सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 4, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंश्रीतुकाराम महाराजांच्या चरणी स्तुतिसुमनांजली
भक्त भागवत जीवन्मुक्त संत । महिमा अत्पदभुत चराचरीं ॥
ऐसिया अनंतामाजी तूं अनंत । लीलावंश होत जगन्माता ॥
ब्रह्मानंद सुखे तुके आला तुका । तो हा विदवसखा जोडे जनों ।
शास्त्र श्रेष्ठाचार अविरुद्ध क्रिया । विधिदिने योगेशी ब्रह्मार्पण ॥
भक्तितत्त्वें आणि वैराग्यें आगळा । ऐसा नाहीं डोळा देखियेला ॥
जप तप यज्ञ लाजविलीं दाने । हरिनामक्रीर्तनें करूनिया ॥
मार्गे कवीश्वर जाले थोर थोर । नेलें कलेवर कोणे सागा ॥
म्हणे रामेश्वर सकळां पुसोनी । गेला तो विमानीं बैसोनिया ॥
—रामेश्वर
प्रपंचरचना सर्वही भोगुनि त्यागिली । अनुतापाचे ज्वाळीं देहबुद्धि हृदिली ॥
वैराग्याची निष्ठा प्रकदुनि दाखविली । अहंता ममता दवडुनि निजशाती वरीली ॥ १ ॥
जयजय जी सद्गुरु तुकया दातारा । तारक संतांचा तूं जिवलग सोयरा ॥
हरिमक्तांचा महिमा विशेष वाढविला । विरक्षित ज्ञानाचा ठेवा उघडुनि दाखविला ॥ २ ॥
—निळो
तुकोबाचीं पदें अद्वैत प्रसिद्धें । तयांच्या अनुवादें चित्त झुरे ॥
ऐसीं ज्याचीं पदें तो मज भेटता । जीवाची या होता तोष बहु ॥
तुकोबाचा छंद लागला मनासी । ऐकतां पदासी कवेमध्यें ॥
तुकोबाची भेटी होईल तरे क्षण । वैकुंठसमान होय मज ॥
तुकोबाची कार्नी ऐकेन हरिकथा । होये तैसे चित्ता समाधान ॥
तुकोबाचे ध्यान करूनि अंतरे । राहें त्या भितरीं घरामाजी ॥
बहेणी म्हणे तुका सद्गुरु सहोदर । भेटतां अपार सुख आहे ॥
मत्स्य जैसा जळावांचूनि घरफडी । तैसी ते आवडी तुकोबाची ॥
अंतरींचा साक्ष असेल जो प्राणी । अनुभवें मनीं जाणेळ तो ॥
तृषितासी जैसे आवडे जीवन । तैसा पिंड प्राणेवीण तया ॥
बहेणी म्हणे हेत तुकोबाचे पायीं । ऐकोनिया वेहीं पदें त्याचीं ॥
—बहिणाइ
निर्गुण गुणवंता । तुकारामा समर्या । मागुती भेटी देई । पायीं ठेवीन माथा ॥ १ ॥
वर्तुळ दोंद पोट । नेत्र नासिक कठ । देखिल्या दंतपंक्ति । तुकाराम समर्था ॥ २ ॥
देखिले रूप जैसे । ह्यास दायिले तैसे । सावळे रूप बापा । त्याचे लागले पिसें ॥ ३ ॥
उच ना ठेवणा हो । ध्यानीं हॅचि हें राहो । मानसीं कचेश्वरा । गुरु तुकोबा पाहा हो ॥४
—कचेश्व
स्वात्मानुभव पहाता तुकया केवळ सखाचि जनकाचा ।
वैराग्यै डोलविला माया जेणे मुनींद्र सनकाचा ॥ १ ॥
ज्याच्या सदभंगातें सेवी जन जैवि वाळ आंब्यातें ।
धनसा म्हणे भवाचे सुरसे जे मूळ करील आ भ्या तें ॥ २ ॥
ज्याच्या होय अभंगावाचुनि होऊनि हरिकथा नाहीं ।
धोत्यासि अभगांहीं तो दे जसि माय हरिस पानाहीं ॥ ३ ॥