सामग्री पर जाएँ
सर्वकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 453, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 453

सार्थ तुकारामगाथा ४१५
शब्दार्थ व टीपा :- धोजें-सरळपणाने, व्याली-बाळंत झालेल्या स्त्रीस, आराले-शांत.
अर्थ -असा पंथ चालावा की, जेथे आपणास पोचावयाचे आहे, तेथे तो घेऊन जाणारा असावा. या ठिकाणी
एकदा पोचल्यावर मग पूर्वीच्या ऐकलेल्या वाटा व्यर्थ होऊन जातात. १ मी पाया पडून सांगत आहे, ते गोष्ट सरळ
मनाने ऐका ना तेथे निश्चितपणे जाण्यासाठी भक्तिमार्गाचीच वाट निश्चित नाही का? २ जी बाळंतीण आहे,
तिला आपला अनुभव कुमारिकेस काही कधी सांगता येणार नाही. ३ तुकाराम महाराज म्हणतात, येथे मन शांत
पाहिजे, कारण बिंबाचे रूप स्वच्छ भासावयास हवे. ४
९०० काय नाहीं लवत झाडें । विसरे वेडें देहभाव ॥ १ ॥
जया न फळे उपदेश । धस ऐसा त्या नांवें ॥ २ ॥
काय नाहीं असत जड । दगड तो अबोलणा ॥ ३ ॥
तुका म्हणे कुचर दाणा । तैसा म्हणा १ डेंग हा ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- धस-अविचारी, मद बुद्धीचा, कुचर-न शिजणारा, डेंग-मूर्ख.
अर्थ - वारा आल्यावर झाडे काय लवत नाहीत ? वेडा मनुष्य आपल्या देहाचे हावभाव काय विसरत
नाही ? १ ज्याला चांगला उपदेश रुचत नाही, त्याला मद बुद्धीचा, अविचारी म्हणतात. २ दगड हा न बोलणारा जड
असत नाही काय ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, अन्नात न शिजणारा एखादा टणक दाणा असतो, त्याप्रमाणे
हा मूर्ख मनुष्य या भक्तिमार्गाच्या विचारात समरस न होणाराच असतो ४
९०१ देखीचा दिमाख शिकोनियां दावी । हिऱ्या ऐसी केवीं गारगोटी ॥ १ ॥
मर्यादा ते जाण अरे अभागिया । देवाच्या ऐसिया सफळ मूर्ति ॥ २ ॥
काय पडिलेंसी लटिक्याचे भरी । बोंधाळुनि थोरी परती सांडीं ॥ ३ ॥
तुका म्हणे पुढें दिसतसे घात । करितों फजित म्हणउनी ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- देखीचा-दुसऱ्याचे पाहून, थोरी--थोरवी.
अर्थ - दुसऱ्याचे पाहून काही दिमाख किंवा डौल दाखविला तरी तो काही खरा नव्हे. गारगोटचा कितीही
झाल्या तरी हिऱ्यासारख्या कशा होतील ? १ अरे, अभाग्या, तू नीट मर्यादा जाणून ऐस ना. सर्व भूतमात्र हे त्या
देवाच्या मूर्तीच आहेत, हे नीट समजून घे. २ उगाच खोट्या भरोस पडू नकोस व स्वतःच्या ठिकाणची थोरवी
थोडी दूर सारून ठेव. ३ तुकाराम महाराज म्हणतात, मला पुढे तुझा घात दिसत आहे. म्हणून मी तुला फजीत
करून पाहात आहे. ४
९०२ संसाराचा माथां भार । कांहीं पर न ठेवीं ॥ १ ॥
भक्तीची ते जाती ऐसी । सर्वस्वासा मुकावें ॥ २ ॥
भिक्षा आणि बेवसाय । कसा करितो गाढव ॥ ३ ॥
करुनि वस्ती बाजारीं । म्हणवी फास्या निस्पृही ॥ ४ ॥
प्रसादा आडुनि कवी । केलें तुप पाणी तेवीं २ ॥ ५ ॥
तुका म्हणे होईं शूर । किंवा निसुर मजूर ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा :- निसुर-निवळ.
अर्थ :- संसाराचे ओझे माथ्यावर असले की, मग पलीकडे काही उरतच नाही १ या भक्तीची जातच
अशी आहे की, तिच्यासाठी सर्वस्वात्या मुकावे लागते. २ वैराग्यासाठी भिक्षा मागायची असेल तर, तिची व
१ जाणा, २ जेवी.