सामग्री पर जाएँ
सर्वकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 298, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 298

सार्थ तुकारामगाथा २६५
यमासही दरारा वाटू लागला आहे साधक, मुमुक्षु, प्रपंचिक कोणीही कोणत्याही पथातील असोत, नामस्मरणाचा
शिक्का त्याच्यावर या कलियुगात बसावयास हवा, अशी त्याची इच्छा आहे यासाठीच भक्तीचा डांगोरा पिटण्यासाठी
त सिद्ध झाले आहेत
यापूर्वी आम्ही ईश्वराच्या सान्निध्यात, वैकुंठीच होतो हे बुवाचे वचन त्याच्या एकंदर चरित्रक्रमास व
तत्त्वज्ञानास धरून आहे आपण प्राचीन ऋषीमुनी व साधुसंत याच्याच मार्गाने जात असून तीच परंपरा चालवीत
आहोत असा स्पष्ट निर्देश त्यांनी अनेक ठिकाणी केलेला आहे 'अंबरीष प्रल्हाद अंगद। उद्धव नामया नामाचा बोध ॥
हाचि भक्तीचा कळस । पिका आला ब्रह्मरस ।। सकल्प शतकोटी केलेसे। तुका म्हणे लाभले शेष ॥ झाला अवताराचा
कळस । पिका आला ब्रह्मरस' या ओळींतून आपण अंबरीष, प्रल्हाद, अंगद, उद्धव, नामदेव इत्यादींचेच वारसदार व
अवतार आहोत असाच भाव प्रगट झाला आहे दुसऱ्या एका अभंगात त्यांनी आम्ही परमेश्वराच जुनेच मित्र आहोत
असे सांगितले आहे 'आम्ही हरीचे सवंगडे । जुने ठावंचे वेडे वांगडे ।' आणखी एका अभंगात शुकाने समाधी लावली
तेव्हा आम्ही तेथे होतो असे तुकोबांनी म्हटले आहे (अभंग क्र २७७८) आपण देवाचा निरोप घेऊनच आले
आहात असे एका अभंगात (अभंग क्र ३४४) सांगितल्याचे आपण पाहिलेच आहे खऱ्याखोट्याचा निवाडा करून
मार्ग स्वच्छ करण्यासाठीच आपण आले आहात, असही त्यांनी एका अभंगात म्हटले आहे (अभंग क्र ६१८)
जन्मोजन्मी आपणास हेच काम कराव लागत असही त्यांनी एकदा स्पष्ट केले आहे 'मार्ग बहुता अन्नीं । हेंचि
करीत आम्ही' असे त्यांनी निर्भिडपणे सांगितले आहे (अभंग क्र २३००) 'धर्माचे पाळण । करणे पाखांड खंडण ।
हेंचि आम्हा करणे काम' असा आपल्या आयुष्याचा हेतु त्यांनी एका अभंगात (क्र २१३६) स्पष्ट केला आहे.
'धर्म रक्षणासाठों । करणे आटी आम्हासी ।' असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला आहे (अभंग क्र २६०)
या सर्व आत्मप्रचीतीच्या व निश्चयात्मक भागाच्या अभंगावरून तुकोबांचे कार्य हे एक लोकोत्तर असे ईश्वरी
काय हात असे मानाकयास हरकत नाही आपली वाणी 'नारायणीं मिश्रीत' आहे असेही त्यांनी एका अभंगात सांगितले
आहे (अभंग क्र १३०९) 'मज विश्वंभर बोलवितो' हा त्याचा आत्मविश्वास प्रसिद्ध आहे (अभंग क्र १००७)
याच अभंगात, 'वदवी गोविंद हेंचि यंदे' म्हणून त्यांनी स्वत च्या वाणीचे दिव्यत्व सूचित केले आहे 'संताचीं उच्छिष्टें
बोलतों उत्तरें' असा त्याचा नम्र भाव आत्मविश्वासामारहित प्रगट झाला आहे (अभंग क्र ९१९) 'बोलविती देव मज,'
परि त्या विश्वभरें बोलाविले अशा ओळींतून तुकोबांच्या अभंगवाणीचा प्रासादिक गुण सहज ध्यानात येणारा आहे
आणि याच प्रासादिक वाणीमुळे व ईश्वरी बळामुळे तुकोबांना 'पिटू भक्तीचा डांगोरा । कळिकाळासी दरारा ।'
असा आत्मसामर्थ्याचा घोष करता आला जे आपण दुसऱ्यांना मागणार, साधकांना वा प्रपचिकांना मार्गदर्शनासाठी
मागणार, त्याची प्रचीती स्वतःस आल्याखेरीज त्यास तेज पडत नाही, लोकाच्या मनावरही त्याचा परिणाम होत
नाही परंतु तुकोबांना ही सर्व अनुकूलता प्राप्त झाली सद्गुरुनाथाची कृपा झाली नामदेवानी कवित्वाची जागृती
दिली, ईश्वरसाक्षात्कार झाला, आणि मग तुकोबांच्या वाणीम आत्मप्रचीतीचे, ईश्वरी कृपेच तेज चढले 'तीक्ष्ण
उत्तरें । हातीं घेऊनि बाण फिरे' अस सामथ्य मग त्याच्या अंगी प्रकट झाले 'गर्जूं हरिचे पोवाडे । मेळवूनि वैष्णव
बागडे । घालू पायदळीं । कळीकाळ त्या बळें ।' यासारख्या शब्दांना धार आली ती तुकाराच्या सामथ्यमपन व
आत्मविश्वाससम्पन्न देवा बळामुळे, 'सूर्याच्या परी । तुका लोकीं प्रौढा करी' हे सामथ्यवान बोर साध्या माणसाचे
कसे असतील? खालील अभंगही असाच स्वाच्या सामर्थ्यवान वाणीचा निदर्शक असा आहे
५२१ बळियाचे अंकित । आम्ही जालो वळिवंत ॥ १ ॥
लाता हाणोनि संसारा । केला षडूर्मिंचा मारा ॥ २ ॥
जन धन तन । केले तृणाही समान ॥ ३ ॥
तुका म्हणे आता । आम्ही मुक्तीचिया माया ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - षडूर्मिंचा-काम, क्रोध, मोह, लोभ, मद, आणि मत्सर या सहा मानसिक वृत्तींचा,
अथवा शोक, मोह, जरा, मृत्यू, क्षुधा, व पिपासा या सहा उर्मी संसारसागराच्या लहरीप्रमाणे मान या आहेत
तु गाथा ३४