सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 417, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंसार्थ तुकारामगाथा ३८१
शिवो नये तीं निळीं । वस्त्रे पांघरती काळीं ॥ ३ ॥
तुका म्हणे वृत्ति । सांडुनि गदा मागत जाती ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- दोम दोम-भिक्षेच्या वेळी फकीर लोक करतात तो उच्चार, गदा-भीक.
अर्थ - अशा रीतीने या कलियुगात सर्व धर्माचे चाटोळे झालेले असते ते या शाक्ताच्या अनाचारामुळे. १
रामनामासारखा सोपा उपाय सोडून ब्राह्मण लोकसुद्धा फकीराप्रमाणे 'दोम दोम' म्हणत फिरायला लागले आहेत. २
ज्या वस्त्रांना शिवूसुद्धा नये अशी काळी वस्त्रे पांघरून हे शाक्त फिरतात. ३ तुकाराम महाराज म्हणतात, हे सर्व
लोक आपापली उच्च रीत सोडून भीक मागायलाच हिंडतात. ४
७९४ अवघ्या पापें घडला एक । उपासक शक्तीचा ॥ १ ॥
त्याचा विटाळ नको अंगा । पांडुरंगा माझिया ॥ २ ॥
काम क्रोध मद्य अंगीं । रंगला रंगीं अवगुणी ॥ ३ ॥
करितां पाप न धरी शंका । म्हणे तुका कोणे ही ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा :- अवघ्या-सर्व, एक-देवीचा उपासक.
अर्थ:- हा अनाचाराने वागणारा देवीचा उपासक म्हणजे जगातील सर्व पापाचाच 'घडविलेला आहे असे
वाटते १ पांडुरंगा, माझ्या शरीरास त्याचा विटाळसुद्धा नको २ कारण त्याच्या अंगी काम व क्रोध पूर्णपणे
भरले असून मद्याच्या किंवा शाक्तच्या नादात तो रंगून गेलेला असतो. ३ कोणतेही पाप करताना याला कधीही
शंका वाटत नाही, असे तुकाराम महाराज म्हणतात. ४
७९५ वारितां बळें धरिता हातां । जुलुमें जाती नरकामयीं । १ ॥
रंडीदासाप्रति काहीं । उपदेश तो ही चालेना ॥ २ ॥
जन्म केला वाताहात । थोर घात येठायीं ॥ ३ ॥
तुका म्हणे पंढरीनाथा । तुझी कथा दूषीती ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - वारिता-निवारण करीत असताना
अर्थ - या देवीच्या अनाचारी उपासकास बळाने हाती धरून दूर करण्याचा प्रयत्न केला तरी पुन. ते
नरकात जाण्याचा प्रयत्न करतातच. १ रांडेच्या या दासास कसलाही उपदेश केला तरी तो रुचत नाही, त्याच्या
मनास या एका पापी मार्गाशिवाय दुसरे काही पटतच नाही. २ माणसाच्या जन्मास येऊन याचा घातच झाला.
फार मोठा अपाय याच्यामुळे घडत राहतो ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, पंढरीनाथा, तुझ्या कथेलासुद्धा
हे नीच लोक दूषणे देतात, नावे ठेवतात. ४
७९६ शाक्तांची शुकरी माय । विष्ठा खाय विदीची ॥ १ ॥
तिची त्या पडली' सवे । मागें धांवे म्हणोनि ॥ २ ॥
शाक्तांची गाढवी माय । भुंकत जाय बेसदारा ॥ ३ ॥
तुका म्हणे द्विदळोचे । बोलतां वाचे निंद्य ते ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - शुकरी-डुकरीण, विदीची-रस्त्यावरील
अर्थ :- वाम मार्गाने देवीची उपासना करणाऱ्या या शाक्तांची आई म्हणजे रस्त्यावरील विष्ठा खाणारी
डुकरीणच समजावी १ तिला त्याच घाण वस्तूची सवय असल्यामुळे तिच्याच मागे मागे ती असते २ गावच्या
वेशीपर्यंत भुंकत, ओरडत जाणारी गाढवी म्हणजेच या शाक्ताची आई असेच मानावे ३ तुकाराम महाराज म्हणतात,
हे लोक फार वाईट खालीचे आहेत त्याचे वाचेने वर्णन केले तरी वाणी विटाळून जाईल इतके ते नीच आहेत. ४
१ लागली.