सामग्री पर जाएँ
सर्वकोश
छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)

छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)

Life & History of Chhatrapati Shivaji Maharaj

के. ए. केळूसकर / शास्त्रीय अनुवाद द्वारा

DevanagariHindipublished127 पृष्ठ

पृष्ठ 50, कुल 127 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 50

शिवाजीची स्वतंत्रता जवळजवळ संपुष्टात येऊन त्याने अप्रत्यक्षपणे मुघलांची
सेवा पत्करली होती. अर्थात प्रत्यक्षात शिवाजीने कोणतीही मनसबदारी पत्करली
नसली तरी शिवाजीचा मुलगा संभाजी याला मनसबदारी पत्करावी लागली
होती. त्यामुळे शिवाजीच्या कोणत्याही हालचालीवर दडपण राहणे स्वाभाविक
होते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिवाजीकडून जे २३ किल्ले मुघलांनी
घेतले होते ते मोक्याच्या ठिकाणी असून लष्करीदृष्ट्या महत्त्वाचे होते. हे किल्ले
ताब्यात आल्यावर शिवाजीच्या हालचालींना संपूर्ण प्रतिबंध करता येईल आणि
जे १२ किल्ले शिवाजीकडे आहेत त्या किल्ल्यांची सतत टेहाळणी करता
येईल असा जयसिंगाचा हिशोब होता. परंतु औरंगजेबाला मात्र १२ किल्ले
शिवाजीकडे राहू देणे धोक्याचे वाटले. म्हणून शिवाजीचे सर्वच किल्ले ताब्यात
घ्यावे असा आग्रह त्याने धरला होता. परंतु या १२ किल्ल्यांमुळे शिवाजी
काही शिरजोर होणार नाही, अशी ग्वाही जयसिंगाने औरंगजेबाला दिली होती.
थोडक्यात पुरंदरचा तह म्हणजे शिवाजीच्या चिमुकल्या स्वराज्यावर पडलेले
फार मोठे सावट होते. शिवाजीचे सर्व सरदार कुटुंबीय मंडळी आणि निष्ठावंत
सेवक हवालदिल झाले होते. शिवाजीकडे केवळ १२ किल्ले ठेवल्यामुळे तो
आदिलशहाविरुद्ध आपल्याला मदत करील आणि दक्षिणेत मुघलांचे पूर्ण वर्चस्व
वाढेल हे तहाच्या राजकारणाचे मुख्य सूत्र होते. जयसिंगाचे हे सूत्र शेवटी
औरंगजेबानेही मान्य केले आणि शिवाजीला ताबडतोब आदिलशहाविरुद्ध
मोहीम काढण्यास भाग पाडा असा तगादा त्याने सुरू केला.
शिवाजीपुढे आव्हान
पुरंदरचा तह हे शिवाजीपुढे मोठे आव्हान होते. कारण या तहाप्रमाणे
४० लक्ष होन खंडणी १३ वर्षांमध्ये मुघलांना देण्याचे शिवाजीवर बंधन होते.
याचा अर्थच असा की १३ वर्षे शिवाजीवर मुघलांचे बंधन राहणार होते.
बराच मोठा मुलूख आणि किल्ले शिवाजीने या तहाने गमाविले होते. उरलेले
स्वराज्यातील १२ किल्ले म्हणजे मुघलांच्या दृष्टीने एखाद्या देशमुखाचा किंवा
जहागिरदाराचा प्रदेश होता. शिवाजीला संपूर्ण वर्चस्वाखाली आणण्यामध्ये
जयसिंगाने कोणतीच कुचराई केली नव्हती. शिवाजीने सुद्धा आपल्या काळजावर
मोठा धोंडा ठेऊन विषण्ण मनःस्थितीत हा तह मान्य केला होता. पुरंदरच्या
तहाने शिवाजीचे लहान शत्रूही शेर बनले. ऑगस्ट १६६५ च्या एका इंग्रजी
पत्रात उल्लेख आहे की, “आपला देश शिवाजी इतक्या गरिबीने शत्रूच्या
हवाली करतो आहे त्याअर्थी काही विशेष घडले असलेच पाहिजे.” थोडक्यात
४४ छत्रपती शिवाजी महाराज