सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 102, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ें७४ सार्थ तुकारामगाथा
म्हणती बरवें गोपाळ । म्हणती बरवें गोपाळ ।
वाहाती सकळ । मोहरी पांवे आनंदें ।
खडकीं सोडियेल्या मोटा । अवघा केला एकवटा ।
काला करुनिया वांटा । गडिया देतो हरि ॥ २ ॥
एकापुढें एक । घाली हात पसरी मुख ।
गोळा पांवे तया सुख । अधिकचि वाटे ।
म्हणती गोड जाले । म्हणती गोड जालें ।
आणिक देईं । नाहीं पोट धालें ॥ ३ ॥
हात नेतो मुखापासी । एर आशा तोड वासी ।
खाय आपण तयासी । दावी वांकुलिया ।
देउनिया मिठी । पळे लागतील पाठीं ।
धरूनि काढितील ओठीं । मुखामाजी घाली ॥ ४ ॥
म्हणती ठकडा रे कान्हा । लावी घांसा भरी राणा ।
दुम करितो शहाणा । पाठोपाठीं तयाच्या ।
अवघियांचें खाय । कवळ कृष्णा माझी माय ।
सुरवर म्हणती हाय हाय । सुखा अंतरलों ॥ ५ ॥
एक एका मारी । हुंगा पाठी तोंडावरी ।
गोळा न साहवे हरि । म्हणे पुरे आतां ।
येतो काकुलती । गोळा न साहवे श्रीपती ।
म्हणे खेळों आतां नीती । सांगों आदरिलें ॥ ६ ॥
आनंदाचे फेरी । माजी घालुनियां हरी ।
एक घालिती हुंबरी । वाती शिंगें पांवे ।
वांकडे बोबडे । लूडे मूडे एक लूडे ।
कृष्णा आवडती पुढें । बहु भाविक ते ॥ ७ ॥
करी कवतुक । त्यांचें देखोनियां मुख ।
हरी वाटतसे सुख । खदखदां हांसें ।
एक एकाचें उच्छिष्ट । खातां न मानिती वीट ।
केलीं लाजतां हीं धीट । आपुलिया संगें ॥ ८ ॥
नाहीं ज्याची गेली भुक । त्याचें पसरवितो मुख ।
अवघियां देतो सुख । सारिखेंच हरी ।
म्हणती भला भला हरी । तुझी संगती रे बरी ।
आतां चाळविसी तरी । न वजों आणिकां सवें ॥ ९ ॥
गाई विसरल्या चार । पक्षी श्वापदांचे भार ।
जालें यमुनेचें स्थिर । जळ वाहो ठेलें ।