सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 342, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ें३०८ सार्थ तुकारामगाथा
राहिलो धरुनि विश्वास । आधार नेटों तुझी कास ।
आणीक नेणें मी सायास । तुका म्हणे यास तुझें उचित ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा - रंक-गरीब, उपाव-उपाय, ठाव-आश्रय, नेटों-नेटाने, दृढ
अर्थ - देवा, आता तुला जे कळेल ते, जे बरे दिसेल ते तू कर तारणार असशील तर तार, मारणार
असशील तर मारतो जवळ घर पाहिजे असल्यास, अथवा दूरही कर मला या संसारात घाल अथवा घालू नकोस १
मी नेणतेपणाने तुला शरण आलो आहे मला भाव व भक्ती यांन्यातकी काहीच समजत नाही मी सर्व ज्ञानाच्या
बाबतीत मद बुद्धीचा असून मी गरिवाहून गरीब आहे २ माझे मन माझ्या हातात स्थिर नाही माझी इंद्रिये
बाह्य विषयाकडे धावतात, कितीही त्याना आवरले तरी ती आवरली जात नाहीत माझी सर्व युक्ती संपून गेली
आहे शाततेची व निवृत्तीची वृत्ती माझेजवळ उरलेली नाही ३ देवा, मी माझ्या मनातील हा सर्व भाव तुला
सागितला आहे तुझ्या पायावर मी हा जीव ठेविला आहे असे समज आता तुला जो पडेल तो उपाय तू कर तूच
माझे सर्व आश्रयस्थान आहेस ४ मी तुझाच विश्वास धरून राहिलो आहे मोठ्या दृढ वृत्तीने मी तुझीच कास
धरून उभा आहे, आधार घेतला आहे तुकाराम महाराज म्हणतात, देवा, मी आता आणखी काही प्रयत्न करण्याचे
जाणीत नाही तुला काय योग्य वाटेल ते तू माझे करावेस ५
६२७ देवा तू कृपाकरुणासिंधु । होसी मायबाप आमचा बंधु ।
जीवनसिद्धि साधनांसिंधु । तोडिसी भवबंधु काळपाश ॥ १ ॥
शरणागता वज्रपंजर । अभयदानी तू उदार ।
सकळा देवा तू अगोचर । होसी अविकार अविनाश ॥ २ ॥
भागली स्तुति करिता फार । तेथें मी काय तें गद्धार ।
जाणावया तुझा हा विचार । नको अंतर देऊ आता ॥ ३ ॥
नेणें भाव परि म्हणवों तुझा । नेणें भक्ति परि करितो पूजा ।
आपुल्या नामाचिया काजा । तुज केशीराजा लागे धावणें ॥ ४ ॥
तुझिया बळें पंढरीनाथा । जालो निर्भर तुटली व्यथा ।
घातला भार तुझिया माथा । न भीं सर्वथा तुका म्हणे ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा - कृपाकरणासिंधु-कृपेचा, करुणेचा सागर, वज्रपंजर-वज्राचा पिंजरा, अगोचर-
इंद्रियाना न समजणारा, गद्धार-मूर्ख, निर्भर-भाररहित
अर्थ - देवा, तू कृपेचा, करुणेचा सागरच आहेस तूच आमचा मायबाप झाला आहेस आमचा बंधूही
तूच आहेस आमच्या जीवनाची सिद्धी व साधनाचा सिंधू तूच एक आहेस हा संसारपाश तू तोडून टाक माझा १
शरणागताना अभय देण्यासाठी तू म्हणजे वद्याचा एक पिंजराच आहेस तू उदार असून अभय देणारा आहेस सर्व
देवांना तू न समजून येणारा आहेस तू विकाररहित व अविनाशी आहेस २ सर्व देव तुझी स्तुती करता करता थकून
गेले तेथ मी मूर्ख किती टिकणार ? पण मला तुझ्या स्वरूपाचा विचार समजावून घ्यायचा आहे तू आता मला
अंतर देऊ नकोस ३ तुझ्याविषयी मनात भाव नसला तरी मी तुझा दास म्हणवितो, तुझी भक्ती कशी करावी हे
मी जाणीत नसलो तरी हे देवा मी तुझीच पूजा करतो तेव्हा केशवा, तुझ्या पतितपावन नामासाठी तरी तुला
माझ्या रक्षणासाठी धावून यावे लागेल ४ पंढरीनाथा, तुझ्या बळामुळे मी भाररहित झालो असून माझ्या मनातील
सर्व दु खे संपली आहेत मी आता माझा सर्व भार तुझ्याच माथ्यावर ठेविला आहे तुकाराम महाराज म्हणतात, मी
आता कुणालाही व्यर्थ भिणार नाही ५