सामग्री पर जाएँ
सर्वकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 20, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 20

... सदवीस ...
केली नाहीस तर मी काय करीन ? तुकारामबुवानी एक गोड धमकी विठ्ठलालाच दिलेली आहे. त्यानी
स्पष्टपणे सागितले की, 'संतासी श्रीमुख कैसें दाखविसी । पुढें मात त्यासी सांगीन ॥, घेईन डांगोरा
तुझिया नामाचा । नव्हे अनाथांचा नाथ ऐसा । तुका म्हणे आम्ही राहिलों मरोनि । तूं का होसी धनी
निमित्ताचा ।' कारण देवा, आमच्यामुळे तुला मोठेपणा आला आहे, हेही तू विसरला आहेस. अनाथाचा
नाथ तू आहेस, हेही तुझ्या ध्यानात नाही. कारण तू माझ्यावर कृपाच करीत नाहीस. खरे म्हणजे देवा,
आम्हीच तुझे दैवत आहोत.
जेणे तुज झालें रूप आणि नांव । पतित हें दैव तुझें आम्हीं ॥ १ ॥
नाहीं तरी तुज कोण हें पुसतें । निराकारी तेथें एकाएकी ॥ २ ॥
अंधारें दीपातें आणिली शोभा । माणिकासी प्रभा कोंदणाची ॥ ३ ॥
धन्वंतरी रोगें आणिला उजेडा । सुखी काय चाडा जाणार्यें तें ॥ ४ ॥
अमृतासी मोल विषाचिये गुणें । पितळें तरी सोनें उंचावेच ॥ ५ ॥
तुका म्हणे आम्ही असोनियां जाण । तुज देवपण आणिर्येले ॥ ६ ॥
'दिवाळीच्या मूळा लेकी आसायली'
अशा प्रेमाचे भाडण तुकोबासारख्या श्रेष्ठ भक्तालाच शोभून दिसते तेच मोठ्या धिटाईने
पाडुरंगाचा पदर धरून विचारू शकतात, 'धरुनि पालव असुडीन फरें । मग काय बरे दिसें लोकीं ।'
एकदा परमेश्वराची शोभा करायची ठरविले तर, मग कुणाची अब्रू बाहेर येईल? कुणाचा लौकिक
बिघडून जाईल ? समर्थांचे बालक जर केविलवाणे दिसले तर लोक कुणाला हसतील ? म्हणून देवा, तू
मला भेट द्यावीस 'कर कटावरी तुळशीच्या माळा । ऐसे रूप डोळा दावीं हरी । ठेविले चरण दोन्ही
विटेवरी । ऐसें रूप हरी दार्वी डोळा । कटीं पीतांबर फास मिरवली । दाखवीं वाहिली ऐसी मूर्ती।'
कारण देवा, याच भेटीसाठी आता प्राण कंठाशी आले आहेत रे. किती दिवस वाट पाहावयाची ? तुझ्या-
शिवाय मला दुसरे सोयरे कोण आहेत ? तुझ्या भेटीशिवाय आता मला दुसरे काहीच सुचत नाही देवा,
'कन्या सासुऱ्यासी जाये । मागे परतोनि पाहे । तैसे जालें माझ्या जीवा । केव्हां भेटसी केशवा ?' देवा,
मला भेट देशील तर तुझे काय नुकसान होने रे ? 'काय तुझें वेचे मज भेटी देतां । वचन बोलतां एक
दोन । काय तुझें रूप घेतों मी चोरूनि । त्या भेणे रूपोनि राहिलासी । काय तुझें आम्हां करावें
वैकुंठ । भेवों नको भेट आतां मज ।' असा दिलासा तुकोबानीच विठ्ठलला दिला आहे ! कसेही करा
आणि मला एवढा येऊन देवा, भेट ना, असा सारखा टाहो तुकाराम महाराज फोडताना दिसतात.
तळमळून एका अभंगात ते म्हणतात-
भेटीलागीं जीवा लागलीसे आस । पाहे रात्रंदिवस वाट तुझी ॥
पूर्णिमेचा चद्रमा चकोरा जीवन । तैसे माझें मन वाट पाहे ॥
दिवाळीच्या मुळा लेकी आसावली । पाहातसे वाटुली पंढरीची ॥
भुकेलिया बाळ अति शोक करी । वाट पाहे परी माउलीची ॥
तुका म्हणे मज लागलीसे भूक । धांवुनि श्रीमुख दावी देवा ॥