सामग्री पर जाएँ
सर्वकोश
छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)

छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)

Life & History of Chhatrapati Shivaji Maharaj

के. ए. केळूसकर / शास्त्रीय अनुवाद द्वारा

DevanagariHindipublished127 पृष्ठ

पृष्ठ 98, कुल 127 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 98

आदिलशहा, कुतुबशहा आणि मुघल या सत्ताधिशांशी सलोख्याचे संबंध ठेवले.
त्यांच्याकडून परवाने मिळविले आणि वेळोवेळी त्यांना नजराणे दिले. भारतातील
राजकीय घडामोडींमध्ये ते जरी भाग घेत नव्हते तरी जागरूक आणि सावध
राहाण्याची काळजी घेत होते. शिवाजीने जेव्हा स्वराज्याची उभारणी केली आणि
राज्याचा विस्तार सुरू केला तेव्हा ते पाश्चात्य वखारवाले सावध झाले.
शिवाजीकडून आपल्या वखारींना उपद्रव पोहचू नये म्हणून कधी नरमाईचे,
कधी चढाईचे तर कधी सामोपचाराचे धोरण स्वीकारू लागले. विशेषतः शिवाजी
महाराजांनी सुरतेवर हल्ला केल्यानंतर पाश्चात्य वखारवाल्यांना अधिक काळजी
वाटू लागली. डचांनी शिवाजीशी सलोख्याचे संबंध जोडले. इंग्रजांनी आपले
व्यापारी केंद्र सुरतहून मुंबईला हलविले. शिवाजीची कृपादृष्टी आपल्याला
लाभावी हा त्यामागे इंग्रजांचा हेतू होता. दक्षिण स्वारीच्या वेळी फ्रेंचांचेही
शिवाजीबरोबर संबंध आले. थोडक्यात स्वराज्याचा विस्तार करतांना मुघल
सत्ताधिश, शाही राज्यकर्ते, पोर्तुगीज, सिद्दी आणि पाश्चात्य वखारवाले या
सर्वांच्याच राजकारणाविषयी शिवाजी महाराजांना सावध रहावे लागले. त्यापैकी
सिद्दी हे अतिशय आक्रमक व घुसखोर असल्यामुळे शिवाजी महाराजांना
त्यांच्याशी मोठ्या हिकमतीने लढावे लागले.
सिद्दींशी पहिला संघर्ष
सिद्दी हे मुळचे आफ्रिकेतील ॲबिसिनिया या प्रांतातील होते. ते धर्माने
मुसलमान असून दर्यावर्दी जीवन जगत होते. ॲबिसिनियन या शब्दावरूनच
सिद्दी असे म्हटले जाऊ लागले. १५ व्या शतकात ते भारतामध्ये आले आणि
निजामशाहीच्या राजवटीत दंडाराजपुरी या ठिकाणी सिद्दींनी आपले केंद्र
प्रस्थापित केले. शहाजहानने निजामशाही नष्ट केल्यानंतर दंडाराजपुरीच्या सिद्दींनी
स्वतंत्रपणे वागण्यास सुरुवात केली. सिद्दींचे आरमारी सामर्थ्य जबरदस्त
असल्यामुळे प्रथम आदिलशहाने नंतर मुघलांनीही आरमारप्रमुख म्हणून सिद्दींना
मान्यता दिली. दंडाराजपुरीजवळ असलेला जंजिऱ्याचा किल्ला सिद्दींनी राजधानीसाठी
निवडला.
१६५९ मध्ये शिवाजीने अफझलखानाचा वध केला. तेव्हा खानाची जहाजे
ताब्यात घेण्यासाठी शिवाजीची माणसे समुद्रापर्यंत पोहचली. कोकणामध्ये
शिवाजीचा राज्यविस्तार होईल याची चिंता सिद्दींना वाटू लागली. त्या सुमारास
सिद्दी फतेखान हा जंजिऱ्याचा प्रमुख होता. त्याने शिवाजीच्या प्रदेशावर हल्ला
करण्याची योजना आखली होती. परंतु खानाच्या वधानंतर जी धामधूम झाली
९२ छत्रपती शिवाजी महाराज