सामग्री पर जाएँ
सर्वकोश
संग्रह पर लौटें

छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)

Life & History of Chhatrapati Shivaji Maharaj

के. ए. केळूसकर / शास्त्रीय अनुवाद द्वारा

DevanagariHindipublished127 पृष्ठ

नुतन सृष्टीचा जनक
केवळ ३०-३५ वर्षांच्या काळात स्वराज्याची स्थापना करून त्याचा चौफेर
विस्तार करण्याचे अलौकीक कार्य शिवाजी महाराजांनी केले. शेकडो वर्षे
पारतंत्र्याच्या मगरमिठीत सापडलेल्या जनतेला स्वातंत्र्याचा मंत्र दिला. अस्मिता
जागृत केली. स्वाभिमान शिकविला आणि नवा महाराष्ट्र उभा केला. केवळ
स्वतंत्र राज्य स्थापन करणे एवढेच शिवाजी महाराजांचे ध्येय नव्हते तर
राज्यातील सर्व सामान्य जनता सुखी झाली पाहिजे हे त्यांच्या धोरणाचे मुख्य
सूत्र होते. सामान्य जनतेला काडीचाही उपसर्ग पोहचू नये, शेतकऱ्यांची
दैन्यावस्था संपली पाहिजे, स्वराज्यातील व्यापार समृद्ध झाला पाहिजे, साधुसंतांना
निर्भयपणे उपासना करता आली पाहिजे, सर्व जातींना संरक्षण मिळाले पाहिजे
आणि स्त्रियांचा सन्मान राखला गेला पाहिजे असे कितीतरी पैलू शिवाजी
महाराजांच्या धोरणामध्ये होते. विशेष म्हणजे अविश्रांत परिश्रम घेऊन आपले
ध्येय धोरण सिद्धिस नेण्यासाठी शिवाजी महाराजांनी आपले सर्व आयुष्य वेचले
आणि म्हणूनच शिवाजी महाराज हे युगपुरूष होते असे म्हणणे सार्थ ठरते.
महाराजांच्या या कार्यामुळे त्या काळातील जनता हे अपूर्व आणि नवे वैभव
स्वराज्याच्या रूपात पहात होती. म्हणूनच अमात्याने म्हटले त्याप्रमाणे 'महाराजांनी
नूतन सृष्टीच निर्माण केली.'
समारोप
“शिवाजी महाराजांनी शासनात शिस्तबद्धता निर्माण केली, न्यायदानात
निःस्पृहता दर्शविली, गैरकारभार करणाऱ्या अधिकाऱ्यांना मुलाहिजा न ठेवता
समज दिली, पश्चात्तापदग्ध होऊन परतलेल्या वतनदारांना अभयदान दिले, सर्व
धर्मांना समान लेखले, साधुसंतांचा यथोचित आदर केला, परंतु त्याहीपेक्षा
महत्त्वाची गोष्ट आढळते, ती म्हणजे रयतेची काळजी. रयतेला लेकरांप्रमाणे
मानणारा हा राजा केवळ महान युगपुरूष नव्हता तर मानवतेचे उत्कट तत्त्वज्ञान
सांगणाऱ्या व आचरणाऱ्या महात्म्याप्रमाणे तो वंदनीय थोर पुरूष होता.”
❑❑❑
१२० छत्रपती शिवाजी महाराज

नाव : प्रल्हाद नरहर देशपांडे
जन्मस्थळ : पंढरपूर (जि. सोलापूर)
जन्मतारीख : १७ सप्टेंबर १९३६
शिक्षण : एम्.ए.पीएच.डी.
अध्यापन काळ : १९६९-१९९६, विद्यावर्धिनी महाविद्यालय, धुळे
पीएच.डी. : पाच विद्यार्थी पीएच.डी. उत्तीर्ण
मार्गदर्शक
माजी अध्यक्ष : अखिल महाराष्ट्र इतिहास परिषद
व संस्थापक सदस्य
अध्यक्ष व : खानदेश इतिहास परिषद, भारतीय विद्या प्रबोधिनी
संस्थापक
अध्यक्ष : अ. म. इतिहास परिषदेचे यवतमाळ अधिवेशन,
१९९९
समिती सदस्य : पुणे विद्यापीठ, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, यशवंतराव
(भूतपूर्व) चव्हाण मुक्त विद्यापीठ, पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ,
महाराष्ट्र राज्य तंजावर पेपर्स कमिटी इत्यादी
मुख्य चिटणीस : इतिहासाचार्य वि. का. राजवाडे संशोधन मंडळ, धुळे
इतिहास विषयक : १४
ग्रंथ
महत्त्वाचे ग्रंथ : (१) शिवाजी महाराजांची पत्रे
(२) महाराष्ट्र संस्कृती
(३) मराठ्यांचा उदय आणि उत्कर्ष
कथासंग्रह : २
अनेक शोधनिबंध, ललित साहित्य प्रकाशित.
संपादक : 'संशोधक' त्रैमासिक (२२ वर्षांपासून संपादन)
या त्रैमासिकाला महाराष्ट्र फाउण्डेशन पुरस्कार मिळाला.
'राजगड' आणि 'रायगड' ही दोन पुस्तके महाराष्ट्र
शासनाच्या पुरातत्व विभागाकडून प्रकाशित.
RAJA BADSAL