सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 301, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ें२६८ सार्थ तुकारामगाथा
५२५ भक्तप्रतिपाळे दीन वो वत्सले । विठ्ठले कृपाळे होसी माये ॥ १ ॥
पडिला विसर माझा काय गुणें । कपाळ हें उणें काय करूं ॥ २ ॥
तुका म्हणे माझें जाळुनि संचित । करीं वो उचित भेट देईं ॥ ३ ॥
शब्दार्थ व टीपा :- भक्तप्रतिपाळे-भक्ति करणाऱ्याचा सांभाळ करणारा, गुणें-कारणाने, कपाळ-नशीब
अर्थ :- विठ्ठल माऊली, तू दोनवत्सल व भक्तांवर कृपा करणारी कृपाळू माताच आहेस. १ कोणत्या
कारणाने माझा तुला विसर पडला गे माय ? माझेच नशीब खोटें त्याला काय करू ? मीच अवगुणी आहे असे मला
वाटते. २ तुकाराम महाराज म्हणतात, देवा माझे सर्व संचित कर्म जाळून, नाहीसे करून मला भेट देणे हेच तुम्हास
उचित नाही काय ? ३
५२६ तुजविण मज कोण वो सोयरें । आणीक दुसरें पांडुरंगे ॥ १ ॥
लागलीसे आस पाहा तुझें वास । रात्री वो दिवस लेखीं बोटों ॥ २ ॥
काम गोड मज न लगे हा धंदा । तुका म्हणे सदा हेंचि ध्यान ॥ ३ ॥
शब्दार्थ व टीपा :- वास-वाट, लेखी-मोजीत आहे
अर्थ :- पांडुरंगा, तुझ्याशिवाय मला कोण सोयरे आहेत रे ? दुसरे कुणीही मला आणखी तुझ्याशिवाय
आप्त नाहीत विठ्ठला १ मला तुझीच एक आशा लागली असून मी एकसारखी तुझी वाट पाहात आहे रात्र व
दिवस मी हाताच्या बोटावर मोजीत आहे. २ मला काही काम गोड लागत नाही, की धंदा सुचत नाही. तुकाराम
महाराज म्हणतात, मला देवा, एकसारखे तुझेच ध्यान लागलेले असते. ३
५२७ पहियंते आम्ही १तुजपाशीं मागावें । जीवींचें सांगावे हितगुज ॥ १ ॥
पाळसील लळे दीन वो वत्सले । विठ्ठले कृपाळे २जनतिये ॥ २ ॥
जीव भाव तुझ्या ठेवियेला पायीं । तूं चि सर्वा ठायीं एक आम्हां ॥ ३ ॥
दुजियाचा संग लागों नेदीं वारा । नाहीं जात घरा आणिकांच्या ॥ ४ ॥
सर्वसत्ता एकी आहे तुजपाशी । ठावें आहे देसी मागेन तें ॥ ५ ॥
म्हणउनि पुढें मांडियेली आळी । यिकोनियां चोळी डोळे तुका ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा :- पहियंते-आवडते, लळे-लाड, आळी-हट्ट, यिकोनिया-रडून
अर्थ :- देवा, आम्हास जे आवडते ते आम्ही तुझ्यापाशी मागू व आमच्या जीवात असणारी हितगुजाची
गोष्ट आम्ही तुला सांगू १ दीनावर दया करणाऱ्या वत्सल देवा, विठ्ठला, तू माझे हट्ट पुरविणार आहेस. तू वत्सल
अशी माऊलीच आहेस २ आम्ही आमचा सर्व जीवभाव देवा, तुझ्या पायांवर वाहिला आहे. तूच सर्व ठिकाणी
आम्हांस एकरूपाने दिसतोस. ३ आम्हांला विठ्ठला, दुसऱ्याच्या संगतीचा वाराही लागू देऊ नकोस. मी आता
दुसऱ्याच्या घरी जाणारसुद्धा नाही. ४ तुझ्या प्रीतीची सर्वसत्ता एकवटलेली असून मी जे मागेन ते तू देशील असा
विश्वास मला आहे ५ म्हणून तर देवा, मी तुझ्यापुढे हा हट्ट धरलेला आहे. मी रडूनरडून डोळे चोळीत आहे. ६
५२८ कोण पर्वकाळ पहाल तीथ । होते माझें चित्त कासावीस ॥ १ ॥
पाठवी भातुकें प्रेरीं ३झडकरी । नको राखौं उरी पांडुरंगा ॥ २ ॥
न धरावा कोप मजवरी कांहीं । अवगुणी अन्यायी म्हणोनियां ॥ ३ ॥
काय रडवीसी नेणतियां पोरां । जाणतियां थोरां याचिपरी ॥ ४ ॥
काय उभी कर ठेवुनियां कटीं । बुझावीं धाकुटीं लडिवाळें ॥ ५ ॥
तुका म्हणे आतां पदरासी पिळा । घालीन निराळा नव्हे मग ॥ ६ ॥
१ जयापें, २ होसी माये, ३ प्रेमें.