सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 143, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंसार्थ तुकारामगाथा ११५
म्हणतात, त्याप्रमाणे माझे झाले आहे. एखादे भयंकर स्वप्न पडल्यानंतर जागे झाल्यावर जसे त्याचे काहीच उरत
नाही त्याप्रमाणे त्या पांडुरंगाच्या संगतीने माझी भीती वृथा ठरलेली आहे. ४
. २३२ तुजसवें येतों हरी । आम्हां लाज नाहीं तरी ।
. उचलिला गिरी । चांग तईं वांचलों ॥ १ ॥
मोडा आतां खेळ । गाई गेल्या जाला वेळ ।
फांकल्या ओढाळ । नाहीं तोचि आवरा ॥ २ ॥
चांग देवें यमुनेसी वांचलों बुडतां ।
निलाजिरों आम्ही नाहीं भय धाक या अनंता ॥ ३ ॥
खातो आगी माती । आतां पुरे हा सांगाती ।
भोंवतां भोंवेल । आम्हां वाटतें हें चित्तीं ॥ ४ ॥
तुका म्हणे उरी नाहीं तुजसवें ।
शाहाणिया १ दुरी छंद भोळियां सवें ॥ ५ ॥
. शब्दार्थ व टीपा - गिरी-गोवर्धन पर्वत, चांग-चांगले, सावधपणाने, फांकल्या-पसरल्या.
अर्थ:- श्रीहरी, आमच्या मनास काही लाजच नाही. आम्ही जणु कोडगेच आहोत. आम्ही पुनः पुनः तुझ्या
बरोबरच येणार. कारण आम्हास माहीत आहे की तूच इंद्राच्या अवकृपेच्या वेळी गोवर्धनपर्वत उचलल्यामुळे आम्ही
चांगले वाचलो आहोत. १ आता फार वेळ झाल्यामुळे खेळ मोडा. गाई चरायला जाऊन फार वेळ झाला. जोपर्यंत
या इंद्रियरूपी गाई ओढाळ होऊन चहू दिशास पसरल्या नाहीत तो पर्यंतच त्याना आवरिले पाहिजे. २ या देवाच्या
कृपेने व आमच्या चांगल्या देवाने आम्ही यमुनेत बुडत असताना वाचलो त्यामुळे या हरीचे उपकार आमच्यावर
फार आहेत. आम्ही निलाजरेच आहोत या अनंताला मात्र कसलाही धाक किंवा कसलीही भीती नाही, ३ तो अग्नी,
माती काहीही खातो. असल्या या देवाची संगत आता नकोशी वाटते. कारण याची अशी ही विपरीत वागण्याची
संगत आम्हास चांगलीच भोवेल असे आमच्या मनात वाटते. ४ तुकाराम महाराज म्हणतात, श्रीकृष्ण, तुझ्याबरोबर
आम्ही कसे पुरे पडणार? तुझ्यासारख्या शहाण्यापासून चार पावले दूरच असावे व भोळयाभाबड्यांची संगत
धरावी. ५
विवरण:- श्रीकृष्णाच्या बालपणातील अद्भुत क्रीडा पाहून त्याच्या संगतीचा मनात धाक निर्माण झाल्याची
एक विचित्र पण गमतीची तक्रार तुकारामबुवांनी गोपाळांची म्हणून या अभंगात मांडलेली आहे. या श्रीकृष्णाचे
उपकार फार मोठे, याच्याच कृपेने सर्व संकटे टळली, शेवटी निलाजरे होऊन याचीच संगत धरणे प्राप्त आहे हे
माहीत असूनही याच्या अचाट कृत्याची धास्ती मनात असल्यामुळे एक प्रकारे याची संगत नको तरी आपणास अनिष्ट
रूपाने भोगावी लागेल अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे
तुकारामबुवांनी येथे गोवर्धन उचलून श्रीकृष्णाने गोकुळातील लोकांचे रक्षण केल्याचा उल्लेख केला आहे.
ही कथा भागवतादी पुराणातून सविस्तर येते. दर वर्षी पावसासाठी लोक इंद्रास तृप्त करण्यासाठी इंद्रयाग करीत
असत. इंद्राचा हा अभिमान दूर करण्यासाठी इंद्राऐवजी गोवर्धन पर्वताची पूजा करण्यास श्रीकृष्णाने सर्वांना सांगि-
तले. गोकुळातील लोकांचा मुख्य व्यवसाय गोरक्षणाचा यासाठी सर्वात अधिक मदत गोवर्धन पर्वताची होते असा
त्याच्या बोलण्याचा अर्थ मग नदासहित सर्व गोपाळांनी गोवर्धनाचीच पूजा केली त्याला महानैवेद्य दाखविला
गाईंना कोवळे गवत घातले, गोवर्धन हाच मुख्य देव त्याचा झाला. या कृत्याचा इंद्रास फार मोठा राग आला. त्याने
सांवर्तक नावाच्या मेघांना बोलावून गोकुळात सर्वत्र वृष्टी करण्यास आज्ञा केली. गोकुळावर यानंतर भयंकर स्वरूपात
जलवृष्टी होऊ लागली. जिकडे तिकडे पाणीच पाणी होऊन गेले. आवह व प्रवह नावाच्या सोसाट्याच्या वाऱ्यानी
१ शाहाणे या भावे दुरी छंद भोळिया । किंवा शाहाणे या दुरी । छंद भोठिया भावे ।