ', ' साधनात सोपें नाम हे केवळ । यावीणसकळ सीण वाया ', ' नाम
फुकाचे घोषट । नाम घेता न लगे कष्ट ' अशा अनेक वचनातून नामदेवानी नामाचे महत्त्व सांगितल आहे एकनाथ-
तुकाराम यानीही याच नामाच्या साधनाचा प्रसार केला आहे
१२०७ सुखें होतो कोठें घेतली सुती । बाधविला गळा आपुले हातीं ॥ १ ॥
काय करूं बहु गुंतलो आता । नये सरता मागें पुढें ॥ २ ॥
होते गाठी ते सरले येता । आणीक माथा ऋण जाले ॥ ३ ॥
सोकरिलियाविण गमाविले पिक । राडापोरे भिके लावियेलों ॥ ४ ॥
बहुतांचीं बहु घेतलीं घरें । न पडे पुरे कांहीं केल्या ॥ ५ ॥
तुका म्हणे काहीं न धरावी आस । जावे हे सर्वस्व टाकोनिया ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा - सुती-लाभ, सोकरिलियाविण-राखल्याशिवाय
अर्थ - खरे म्हणजे मी अव्यक्तातच सुखी होतो पण कशी या प्रपंचाची व देहादी वृत्तींची गाठ पडली व
लोभ जडला, कुणास माहीत, मी त्यात गुंतूनच राहिलो आपल्याच हातानी मी माझा गळा या लौकिक व्यवहारात
गुंतवून टाकला १ आता काय करू ? मो फारच गुंतत चाललो हो मला आता मागेपुढे सरकण्यादीही काही सोय
राहिलेली नाही २ माझ्याजवळ काही थोडी बहुत पुण्याई होती, पण ती येथे जन्म पावताच संपली आणि या
प्रपंचाचे भले मोठे ऋण मात्र माझ्या डोक्यावर झाले ३ या प्रपंचरूपी अथवा देहरूपी शेताची राखण न केल्यामुळे
मी सर्वच पीक गमावले व त्यामुळे राडापोरांना भिकेस लावले ४ मी पुष्कळाची घरे व्यर्थ खटपट करून घेतली,
पण ती हाय काही मला पुरी पडेना ५ तुकाराम महाराज म्हणतात, आता मात्र कशाचीच आशा न धरिता हे सर्व
येथेच सोडून कुठे तरी निघून जावे असे वाटते ६
१२०८ न मनाये तैसे गुरूचे वचन । जेणें नारायण अंतरे तें ।
आड आला म्हून फोडियेला डोळा । वळिनें आंधळा शुक केला ॥ १ ॥
करो देव तरी काय नव्हे एक । का तुम्ही पृथक सिणा वाया ॥ २ ॥
उल्लंघूनिया भ्रताराची आज्ञा । अन्न ऋषिपत्न्या घेउनि गेल्या ॥
अवघेचि त्याचे देये केले वाज । धर्म आणि लाज राखियेली ॥ ३ ॥
पितियासी पुत्रें केला वैराकार । प्रल्हादें असुर मारविला ॥
बहुत विघ्नें केलीं तया आड । परि नाहीं वैवाड सांडियेला ॥ ४ ॥