सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 337, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंमज भाव प्रेम देईं कीर्तीं । गुण नाम वर्णावया स्तुती ।
विघ्ना सोडवूनि हार्तीं । विनंती माझी परिसावी हे ॥ ३ ॥
आणीक कांहीं नाहीं मागणें । सुखसंपत्तिराज्यचाड धन ।
साकडें न पडे तुज जेणें । दुजें भक्तीविण मायबापा ॥ ४ ॥
जोडोमिया कर पायीं ठेवों माथा । तुका विनवी पंढरिनाथा ।
रंगीं वोडवावी रंगकथा । पुरवी व्यथा¹ मायबापा ॥ ५ ॥
शब्दार्थ य टीपा :- परिसावी-ऐकावी, साकडें-मकट
अर्थ - देवा, तूच आमच्यासारख्या अनाथाचा नाथ आहेस आमचे दुःख, मोह, आमची चिंता, याचा नाश
तूच करतोस म्हणून देवा, तुला मी शरण आलो आहे. तेव्हा मायबापा, कृपावंत होऊन मला तार; माझे रक्षण
कर. १ संताची संगती व तुझ्या चरणाची सेवा एवढ्याच गोष्टी दे तू. जेणेकरून तुझा विसर होणार नाही, हाच
भाव माझ्या अंत:करणात दृढ व्हावा माझे एवढे मनोरथ देवा, तू पुरवावेस २ मला तुझ्याविषयी भावभक्ती वाटावी,
प्रेम वाटावे, तुझे नाम व तुझी कीर्ती वर्णन करून तुझी स्तुती करण्याची हौस मला आहे तेव्हा तू ती पुरवावीस व
माझी सर्व संकटे दूर करून ही विनंती तू ऐक ३ याशिवाय देवा, आणखी दुसरे मागणे काही नाही सुख, संपत्ती,
राज्य, धन इत्यादींची काहीही किंमत मला नाही. हे मला देण्याविषयी तुला कधीच सकट पडणार नाही मायबापा,
एक भक्ती मात्र तू द्यावीस ४ मी हात जोडून तुझ्या पायावर मस्तक ठेवीत आहे. तुकाराम तुला पंढरीनाथा,
विनवीत आहे की, माझ्या अंतःकरणाच्या भावभक्तीच्या रंगावर तुझ्या प्रीतीचा रंग चढावा. एवढीच देवा, माझी
तीव्र इच्छा आहे ५
६२१ सेदरीं² हैं देवी दैवतें । कोण तीं पुजी भुतेंकेतें ।
आपुल्या पोटा जीं रडतें । मागती शितें अवदान ॥ १ ॥
आपुले इच्छे आणिकां पीडो । काय तें देईल वराडी ।
कळी ही आली तयाची जोडी । अल्प रोकडी बुद्धि अधरा³ ॥ २ ॥
दासीचा ⁴पाहुनेरउखितें । धणी देईल आपुल्या हातें ।
करुणाभापणउचितें । हें तो रितें सतत शक्तिहीन ॥ ३ ॥
काय तें थिल्लरीचे पाणी । ओठ न भिजे न फिटे धणी ।
सीण तरों आदी आयसानीं । क्षोभे पुरश्चरणीं विले फळ ॥ ४ ॥
विलेपनें युजविती तोड । मार लोल⁵ वाहातो उदंड ।
करविती आपणादा दंड । ऐसियास भांड म्हणे देव तो ॥ ५ ॥
तैसा नव्हे नारायण । जगव्यापक जनार्दन ।
तुका म्हणे त्याचें करा चिंतन । यदूं चरण येती सकळें ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा - सेदरीं-शेंदूर फासून केलेली, हेंदरी-आवळ, घाणेरडी, अवदान-बळी, वराडी-वाऱ्याचे-
भूत, जोडो-प्राप्ती, अधरा-धैर्य नसलेली, पाहुनेर-पाहुणचार, उखीतें-दासीचे वेतन, थिल्लरीचे-डबक्यातील,
धणी-तृप्ती, भांड-भाडखोर
अर्थ :- दगदादिकांना भाव न धरिता शेंदूर फासून येडीवाकडी व घाणेरडी देवदैवते व भूतेखेते यांची
पूजा कशासाठी करावी ? आपल्या पोटासाठी एखाद्याच्या शिंताची भिक्षा मागणारी, बळी मागणारी ही दैवते
१ देवा मनोरथा, २ संदरी हेंदरी, दैवत ३ अधीरा, ४ पाहुणेर उषीत, ५ ळोळ