दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
by समर्थ रामदास स्वामी
About this granth
Dasbodh (दासबोध) is the Marathi work in ovi verse by Samarth Ramdas Swami (1608–1681), the saint of Maharashtra. Framed as a dialogue between teacher and disciple, it has twenty dashakas of ten samasas each. Alongside devotion, knowledge and detachment it gives detailed advice on practical life, effort, shrewdness, serving the community and leadership; its portraits of the fool and the learned fool, of the worthy person and the mahant, and its sections on statecraft are especially well known.
The catalogue lists a Hindi commentary, but the title page in the scan shows a Marathi edition, Shri Dasbodh with the life and teachings of Shri Samarth, published in October 1915 by Bhat ani Mandali, Budhwar Peth, Pune, and printed by Achyut Chintaman Bhat at his Yashwant press, priced at one rupee.
The Marathi introduction gives a short life of Ramdas, citing the preface to Shri Samarth Pratap and Justice Ranade's history of the Marathas to place him at the head of Maharashtra's saint tradition. The book has 467 pages.
१०६ 'श्रीदासबोध. [ दशक
वोळखण । सच्छिष्याची ॥ १८ ॥ मुख्य सच्छिष्याचें लक्षण । सद्गुरुवचनीं
विश्वास पूर्ण । अनन्यभावें शरण । त्या नांव सच्छिष्य ॥ १९ ॥ शिष्य
पाहिजे निर्मळ । शिष्य पाहिजे आचारशीळ । शिष्य पाहिजे केवळ ।
विरक्त अनुतापी ॥ २० ॥ शिष्य पाहिजे निष्ठावंत । शिष्य पाहिजे शुचि-
ष्मंत । शिष्य पाहिजे नेमस्त¹ । सर्व प्रकार्रीं ॥ २१ ॥ शिष्य पाहिजे साक्षे-
पी² विशेष ।
Sign up free to read the full text of this page
The page scan is free for everyone.
Sign up or sign inऐसीं बहुतेक भवीं बुडालीं । नाना जलचरीं तोडिलीं । मध्येंच सुखदुःखें
॥ ३७ ॥ या कारणें दृढ विश्वास । तोचि जाणावा सच्छिष्य । मोक्षाधिकारी
विशेष । अग्रगण्य ॥ ३८ ॥ जो सद्गुरुवचनें निवाला । तो सायुज्यतेचा आं-
खिला । संसारपांगें पांगिला । न वचे कदा ॥ ३९ ॥ सद्गुरूहुनि देव मोठा ।
जयास वाटे तो शिष्य करंटा । सुटला वैभवाचा फांटा । सामर्थ्यपिसें
॥ ४० ॥ सद्गुरुस्वरूप तें संतें । आणि देवास
Sign up free to read the full text of this page
The page scan is free for everyone.
Sign up or sign in१०८ श्रीदासबोध. [ दशक
कुटुंबाचा । काबाडी जाहला ॥ ५६ ॥ मानिला प्रपंचीं आनंद । केला
परमार्थीं विनोद । आंत मूढ मतिमंद । लोधला¹ कर्मीं ॥ ५७ ॥ सूकर
पूजिलें विलेपनें । जैसा मर्दिला चंदनें । तैसा विषयी ब्रह्मज्ञानें । विवेकें
बोधिला ॥ ५८ ॥ रासभें² उकरडां लोळे । तयास परिमळसोहळे । उलूक³
अंधारीं पळे । तया केवीं हंसपंगती ॥ ५९ ॥ तैसा विषयदरीचा बरांडी⁴ ।
घाली अधःपैतनीं उडी । तयास
Sign up free to read the full text of this page
The page scan is free for everyone.
Sign up or sign in५ वा.] सच्छिष्यलक्षण. १०५
शिष्य झाला दों दिवसांचा । मंत्राकारणें ॥ ७५ ॥ ऐसे केले गुरु उदंड ।
शब्द शिकला पाषांड । झाला तोंडाळ तेंरमुंड । महा पाषांडी ॥ ७६ ॥
घडी एक रडे आणि पडे । घडी एक वैराग्य चढे । घडी एक अहं-
भाव जडे । ज्ञातेपणाचा ॥ ७७ ॥ घडी एक विश्वास धरी । सर्वैचि घडी एक
गुरगुरी । ऐसे नाना छंद करी । पिसाट जैसा ॥ ७८ ॥ काम क्रोध मद मत्सर ।
लोभ मोह नाना विकार ।
Sign up free to read the full text of this page
The page scan is free for everyone.
