सामग्री पर जाएँ
सर्वकोश
छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)

छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)

Life & History of Chhatrapati Shivaji Maharaj

के. ए. केळूसकर / शास्त्रीय अनुवाद द्वारा

DevanagariHindipublished127 पृष्ठ

पृष्ठ 37, कुल 127 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 37

प्रयाण केले या सुमारास मुघलांतर्फे शायिस्तेखान पुण्यात शिवाजीच्याच वाड्यात
मुक्काम ठोकून बसला होता. त्याचे संकट दूर करणे अत्यंत निकडीचे होते
म्हणून सप्टेंबर १६६० मध्ये सिद्दी जौहरशी तह करून पन्हाळा किल्ला
शिवाजीने आदिलशहाच्या हवाली केला.
पन्हाळ्याहून सुटका हे शिवाजीच्या अद्भूत साहस, अप्रतिम बुद्धीकौशल्य,
विलक्षण पराक्रम, प्रचंड आत्मविश्वास याचे प्रतिक होते. शिवाजीच्या या अद्भूत
साहसानंतर आदिलशहाची दैना उडाली तर दिल्लीत असलेल्या औरंगजेबाला
दक्षिणेतील सत्तेची चिंता वाटू लागली आणि म्हणूनच पुण्यात तळ ठोकून
बसलेल्या आपल्या मामाला म्हणजे शायिस्तेखानाला शिवाजीचा बंदोबस्त
करण्याविषयी त्याने फर्माविले.
□□□
स्वराज्याचा विस्तार ३१