सामग्री पर जाएँ
सर्वकोश
छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)

छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)

Life & History of Chhatrapati Shivaji Maharaj

के. ए. केळूसकर / शास्त्रीय अनुवाद द्वारा

DevanagariHindipublished127 पृष्ठ

पृष्ठ 122, कुल 127 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 122

असे. किल्लेबांधणीवर, लष्करावर, हत्यारांच्या खरेदीवर बराच खर्च करावा
लागत असे. त्यामुळे राज्याचे उत्पन्न अपुरे पडत असे. अशा वेळी मुघल
प्रदेशातील सधन शहरावर स्वारी करून लूट करणे, तसेच केवळ पैशाच्या
लोभाने किनारपट्टीवर वखार टाकणाऱ्या पाश्चात्यांच्या वखारींची लूट करणे हे
उपाय शिवाजी महाराजांनी अंमलात आणलेले होते. सुरतेची त्यांनी दोन वेळा
लूट केली. तसेच राजापूर, धरणगाव, हुबळी इत्यादी ठिकाणी वखारीवर हल्ले
केले. व्यापारी पेठा लुटल्या. त्यामागे स्वराज्याचे उत्पन्न वाढविणे आणि शत्रूंना
दहशत बसविणे असा दुहेरी हेतू शिवाजी महाराजांनी साध्य केला होता.
राज्याभिषेक प्रसंगी शिवराई नावाचे चलन महाराजांनी सुरू केले. त्याशिवाय
सोन्याचे होनही सिंहासनारूढ झाल्यानंतर सुरू केले. याशिवाय विजयनगरपासून
बहमनी-मुघल सत्तेपर्यंत सर्वांची नाणी स्वराज्यामध्ये व्यवहारासाठी चालू होती.
लष्करी व्यवस्था
स्वराज्याची स्थापना आणि विस्तार करण्यासाठी कार्यक्षम लष्कराची नितांत
आवश्यकता होती. शिवाजी महाराजांचे लष्कर अत्यंत आटोपशीर होते.
अष्टप्रधानांपैकी दोन प्रधान सोडले तर प्रत्येक प्रधानाने युद्धशास्त्र पारंगत असले
पाहिजे आणि युद्धप्रसंगी रणांगणावर आले पाहिजे असा शिवाजी महाराजांचा
दंडक होता. दहा सैनिकांवर नाईक नावाचा अधिकारी असे. त्यानंतर चढत्या
क्रमाने हवालदार, जुमलेदार, हजारी आणि सरनौबत असे अधिकारी असत.
शिवाजी महाराजांचे अश्वदल अत्यंत प्रभावी होते. ज्याकडे स्वतःचे घोडे होते,
त्याला शिलेदार असे म्हणत आणि ज्यांच्याकडे सरकारी घोडे होते त्याला
बारगीर असे म्हणत. पंचवीस बारगीरांवर एक हवालदार असे. त्यानंतर
क्रमाक्रमाने जुमला बारगीर, हजारी बारगीर आणि सरनौबत बारगीर असे
अधिकारी होते.
शिवाजीचा लष्करी तळ अत्यंत साध्या प्रकारचा असे. बहुतेक सैनिक
उघड्यावर रहात असत. महाराजांसाठी एखादा तंबू असे किंवा पुष्कळप्रसंगी
झाडाला कापड टांगून सावली तयार करून महाराज आश्रय घेत असत.
स्वारीच्या वेळी बायकापोरे न घेण्याचा त्यांचा दंडक असे. स्वारीचे प्रसंगी
कधीकधी प्रत्येक घोडेस्वाराकडे दोन घोडे असत. त्यामुळे जलद गतीने आक्रमण
करणे सोयीचे असे.
महाराजांचे हेरखाते विलक्षण कार्यक्षम होते. स्वतः शिवाजी महाराजच
वेष पालटून हेर बनत असत. बहिर्जी नाईक हा हेर खात्याचा प्रमुख होता.
११६ छत्रपती शिवाजी महाराज