Sign up or sign inजैसा हिंसक दुराचारी । परदुःखें शिणेना ॥ ९३ ॥ दुःख पराचें नेणती ।
दुर्जन गांजिलेचि गांजिती । श्रम पावतां आनंदती । आपले मनीं ॥ ९४ ॥
स्वदुःखें झुरे अंतरीं । आणि परदुःखें हास्य करी । तयास प्राप्त यमपुरी ।
यमदूत झोडिती ॥ ९५ ॥ असो ऐसे मदांध बापुडे । तयांस भगवंत कैंचा
जोडे । जयांस सुबुद्धि नावडे । पूर्वपातकेकरूनी ॥ ९६ ॥ तयांस देहाच्या
अंतीं ।
Sign up free to read the full text of this page
The page scan is free for everyone.
Sign up or sign in॥ ५ ॥ शेषमंत्र गरुडमंत्र । वायुमंत्र वेताळमंत्र । झोटिंगमंत्र बहुधा मंत्र ।
किती म्हणोनि सांगावे ॥ ६ ॥ बाळामंत्र बगळामंत्र । काळीमंत्र कंका-
ळीमंत्र । बेडूकमंत्र नाना मंत्र । नाना शक्तींचे ॥ ७ ॥ पृथगोकारें स्वतंत्र ।
जितुके देव तितुके मंत्र । सोपे अवघड विचित्र । खेचर दारुण बीजांचे
॥ ८ ॥ पाहूं जातां पृथ्वीवरी । देवांची गणना करी । तितुके मंत्र वैखरी ।
किती ह्मणोनि वदावे ॥ ९ ॥
Sign up free to read the full text of this page
The page scan is free for everyone.
Sign up or sign in११२ श्रीदासबोध. [ दशक
सांगती कर्ममार्ग । एक सांगती उपासनामार्ग । एक सांगती अष्टांग योग ।
नाना चक्रें ॥ २४ ॥ एक तपें सांगतीं । एक अजपाजप निरूपिती । एक
तत्वें विस्तारिती । तत्वज्ञान ॥ २५ ॥ एक सांगती सगुण । एक निरूपिती
निर्गुण । एक उपदेशिती तीर्थाटन । फिरत जावें ॥ २६ ॥ एक महावाक्य
सांगती । त्याचा जप करावा म्हणती । एक उपदेश करिती । सर्व ब्रह्म
म्हणोनि ॥ २७ ॥ एक शाक्तमार्ग
Sign up free to read the full text of this page
The page scan is free for everyone.
Sign up or sign in५ वा.] बहुधाज्ञान. ११३
॥ श्लोक ॥ पृथिव्यां यानि तीर्थानि ज्ञानदानेषु यत्फलम् । तत्फलं कोटिगुणितं
ब्रह्मज्ञानसमं हि न ॥ ४ ॥ टीका ॥ म्हणोन जें आत्मज्ञान । तें गहनाहून
गहन । ऐक तयाचें लक्षण । सांगिजेल ॥ ३६ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्य-
संवादे पंचमदशके उपदेशलक्षणं नाम चतुर्थः समासः ॥ ४ ॥
५. बहुधाज्ञान.
श्रीगणेशाय नमः ॥ जंव तें ज्ञान नाहीं प्रांजळ । तंव सर्व कांहीं
Sign up free to read the full text of this page
The page scan is free for everyone.
Sign up or sign inपाहुण्यांच्या`: wait, does "पावणे" mean signs of guests? Wait, "नेत्रपल्लवी" means "पाहुण्यांच्या खुणांची भाषा"? No!
Wait, what is "नेत्रपल्लवी"?
Eye gestures!
Sign up free to read the full text of this page
The page scan is free for everyone.
Sign up or sign in५ वा. ] शुद्धज्ञानलक्षण. ११५
जाणावें दुसऱ्याचे जीवींचें । हें ज्ञान वाटे साचें । परंतु हें आत्मज्ञानाचें ।
लक्षण नव्हे ॥ ३४ ॥ महानुभाव महा भला । मानसपूजा करितां चुकला ।
कोणी एकें पाचारिला । ऐसें नव्हे म्हणोनी ॥ ३५ ॥ ऐसी जाणे अंतरस्थि-
ती । तयास परम ज्ञाता म्हणती । परंतु जेणें मोक्षप्राप्ती । तें हें ज्ञान नव्हे
॥ ३६ ॥ बहुत प्रकारांचीं ज्ञानें । सांगों जातां
Sign up free to read the full text of this page
The page scan is free for everyone.
