सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 349, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंसार्थ तुकारामगाथा २१५
भावाने अलंकृत केली, कीर्तनाच्या प्रसंगी मला चांगली प्रीती जवून दिली. त्या संताच्या चरणावर हा तुकाराम
लोटांगण घेत आहे. ६
६३७ तुझिया पार नाहीं गुणां । माझी अल्प मति नारायणा ।
भवताराका जी सुजाणा । एक विज्ञापना पायांपाशीं ॥ १ ॥
काय जाणावें म्यां दीनें । तुझिये भक्तीचीं लक्षणें ।
धड तें तोंड धोऊं१ नेणें । परि चिंतने काळ सारों ॥ २ ॥
न लवीं आणीक कांहीं पिसें । माझिया मना वांयां जाय ऐसे ।
चालवीं आपुल्या प्रकाशें । हातीं सरिसे धरोनियां ॥ ३ ॥
तुज समर्पिली काया । जीवे भावें पंढरीराया ।
सांभाळीं समविषम डाया । करों छाया कृपेची ॥ ४ ॥
चतुर तरीं चतुरां राव । जागता तरीं जीवांचा जीव ।
न्यून तो कोण एक ठाव । आल्प भाव परि माझा । ५ ॥
होतें तें माझें भांडवल । पायापें निवेदिले बोल ।
आदरा ऐसे पाविजे मोल । तुका म्हणे साच फोल तूं जाणसी ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा :- पार-अंत, विज्ञापना-विनंती, डाया-प्रसग, आल्प-वांकडे, वेडेवाकडे, साच-खरे,
फोल-खोटे
अर्थ - नारायणा, तुमच्या गुणाना अत नाही माझी बुद्धी अतिशय अल्प असल्यामुळे मी त्याने वर्णनही
करू शकत नाही तुम्ही ससारसागर तारून नेणारे असून सुजाण आहात. तुमच्या पायाशी माझी एक विनति आहे. १
देवा, तुमच्या भक्तीची लक्षणे माझ्यासारख्या दीनाने काय जाणावीत ? मला खरे म्हणजे माझे तोंडसुद्धा धुता येत
नाही, इतका मी अज्ञानी आहे पण देवा, तुमच्या चिंतनात कसा तरी वेळ काढीत आहे. २ देवा, जे परिश्रम
वाया जातील व जे व्यर्थ होईल असे दुसरे कसलेही वेड मला लावू नका मला नीट हाताशी घरा व आपल्या
कृपेच्या प्रकाशात मला चालवा ३ पढरीराया, मी ही माझी काया तुलाच जीवेभावे समर्पण केली आहे जे काही
चागले वाईट प्रसग येतील त्यातून देवा, तू माझा साभाळ कर. तुमच्या कृपेच्या छायेत मला पूर्ण विश्राती मिळावी ४
देवा, तू इतका चतुर आहेस की सर्व चतुराचा राजा तू आणि ज्ञानो तर इतका आहेस की सर्व ज्ञानी जीवाचा
जीवच तू आहेस कुठलो म्हणून तुझ्यात कमतरता नाही पण देवा, माझा हा वेडावाकडा भाव तू पाहा. ५ देवा,
माझ्याजवळ भक्तिभावाचे जे काही भाडवल होते, ते सर्व मी आपल्या पायाशी अर्पण केले आहे सर्व हकीगत आपल्या
चरणाशी निवेदन केली आहे माझा जो जसा आदर असेल तसे मोल मला मिळेल तुकाराम महाराज म्हणतात,
यातील खरे खोटे तू जाणशीलच ६
६३८ का हो माझा मानियेला भार । ऐसा दिसतसे फार ।
अनंत पावलिलों उद्धार । नव्हेचि थार मज शेवटीं ॥ १ ॥
पाप बळिवंत गाढें । तुज ही राहो सकते पुढें ।
मागील कांहीं राहिलें ओढें । नवल कोडें२ देखियेले ॥ २ ॥
काय मानिती संतजन । तुमचे हीनत्ववचन ।
कीं वृध्द जाला नारायण । न चले पण आधील तो ॥ ३ ॥
१ धुऊ, २ कंवडें