सामग्री पर जाएँ
सर्वकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 56, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 56

३० सार्थ तुकारामगाथा
संताचे वचनीं मानितां विश्वास । काय तुमचे यास वेचे सांगा ॥ ४ ॥
खरें बोलता कोण लागतो सायास । काय वेचे यास ऐसे सांगा ॥ ५ ॥
तुका म्हणे देव जोडे याचसाठीं । आणीक ते आटी न लगे काही ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा - पराविया-दुसऱ्याची, वेचे-खर्च होन, आटी-खटाटोप
अर्थ - परस्त्री आईप्रमाणे मानल्यास तुमचे कधी द्रव्य खर्च होते काय ? १ दुसऱ्याची निंदा जर केली
नाही, दुसऱ्याच्या धनाची इच्छा केली नाही तर तुमचे काही खर्च होते काय ? २ बसल्याबसल्याच हरिनाम
घेतल्यास तुम्हास काही श्रम होतील का ? ३ साधुसंताच्या वचनावर विश्वास ठेवाल तर तुमचे काय नुकसान
होणार आहे ? ४ खरे बोलण्यास तुम्हास का येवढे कष्ट होतात ? त्यात काय तुम्हास खर्च येतो ? ५ तुकाराम
महाराज म्हणतात, वर सांगितलेल्या नियमांनी वागा, म्हणजे देव तुम्हास भेटेल, देव मिळवायला आणखी काही
खटाटोप करण्याची जरूरी नाही ६
६२ शुद्ध बीजा पोटीं । फळें रसाळ गोमटीं ॥ १ ॥
मुखीं अमृताची वाणी । देह येचावा १ कारणी ॥ २ ॥
सर्वांगीं निर्मळ । चित्त जैसे गंगाजळ ॥ ३ ॥
तुका म्हणे जातो । ताप दर्शने विश्रांती ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - गोमटो-सुरेख चागलो, ताप-त्रास
अर्थ - बीज शुद्ध असले म्हणजे त्यापासून फळेही रसदार, टवटवीत, व सुंदर निर्माण होतात, १ मुखातून
अमृताप्रमाणे, मधुर शब्द बाहेर पडत आहे आणि देह देवाच्याच कारणी लागला आहे २ त्या पुरुषाचे सर्व अंग
निर्मळ असून त्याचे चित्त गंगेप्रमाणे निर्मळ व पवित्र आहे ३ तुकाराम महाराज म्हणतात, अशा पुरुषाच्या दर्शनाने
सर्व त्रास दूर होतात व मनास एक प्रकारची विश्रांती मिळते ४
६३ चित्त समाधाने । तरी विष वाटे सोने ॥ १ ॥
बहु खोटा अतिशय । जाणा भले सांगों काय ॥ २ ॥
मनाच्या तळमळे । चंदने ही अग पोळे ॥ ३ ॥
तुका म्हणे दुजा । उपचार पीडा पूजा ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - अतिशय-अतिक्रम हावरटपणा
अर्थ - चित्त जर समाधानी नसेल तर सोन्यासारखे सुख विषाप्रमाणे वाटेल १ कशाचोही अतिशय हावं
खरी नव्हे हे तुम्हीच जाणावे मी काय तुम्हा भल्यारा सांगावे ? २ मन जर तळमळत असेल तर चंदनाने अंग थंड न
वाटतां भाजूनच निघेल ३ तुकाराम महाराज म्हणतात अशा मनास दुसऱ्या शीत उपचाराची सोय केली तरी
त्यास दुःख होते ४
६४ परिमळ म्हणून चोळू नये फूल। खाऊ नये मूल आवडते ॥ १ ॥
काय एक नव्हे धरितां अतरीं । कासवीचे परी वेळोवेळां ॥ २ ॥
मोतियाचे पाणी चाखू नये स्वाद । यत्र भेदुनि नाद पाहू नये ॥ ३ ॥
कर्मफळ म्हणुनी इच्छू नये काम । तुका म्हणे वर्म दावू लोका ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - परिमल-सुवास म्हण-म्हणून अतरीं-दूर अंतरावर यत्र-गोड वाद्य
अर्थ - फुलास मधुर सुगंध आहे म्हणून ते चोळून त्याचा एकदम सुगंध वाढण्याचा प्रयत्न करू नय मूल
आवडते झाले म्हणून ते खायचे का असते ? १ कासवीप्रमाणे दूर राहून पिलांचे पोषण करता येणार नाही काय ? २
१ देवान