Sign up or sign in११६ श्रीदासबोध. [ दशक
९ ॥ ऐसें शुद्ध ज्ञानाचें लक्षण । शुद्ध स्वरूपींच आपण । या नांव स्वरूप-
ज्ञान । जाणिजे श्रोतीं ॥ १० ॥ महावाक्य उपदेश भला । परी त्याचा जप
नाहीं बोलिला । तेथींचा तो विचार केला । पाहिजे साधकें ॥ ११ ॥ महा-
वाक्य उपदेशसार । परी घेतला पाहिजे विचार । त्याच्या जपें अंधकार ।
न फिटे भ्रांतीचा ॥ १२ ॥ महावाक्याचा अर्थ घेतां । आपण वस्तुचि
तत्वतां । त्याचा जप करितां । वृथा शिण
Sign up free to read the full text of this page
The page scan is free for everyone.
Sign up or sign in५ वा.] शुद्धज्ञानलक्षण. ११७
२७ ॥ साधु संत आणि सज्जन । भूत भविष्य वर्तमान । सर्वत्रांचें गुह्य-
ज्ञान । सांगिजेल आतां ॥ २८ ॥ तीर्थे व्रतें तपें दानें । जें न जोडे धूम्र-
पानें । पंचाग्नि गोरांजनें १ । जें प्राप्त नव्हे ॥ २९ ॥ सकळ साधनांचें फळ ।
ज्ञानचि सांगें केवळ । जेणें संशयाचें मूळ । निःशेष तुटे ॥ ३० ॥ छप्पन्न
भाषा तितुके ग्रंथ । आदिकरुनि वेदांत । या इतुक्यांचा गहनार्थ । एकचि
असे ॥ ३१ ॥
Sign up free to read the full text of this page
The page scan is free for everyone.
Sign up or sign in११८ श्रीदासबोध. [ दशक
यथान्वयें १ । प्रकृतिपुरुषें २ जियें । तेहि ब्रह्म होती ॥ ४७ ॥ दृश्य पदार्थ आ-
टैतां ३ । आपणहि नुरे तत्वतां । ऐक्यरूपें ऐक्यता । मुळींच आहे ॥ ४८ ॥
सृष्टीची नाहीं वार्ता । तेथें सर्वहि ऐक्यता । पिंडब्रह्मांड ४ पाहों जातां । दिसेल
कोठें ॥ ४९ ॥ ज्ञानवन्हि प्रगटे ५ । तेणें दृश्य केर आटे । तदाकारें मूळ तुटे । भिन्न-
त्वाचें ॥ ५० ॥ मिथ्यात्वें वृत्ति फिरे ६ । तों दृश्य
Sign up free to read the full text of this page
The page scan is free for everyone.
Sign up or sign in५ वा.] बद्धलक्षण. ११५
सन्निपाताचेनि दुःखें । भयानक दृष्टीस देखे । औषध घेतांचि सुखें । आनंद
पावे ॥ ६४ ॥ तैसें अज्ञानसन्निपातें । मिथ्या दृष्टीस दिसतें । ज्ञान औषध
घेतां चित्तें । जें मुळींच नाहीं ॥ ६५ ॥ मिथ्या स्वप्नें बोसेण झाला । तो
जागृतीस आणिला । तेणें पूर्वदशा पावला । निर्भय जे ॥ ६६ ॥ मिथ्याच
परी सत्य वाटलें । तेणें गुणें दुःख झालें । मिथ्यात्वें
Sign up free to read the full text of this page
The page scan is free for everyone.
Sign up or sign in॥ ६॥ भक्त ज्ञाता तापसी । योगी वीतरागी संन्यासी । पुढें देखतां
दृष्टीसी । येणार नाहीं ॥ ७॥ न दिसे नेणे कर्माकर्म । न दिसे नेणे धर्मा-
धर्म । न दिसे नेणे सुगम । परमार्थपंथ ॥ ८ ॥ तयास न दिसे सच्छास्त्र ।
सत्संगति सत्पात्र । सन्मार्ग जो कां पवित्र । तोहि न दिसे ॥ ९ ॥ न कळे
सारासार विचार । न कळे स्वधर्म आचार । न कळे कैसा परोपकार । दान
पुण्य ॥ १० ॥ नाहीं पोटीं भूतदया ।
Sign up free to read the full text of this page
The page scan is free for everyone.
