सामग्री पर जाएँ
सर्वकोश
छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)

छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)

Life & History of Chhatrapati Shivaji Maharaj

के. ए. केळूसकर / शास्त्रीय अनुवाद द्वारा

DevanagariHindipublished127 पृष्ठ

पृष्ठ 115, कुल 127 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 115

भागापर्यंत स्वराज्याची सरहद्द होती. ही सरहद्द सरळ रेषेत थेट कारवारपर्यंत
येऊन भिडली होती. त्याशिवाय कर्नाटकातील बेळगाव, कोप्पल, बल्लारी,
चित्तुर, अर्कोट, वेलोर आणि जिंजी या भागातील काही प्रदेश स्वराज्यामध्ये
मोडत होता. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची प्रशासनव्यवस्था अत्यंत काटेकोर
पद्धतीने केलेली होती. राजा हा सर्वश्रेष्ठ असून मुलकी, लष्करी तसेच
न्यायविषयक प्रशासनाचे अधिकार राजाच्या हाती केंद्रीत झाले होते. राज्यकारभार
सुरळीत चालावा म्हणून शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळाची निर्मिती केली
होती.
राज्याभिषेकसमयी ८ प्रधान नेमून त्यांच्याकडे प्रशासनाची जबाबदारी वाटून
देण्यात आली.
१. पेशवा किंवा पंतप्रधान : हा सर्वात जबाबदार प्रधान असून मुलकी
आणि लष्करी प्रशासनावर नियंत्रण ठेवण्याचे काम त्याच्याकडे सोपविले
होते. त्यादृष्टीने राजपत्रावर शिक्का मारण्याचा त्याला अधिकार होता.
राजाच्या आदेशाप्रमाणे प्रदेशाची व्यवस्था लावणे, प्रदेशाचे संरक्षण करणे
आणि स्वतः युद्धप्रसंगी हजर रहाणे ही अत्यंत महत्त्वाची कामे प्रधानाकडे
सोपविली होती. राज्याभिषेकप्रसंगी महाराजांनी मोरोपंत पिंगळे यांना
पंतप्रधान म्हणून नेमले.
२. अमात्य : हा दुसरा महत्त्वाचा प्रधान असून त्याच्याकडे राज्याची
अर्थव्यवस्था पहाण्याचे काम सोपविण्यात आले होते. शिवाय युद्धप्रसंगाला
त्यालाही रणांगणावर हजर रहावे लागत असे. शिवाजी महाराजांनी प्रथम
नारो निळकंठ व नंतर रामचंद्र निळकंठ यांना अमात्यपद बहाल केले
होते.
३. सचिव : तिसरा प्रधान म्हणजे सचिव. राजकीय पत्रव्यवहाराची जबाबदारी,
तसेच नव्याने जिंकलेल्या प्रदेशाची व्यवस्था लावण्याचे काम सचिवाकडे
होते. त्यालाही युद्धप्रसंगी हजर रहाण्याची जबाबदारी देण्यात आली होती.
महाराजांनी अण्णाजी दत्तो यास सचिव म्हणून नेमले होते.
४. मंत्री : चौथा प्रधान म्हणजे मंत्री. राजकारणाविषयी महत्त्वाचे निर्णय घेण्याचे
अधिकार या प्रधानाकडे सोपविण्यात आले होते. महाराजांनी दत्ताजी त्रिंबक
याला मंत्री म्हणून नेमले होते.
५. सेनापती : हा लष्कराचा प्रमुख असून राज्य रक्षणाची जबाबदारी त्याच्यावर
होती. युद्धप्रसंगी हजर रहाणे हे तर त्याचे आद्यकर्तव्य होते. शिवाजी
शिवरायाच्या कार्याचे स्वरूप १०९