सामग्री पर जाएँ
सर्वकोश
छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)

छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)

Life & History of Chhatrapati Shivaji Maharaj

के. ए. केळूसकर / शास्त्रीय अनुवाद द्वारा

DevanagariHindipublished127 पृष्ठ

पृष्ठ 52, कुल 127 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 52

योजना जयसिंगापुढे मांडली. जयसिंगाने, मान्यता दिल्यावर शिवाजीने पन्हाळ्यावर
हल्ला केला पण त्याला यश आले नाही. बहुधा याचवेळी नेताजी पालकर
आणि शिवाजी यांच्यामध्ये अंतर निर्माण झाले. नेताजी पालकर आदिलशहाकडे
निघून गेला परंतु मिर्झाराजे जयसिंगाने मोठे आमिष दाखवून नेताजीला
आपल्याकडे ओढून घेतले आणि त्याला कैद करून औरंगजेबाकडे निघून गेला
परंतु मिर्झाराजे जयसिंगाने मोठे आमिष दाखवून नेताजीला आपल्याकडे ओढून
घेतले आणि त्याला कैद करून औरंगजेबाकडे पाठवून दिले. औरंगजेबाने त्याचे
सक्तीने धर्मांतर केले. महंमद कुलीखाँ असे नाव ठेऊन त्याला काबूलकडे
मोहिमेवर पाठविले.
विजापूरच्या मोहिमेत जयसिंगासारखा महाप्रतापी सरदार आणि शिवाजीसारखा
चतुर युद्ध सेनानी एकत्र असतानाही यश मिळाले नाही हे पाहून औरंगजेबाला
या मोहिमेविषयीच संशय वाटू लागला. जयसिंगावर त्याचा विश्वास होता, पण
शिवाजीविषयी मात्र त्याला खात्री वाटत नव्हती. शिवाजी हा धूर्त राजकारणी
असल्यामुळे अंत:स्थपणे त्याच्या काही हालचाली चालत असतील असा संशय
जयसिंगालाही येत होता. शिवाय दक्षिणेत आदिलशहा आणि कुतुबशहा
मुघलांविरुद्ध एक झाले आहे, असा दाट संशय जयसिंगाला आला होता आणि
औरंगजेबालाही त्याने तसे कळविले होते. दिल्लीहून औरंगजेबाचा जयसिंगावर
वारंवार दबाव येत होता. त्यामुळे त्याने शेवटी शिवाजीलाच औरंगजेबाच्या
भेटीसाठी पाठवून देण्याचे ठरविले. औरंगजेबाची संमती येताच मिर्झाराजे
जयसिंगाने शिवाजीची रवानगी उत्तरेकडे केली.
शिवाजी उत्तरेकडे
पुरंदरचा तह झाल्यापासूनच शिवाजीने औरंगजेबाच्या भेटीस जावे असा
जयसिंगाचा आग्रह चालू होता. विजापूरच्या मोहिमेत यश न आल्यामुळे
जयसिंगाने आपला विचार पक्का केला आणि औरंगजेबाच्या भेटीस जाण्यासाठी
शिवाजीचे मन वळविले. शिवाजीलाही उत्तर भारतात जाऊन तेथील मुघली
राजवट पाहण्याची मनापासून इच्छा होती. औरंगजेबालाही दक्षिणेच्या राजकारणात
तुफान माजविणाऱ्या शिवाजीला पाहण्याची इच्छा होती. प्रत्यक्ष भेटीत शिवाजीच्या
मनातील अंत:स्थ हेतू जाणून घेता येतील असे बादशहाला वाटत होते.
५ मार्च १६६६ रोजी शिवाजी संभाजीसह उत्तरेकडे म्हणजे आग्र्याकडे
निघाला. प्रयाण करण्यापूर्वी शिवाजीने स्वराज्याची संपूर्ण जबाबदारी राजमाता
जीजाबाई हिच्याकडे सुपूर्त केली. मोरोपंत पिंगळे आणि निळोपंत मुजुमदार
४६ छत्रपती शिवाजी महाराज