सामग्री पर जाएँ
सर्वकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 567, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 567

सार्थ तुकारामगाथा ५२१
शब्दार्थ व टीपा :- अभागी-करंटा, क्वडि-कवडी.
अर्थ:- हे करंट्या, तू वेळोवेळीं का मरत आहेस ? तुझ्या वाट्याला पुष्कळ मरणांची संख्या आली आहे. १
या मनुष्य देहाने केले तर काय होणार नाही ? श्रीहरीच्या भक्तिभजनाने तो वैकुंठास जाऊ शकतो. २ रामनामाचे
चिंतन करण्याला एक कवडीसुद्धा किंमत द्यावी लागणार नाही; त्यापासून या सर्व व्यथेतून सुटका होते. ३
तुकाराम महाराज म्हणतात, रामाच्या ठिकाणी मन अडवून ठेव; व त्या रसासच जिह्वेने नित्य चाख. ४
११७२ हम उदास तीन्हके सुनाहो लोकां । रावणमार विभीषण दिई लंका ॥ १ ॥
गोवरधन नखपर गोकुल राखा । वर्सन लागा जय मेंहूं फत्तरका ॥ २ ॥
वैकुंठनायक काल कंसासुरका । दैत धुवाय सब मंगाय गोपिका ॥ ३ ॥
स्तंभ फोड पेट चीरीया कश्यपका । प्रल्हाद के लिये कहे भाई तुकयाका ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- तीन्हके-त्या, काल-काळ, यम, वर्सन-पाऊस पडू लागला.
अर्थ:- रावणाला मारून विभीषणाला ज्याने लंका दिली, त्या रामाचा मी दास आहे, असे सर्व लोकांना
सांगतो. १ ज्या वेळेस इंद्राने शिळाधारांनी पर्जन्यवृष्टी केली, त्या वेळेस गोवर्धन पर्वत याने उचलून नखावर
धरला व गोकुळाचे रक्षण केले. २ वैकुंठाचा स्वामी हा कंसासुराचा काळ असून त्याचे सर्व दैत्य सैन्य ज्याने
मारून टाकले, त्याला सर्व गोपिकांनी मागितले. ३ तुकारामप्रभू म्हणतात, प्रल्हादाकरता नरसिंहरूप धारण करून तो
खांब फोडून प्रकट झाला; व त्याने हिरण्यकशिपूचे पोट फाडले. ४
साख्या ३०
११७३ तुफा वस्तर विचारा क्या करे । अंतर भगवान होप ।
भीतर मैला केंच मिटे रे । मरे उपर धोय ॥ १ ॥
शब्दार्थ व टीपा :- वस्तर-वस्त्र, भीतर-आत
अर्थ :- तुकाराम महाराज म्हणतात, जर अंतःकरण शुद्ध नसेल, तर बाह्य भगवे वस्त्र बिचारे काय करील?
वरच्या बाजूने मरेतोपर्यंत धुतले तरी अंतःकरणातील मळ नाहीसा कसा होईल ? १
११७४ रामराम कहे रे मन । औरसुं नहि काज ।
बहुत उतारे पार । आधे राख तुकाकी लाज ॥ १ ॥
शब्दार्थ व टीपा :- औरसुं-दुसऱ्याशी.
अर्थ :- तुकाराम महाराज म्हणतात, अरे मना, तू राम राम असे भजन कर. दुसऱ्याशी काही काम नाही.
या रामनामाने या संसारातून पुष्कळ लोक पार पडले. याकरिता यापुढे तू माझी लज्जा रक्षण कर. १
११७५ लोभीकें चित धन बैठै । कामीन चित काम ।
माताके चित पुत बैठै । तुकाके मन राम ॥ १ ॥
शब्दार्थ व टीपा :- कामीन-विषयी, पुत-पुत्र.
अर्थ :- तुकाराम महाराज म्हणतात, लोभ्याचे चित्त धनावर बसलेले असते किंवा विषयी मनुष्याच्या
चित्तामध्ये जसा काम असतो, मातेचे चित्त बालकाच्या ठिकाणी असते, तसे माझे मन रामाच्या ठिकाणी राहेल असे
काही तू कर. १
तु. गाथा....६६