सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 340, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ें३०६ सार्थ तुकारामगाथा
तानभूक न साहावे वेळ । तो राखिती कितीएक काळ ।
पिंड पाळोनि कंसा सोवळ । तो तप्तभूमीं ज्वाळ लोळविती ॥ ६ ॥
म्हणउनी करा कांही सायास । व्हायेल तर व्हा रे उदास ।
करवेल तर करा नामघोष । सेवा भक्तिरस तुका म्हणे ॥ ७ ॥
शब्दार्थ व टीपा :- कुंभयातना-नरकाचे दुःख, कुडी-शरीर, वळसा-संकट, बंद-चोर, पिंड-शरीर,
सायास-उपाय, प्रयत्न
अर्थ - या संसारास तुम्ही लागलेले आहात, तर एक उपाय करा ना. आपल्या मुक्तीचा मार्ग हळूच साधा.
नाहीतर पुढे यमाच्या दंडाची शिक्षा फार भयानक असते. दुराचारी माणसा, हे सर्व ऐकून असा दचकतोस का ? १
शरीरातून प्राण बाहेर नेताना या यमास काही सुद्धा दया येणार नाही. ओढाळ जनावरास धान्य खाताना बरे
वाटते; पण पाठीवर दणका बसताच त्याची काय अवस्था होते ? चोरास पकडल्यावर मग त्याची काय गती
होते ? २ त्याचप्रमाणे तुमचीही अवस्था होईल काही दान दिल्याशिवाय हे स्थान मिळेल कसे ? या संसार पथा-
वरील संकट जर माहीत नसेल मी सांगतो ते नीट ऐका. एखाद्या चोरास धरून नेतात तसे यमदूत तुम्हांस धरून
नेतील. ३ पायात काही न घालता एक क्षणभरही तुम्हास चालवत नसे. त्याना मग हे यमदूत कांटेरी वाटेने
फरफटत ओढीत घेऊन जातील. लोखंडाच्या खांबास तापवून, लाल करून, त्यास तुम्हाला भेटवतील. ४ ज्याकडे
नुसते पाहिले तरी अंगास कापरे सुटते, अशा बेफाम नदीतून तुम्हांस चालवतील. जिचा काहीच ठाव लागला नाही
तिच्यात तुम्हांला ते बुडवतील व वर काठीने मारतील हे यमदूत. ५ एखाद्या वेळेस अन्नपाणी न मिळाले तर तुमचा
जीव कासावीस होतो, पण हे यमदूत तुम्हास कित्येक दिवस उपाशी ठेवतील. शरीराचे पोषण करून तो कसा सुस्व-
रूप ठेविला होता तुम्ही; पण हे यमदूत त्यास तापलेल्या अग्नीच्या ज्वालात लोळवतील. ६ म्हणून लोकहो,
काही तरी उपाय करा. या संसाराविषयी उदास व्हा. तुकाराम महाराज म्हणतात, मुख्य म्हणजे या देवाच्या
नामाचा घोष करा. या भक्तिरसाचे सेवन करा. ७
६२४ न बोलसी तें ही कळलें देवा । लाजसी आपुलिया नांवा ।
तुज मी नाहीं घालीत गोवा । बीड केशवा कासयाची ॥ १ ॥
उतरीं आपुला हा पार । मजशीं बोलोनि उत्तर ।
माझा तुज नव्हे अंगीकार । मग विचार करीन मी ॥ २ ॥
दात्या आणि मागत्यासी । धर्मनीति तरी बोलिली ऐसी ।
यथानशक्ति टाकेल तैसी । बाधी दोघांसी विन्मुखता ॥ ३ ॥
म्हणोनि करितों मी आस । तुझिया वचनाची वास ।
धीर हा करूनि सायास । न टळें नेगास आपुलिया ॥ ४ ॥
तुझें म्यां घेतल्या वांचून । न वजे येथूनि वचन ।
हाचि माझा नेम सत्य जाण । आहे नाही म्हण तुका म्हणे ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा :- गोवा-भीड, नकट, वास-वाट.
अर्थ :- देवा, तू माझ्याशी का बोलत नाहीस, हे मला आता समजले आहे. तुझे नाव पतितपावन, जगन्नाथ
असे असून तू मला पावन करीत नाहीस याची लाज तुझ्या मनात असल्याने तू गप्प राहिला आहेस आणि मीही
काही तुला संकटात टाकीत नाही. कशाचीही भीड घालीत नाही. १ तुझ्या मनावर याचा भार असेल तो उतरवून