Sign up or sign in५ वा. ] बद्धलक्षण. १२१
कापट्य वादविवाद । बहु कुतर्क भेदाभेद । बहु क्रूर कृपामंद । या नांव
बद्ध ॥ २६ ॥ बहु निंदा बहु द्वेष । बहु अधर्म बहु अभिलाष । बहु प्रका-
रींचे दोष । या नांव बद्ध ॥२७॥ बहु भ्रष्ट अनाचार । बहु नष्ट ऐकाकार ।
बहु अनीति अविचार । या नांव बद्ध ॥ २८ ॥ बहु निष्ठुर बहु घातकी ।
बहु हत्यारा बहु पातकी । बहु तपिल्लें कुविद्या अनेकीं । या नांव बद्ध ॥२९॥
बहु दुराशा बहु
Sign up free to read the full text of this page
The page scan is free for everyone.
Sign up or sign in१२२ श्रीदासबोध. [ दशकं
चिंता नाना उद्वेग । नाना दुःखांचे संसर्ग । करी परमार्थाचा त्याग । या
नांव बद्ध ॥ ४५ ॥ घटिका निमेष पळभरी । दुश्चित नव्हतां अंतरीं । सर्व-
काळ ध्यान धरी । द्रव्य द्वारा प्रपंचाचें ॥ ४६ ॥ तीर्थयात्रा दान पुण्य ।
हरिकथानिरूपण । मंत्र पूजा जप ध्यान । सर्वहि द्रव्य द्वारा ॥ ४७ ॥
जागृतीं स्वप्नीं रात्रंदिवस । ऐसा लागला विषयीं
Sign up free to read the full text of this page
The page scan is free for everyone.
Sign up or sign in॥ १३ ॥ पूर्वपाप वोढवलें । मज पुण्य नाहीं घडलें । मन अन्होटीं¹ पडिलें ।
सर्वकाळ ॥ १४ ॥ भक्तिमाता हे बुडविली । शांतिविश्रांति मोडिली । मूर्ख-
पणें म्यां बिघडिली । सद्बुद्धि सद्वासना ॥ १५ ॥ आतां कैसेनि घडेल
सार्थक । दोष केले निरर्थक । पाहों जातां विवेक । उरला नाहीं ॥ १६ ॥
कोण उपाय करावा । कैसा परलोक पाहावा । कोणत्या गुणें देवाधिदेवा ।
पाविजेल ॥ १७ ॥ नाहीं सद्भाव उपजला
Sign up free to read the full text of this page
The page scan is free for everyone.
Sign up or sign in१२४ श्रीदासबोध. [ दशक
३२ ॥ म्हणे मी कांहींच नेणें । म्हणे मी सकळांहूनि उणें । आपलीं वर्णी
कुलक्षणें । या नांव मुमुक्षु ॥ ३३ ॥ म्हणे मी कुश्चिळ¹ अघोरी । म्हणे मी
नीच नानापरी । म्हणे मी अनधिकारी । या नांव मुमुक्षु ॥ ३४ ॥ म्हणे
मी काय आपस्वार्थी । म्हणे मी काय अनर्थी । म्हणे मी नव्हे परमार्थी ।
या नांव मुमुक्षु ॥ ३५ ॥ म्हणे मी
Sign up free to read the full text of this page
The page scan is free for everyone.
Sign up or sign in५ वा. ] सार्थकलक्षण. १२५
करी साधन । या नांव साधन ॥ ४ ॥ धरी श्रवणाची आवडी । अद्वैत-
निरूपणाची गोडी । मननें अर्थांतर¹ काढी । या नांव साधक ॥ ५ ॥ होतां
सारासार विचार । ऐके होऊनि तत्पर । संदेह छेदूनि दृढोत्तर² । आत्मज्ञान
पाहे ॥ ६ ॥ नानासंदेहनिवृत्ती³ । व्हावया धरी सत्संगती । आत्मशास्त्रगुरु-
प्रतीती । ऐक्यतेसि आणि ॥ ७ ॥ देहबुद्धी विवेकें वारी । आत्मबुद्धी दृढ
धरी ।
Sign up free to read the full text of this page
The page scan is free for everyone.
Sign up or sign in