सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 14, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ें... वीस ...
दुकानदारी व प्रपंच करण्यांतच गुंतण्यापेक्षां अवघ्या विश्वाची उठाठेव करण्याची शक्ती जेथे मिळते,
तेथेच त्याचे चित्त गिळून राहिले. त्यांनी आपल्या नव्या साधनमार्गाचीही नोंद तपशीलाने दिलेली
आहे तुकाराम महाराजांच्या साधनक्रमाचे एका अभंगात संक्षेपाने पण स्पष्ट असे वर्णन आले आहे.
'याती शूद्र वैश्य केला वेवसाय' या प्रसिद्ध अशा आत्मनिवेदनपर अभंगांत ने या साधनमार्गाचा
खुलासा करताना म्हणतात,
देवाचें देऊळ होतें तें भंगलें । चित्तासी जें आलें करावें तें ॥
आरंभीं कीर्तन करो एकादशी । बहुतें अभ्यासों चित्त आधीं ॥
कांही पाठ केलीं संतांचीं उत्तरें । विश्वासें आदरें करोनियां ॥
गाती पुढें त्यांचें धरावें धृपद । भावें चित्त शुद्ध करोनियां ॥
संतांचें सेविलें तीर्थ पायवणी । लाज नाहीं मनीं येऊं दिली ॥
ठाकला तो कांहीं केला उपकार । केलें हें शरीर कष्टवूनि ॥
वचन मानिलें नाहीं सुहृदांचें । समूळ प्रपंचों वीट आला ॥
सत्य असत्यासी मन केलें ग्वाही । मानियेलें नाहीं बहुमत ॥
मानियेला स्वप्नीं गुरूचा उपदेश । धरिला विश्वास दृढ नामीं ॥
यावरि या झाली कवित्त्वाची स्फूर्ति । पाय धरिले चित्तीं विठोबाचे ॥
'आपुलाचि वाद आपणांसी'
याप्रमाणे तुकाराम महाराजांच्या साधनेस प्रारंभ झाला पारमार्थिक जीवनयात्रेचा प्रवास
सुरू झाला गावातील विठोबाचे देऊळ त्यांनी प्रथम दुरुस्त केले संतांची काही उत्तरे पाठ केली. कुणी
कीर्तन करू लागले तर, त्याच्या पाठीमागे उभे राहून धृपद धरण्याचे काम त्यांनी पत्करले. संताच्या
चरणसेवेची लाज मनात वाटू दिली नाही शेजारच्या भामनाथाच्या डोंगरावर जाऊन तुकारामबुवांनी
ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता या ग्रंथाची पारायणे केली. अखंड विठ्ठलनामाचा जयघोष केला.
'सरें नानपट निक्षेपीचें जुनें ठेवणें' होते ते शोधण्याचा त्यांनी प्रयत्न केला. एकान्ताच्या निवासाने व
ज्ञानेश्वर-नामदेवांच्या कृपेने त्याचे चित्त शांत झाले डोंगरावरील वृक्षवल्लींचा व वनचरांचा सहवास
त्यांना किती सुखाचा वाटत होता, याचे मोठे बहारदार वर्णन त्यांनी एका अभंगात केले आहे.-
वृक्षवल्ली आम्हां सोयरीं वनचरें । पक्षी ही सुस्वरें आळविती ॥
येणे सुखें रुचे एकान्ताचा वास । नाहीं गुणदोष अंगा येत ॥
आकाश मंडप पृथ्वो आसन । रमे तेथें मन क्रीडा करी ॥
कंथा कमंडलु देह उपचारा । जाणवितो वारा अवसरु ॥
हरिकथा भोजन परवडी विस्तार । करोनि प्रकार सेवूं रुची ॥
तुका म्हणे होय मनासी संवाद । आपुलाचि वाद आपणांसी ॥
'मज विश्वंभर बोलवितो'
बशा या विशाल पार्श्वभूमीवर तुकोबांचे मन रमून गेले पृथ्वीचे आसन झाले. आकाशाची
छाया झाली हरिकथेच्या भजनाचे नाना प्रकार झाले. आपल्या मनाशी आपले सुलसवाद सुरू झाले.
याच वेळी आणखी एकदोन महत्त्वाच्या घटना बुवांच्या आयुष्यात घडल्या. बाबाजी चैतन्य या थोर
सत्पुरुषाने त्यांना उपदेश दिला 'राम कृष्ण हरि' हा मंत्र प्राप्त झाला आणि थोड्याच दिवसांत
नामदेवरायांच्या कडून त्यांना कवित्त्वाची प्रेरणा झाली 'नामदेवें केले स्वप्नामाजीं जागें । सवें पांडुरंगें
येवोनिया । सांगितलें काम करावें कवित्व । वाउगें निमित्य बोलों नये' अशा आज्ञेवरून तुकाराम
महाराजांच्या कवित्वास प्रारंभ झाला.